*कार्यकारी संपादक एस. बी. तांबोळी मोबाईल नंबर 8378081147*
मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर भोगीला करण्यात येणारे खेंगाट व बाजरीची तीळ लावलेली भाकरीसाठी लागणारी साहित्य मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी काहीसे महागले असल्याने खेंगाट, भाकरी कडू होण्याची शक्यता आहे.
खेंगाट, भाकरीसाठी लागणारे साहित्य पुढीलप्रमाणे बाजरी ३० ते ३५ रुपये किलो, तीळ २० ते २५ रुपये पन्नास ग्रॅम, बोरे ४० ते ५० रुपये किलो, चाकवत २० रुपये जोडी, गाजर ४५ ते ६० रुपये किलो, घेवडा ६० ते ७० रुपये किलो, चुका २५ रुपयाला जोडी, पालक १० रुपये असा आठवडा बाजारात भाव होता. विविध प्रकारच्या भाज्यांची आवक वाढल्याने भाव जेमतेम होते. व्यापारी शेतकऱ्यांकडून लिलावात संगनमताने भाव पाडून खरेदी करतात. तोच माल आठवडे बाजारात दुप्पट किमतीत विकतात, हे येथील बाजारातही दिसून येत आहे.
खेंगाट, बाजरीच्या भाकरीला वैज्ञानिक महत्त्व असून बाजरी व तीळ गरम स्वरूपाचे असल्याने बाजरीच्या भाकरीला तीळ लावून खाल्ल्याने शरीरात उब निर्माण होते. तर त्याच्या जोडीला सर्व भाज्यांची मिळून तयार झालेल्या भाजीला खेंगाट म्हटले जाते. हिवाळ्यात मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर खेंगाट भाकरी खाल्ल्याने शरीर उबदार राहते. मागणीच्या तुलनेत भाजीची आवक जेमतेम झाल्याने दरात थोड्या प्रमाणात वाढ झाली असल्याचे बबलू तांबोळी यांनी सांगितले.
फोटो - नरसिंहपूर परीसरातील आठवडे बाजारात भोगीला खेंगाट भाकरीला लागणारे भाज्यांचे दुकाने थाटली आहेत.
--------------------------------------




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा