Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

मंगळवार, ६ जानेवारी, २०२६

*क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंतीनिमित्त दि मॉडेल विविधांगी प्रशालेत विविध स्पर्धा*

 अकलूज --प्रतिनिधी 

 एहसान मुलाणी

टाइम्स 45 न्यूज मराठी 


स्त्री शिक्षणाचा पाया रचणाऱ्या व अनंत अडचणीवर मात करून मुलींसाठी पहिली शाळा काढणाऱ्या ज्ञानज्योती, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची १९५ वी जयंती दि मॉडेल विविधांगी प्रशाला,माळीनगर येथे विविध उपक्रम राबवून उत्साहात साजरी करण्यात आली.

  प्रारंभी क्रांतिसूर्य म.फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन दि सासवड माळी शुगर फॅक्टरीचे व एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन राजेंद्र गिरमे,संचालक राहुल  गिरमे,मोहन लांडे,माजी संचालक गौतम गिरमे,सा.मा. एज्युकेशन सोसायटीचे सचिव अजय गिरमे,माजी खजिनदार व संचालक पृथ्वीराज भोंगळे, संचालक दिलीप इनामके तसेच प्राचार्य कल्लापा बिराजदार,उपप्राचार्य रितेश पांढरे यांनी करून विनम्र अभिवादन केले.



   क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त घेतलेल्या विविध स्पर्धेतील विजेते स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते मेडल घालून व प्रशस्तीपत्र देऊन सर्वांचा सत्कार करण्यात आला.यामध्ये १)वक्तृत्व स्पर्धा-इ.५ वी व ६ वी गट- श्रेयश साठे, प्रतीक्षा बोरावके,प्राची पवार व त्रिशा शिंदे; इ.७ वी व ८ वी गट- स्वराज सावंत,सिद्धी तुपे व सृष्टी बनकर; इ.९ वी व १० वी गट- आरती साळुंखे, समृद्धी कोळेकर, वैष्णवी नेवसे; इ.११ वी व १२ वी गट-गौरी हुलगे, साकीया जमादार,दिव्या सरवळे;२) मेहंदी स्पर्धा--इ.५ वी व ६ वी गट-गुलसनोबर सय्यद,कल्याणी गलांडे,तबसूम  शेख; इ.७ वी व ८ वी गट-सिद्धी हेगडकर, श्रेया काटे, कार्तिका हजारे; इ.९ वी व १० वी गट-दिव्या सरतापे,अवंतिका बेंद्रे,समीक्षा खरात; ३)चित्रकला स्पर्धा इ.५ वी व ६ वी गट-आदिती ऐवळे,रुद्र जळकोटे, हर्षल म्हाळणकर; इ.७ वी व ८ वी गट-आकांक्षा कोळी,प्रतीक्षा गलांडे, वीरधवल हेगडे; इ.९ वी व १० वी गट-पृथ्वीराज सावंत, शाहिद मुलाणी,श्रेया रेणके; ४)रांगोळी स्पर्धा- गौरी कुंभार,पायल चौधरी,शिवानी शिंदे यांना बक्षिसे देण्यात आली.यावेळी बक्षिसाचे वाचन शिक्षक गणेश तुपे,सचिन  वाघमारे,अभिजीत हेगडे यांनी केले. या कार्यक्रमात बाळासाहेब सोनवणे व राजेश कांबळे यांचे वतीने नृत्य सादर करण्यात आले.          


                                               क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त प्रा. सुनील शिंदे यांचे नियोजनाखाली घेण्यात आलेल्या वक्तृत्व स्पर्धेसाठी रघुनाथ वाघमारे, वसंत पिंगळे, सचिन आतकर, गणेश तुपे, वैशाली पांढरे, चित्रकला स्पर्धेसाठी संजय पवार व रजनी चौरे, रांगोळी स्पर्धेसाठी वैशाली पांढरे व निशा दळवी यांनी तर मेहंदी स्पर्धेसाठी सर्व महिला शिक्षीकांनी परिश्रम घेतले. माळीनगर फेस्टिवल मध्ये घेण्यात आलेल्या फनी गेम्स स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे देण्यात आली. या बक्षीसांचे वाचन नवनाथ गायकवाड यांनी केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय बांदल यांनी तर व आभार उपप्राचार्य रितेश पांढरे यांनी मान
ले.

फोटो ओळी-

 दि मॉडेल विविधांगी प्रशालेत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे जयंतीनिमित्त प्रतिमापूजनावेळी राजेंद्र गिरमे,राहुल गिरमे,मोहन लांडे गौतम गिरमे,अजय गिरमे, दिलीप इनामके व रितेश पांढरे आदी.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा