Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शनिवार, ३१ जानेवारी, २०२६

*वेळापूर येथील जिल्हा परिषद शाळा येथे" मदत परिवारा ग्रुप"कडून शैक्षणिक साहित्याचे वाटप*

 *संपादक -*

*टाइम्स 45 न्यूज मराठी*

*मो:-9730867448*


वेळापूर: डोंबारीवस्ती शाळेतील विद्यार्थ्यांना प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून मदत परिवाराकडून श्री विक्रम मगर यांच्या हस्ते दफ्तर, वह्या व पेनचे वाटप करण्यात आले.

           याप्रसंगी मगर म्हणाले की खेड्यातील मराठी माध्यमाच्या शाळा टिकल्या पाहिजेत या उद्देशाने गेली दहा वर्षांपासून खेड्यातील शाळांसाठी लागणारी सर्व प्रकारची मदत,सोयी-सुविधा पुरवण्याचे कार्य मदत परीवार सातत्याने व निष्ठेने करत आहे.डोंबारीवस्ती शाळेत शिक्षण घेणारी मुले डोंबारी,डवरी, नाथपंथी गोसावी,मातीवडार, पारधी, कैकाडी, गुरखा (नेपाळी) या समाजाची आहेत.ती अतिशय आर्थिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्गातून आलेली आहेत.हातावरचं पोट असणाऱ्या कुटुंबांची पहिलीच पिढी आज शाळेचे उंबरे ओलांडत आहे.अशा दुर्बल व वंचित घटकातील मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणणे गरजेचे आहे.शाळेमध्ये विद्यार्थ्यांची उपस्थिती व गुणवत्ता वाढविण्यासाठी शिक्षकांनी विजेची सोय करत संगणक व खेळणी आदि भौतिक सुविधा उपलब्ध केलेल्या आहेत.अशा चिमुकल्यासोबत संविधानाच्या मुल्यांना साक्ष ठेवत प्रजासत्ताक दिन साजरा करण्याचा भावस्पर्शी अनुभव मिळाला.

                    -----: जाहिरात:------👇


           याप्रसंगी अजय पवार, शिवाजी पवार, नितीन शेगर,अमोल थापा, भगतसिंग सोनार, हनुमंत वसेकर, अंगणवाडी शिक्षिका सुनिता भोसले, मदतनीस सुचिता माने, अर्चना वसेकर, ग्रामस्थ,पालक व परिसरातील नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.याप्रसंगी शाळेतील शिक्षक वीरेंद्र पतकी यांनी प्रास्ताविक केले तर शाळेचे मुख्याध्यापक रुपचंद जाधवर यांनी आभार मानले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा