Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शुक्रवार, ३० जानेवारी, २०२६

*अकलूज नगर परिषद व अकलूज शहर मुस्लिम समाजाच्या वतीने शब-ए-बारात निमित्त स्वच्छता अभियानाचे आयोजन*

 अकलूज प्रतिनिधी 

  एहसान मुलाणी 

टाइम्स 45 न्यूज मराठी 



माझी वसुंधरा अभियानां अंतर्गत अकलूज नगर परिषद व समस्त अकलूज शहर मुस्लिम समाजाच्या वतीने शनिवार दिनांक 31 जानेवारी 2026 रोजी अकलूज येथील मुस्लिम कब्रस्तान दफनभूमी येथे स्वच्छता अभियानाचे आयोजन करण्यात आले असून बुधवार दिनांक 4 फेब्रुवारी 2026 रोजी मुस्लिम समाजाची शब-ए-बारात  ( मोठी रात्र )च्या अनुषंगाने हे स्वच्छता अभियान राबवले जात असून या शब-ए-बारात ला  इस्लाम धर्मात अनन्यसाधारण महत्त्व आहे या दिवशी या जगातून देवाज्ञा झालेल्या  आपल्या पूर्वजांसाठी विशेष प्रार्थना केली जाते त्या रात्री सर्व मुस्लिम समाज दफनभूमी येऊन समस्त दफनभूमीतील देवाज्ञा झालेल्या व्यक्तींसाठी विशेष प्रार्थना केली जाते 

   तरी अकलूज मधील सर्व मुस्लिम बांधवांना आवाहन करण्यात येते की दिनांक 31 जानेवारी 2026 रोजी दुपारी दोन वाजता अकलूज येथील दफनभूमीत स्वच्छता अभियानासाठी आवर्जून उपस्थित राहावे ही विनंती

     या स्वच्छता अभियानासाठी अकलूज नगर परिषद चे मुख्याधिकारी सचिन पाटील व आरोग्य विभाग प्रमुख महेबुब शेख त्यांचे स्वच्छता कर्मचारी यांचे विशेष सहकार्य  करत आहेत



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा