*संपादक -*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-9730867448*
काल दिनांक 30 जानेवारी रोजी तुळजापूर तालुक्यातील काटगाव येथील जिल्हा परिषद गटांमध्ये उमेदवाराच्या प्रचाराला महाराष्ट्र राज्याचे काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ हे सभेला संबोधित केले आणि मतदारांनी काँग्रेसच्या उमेदवारास निवडून द्यावे असे आवाहन केले या प्रचार सभेनंतर प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी श्रीक्षेत्र तुळजापूर येथील तुळजाभवानी मातेच्या मंदिरात जाऊन तुळजाभवानी मातेचे दर्शन घेतले आणि आई जगदंबेच्या चरणी साकडे घातले आणि राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो अशी तुळजाभवानी चरणी प्रार्थना केली
याप्रसंगी धाराशिव( उस्मानाबाद) जिल्ह्याचे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष धीरज भैय्या पाटील महाराष्ट्र काँग्रेस सचिव अमर खानापुरे नगरसेवक अमोल कुतवळ बहुसंख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा