Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

सोमवार, १२ जानेवारी, २०२६

मकर संक्रांती निमीत्त महिलांनी बांगडी, चुडे, पाटल्या, मेहंदी, नकपाॅलीस तसेच विविध रंगी साड्या खरेदीसाठी बाजार पेठेत गर्दी

 *कार्यकारी संपादक एस. बी. तांबोळी मोबाईल नंबर 8378081147*


-मकर संक्रांती निमीत्त महिलांनी बांगडी, चुडे, पाटल्या, मेहंदी, नकपाॅलीस तसेच विविध रंगी साड्या खरेदीसाठी बाजार पेठेत गर्दी करण्यास सुरुवात केली आहे. यावर्षी मात्र संक्रांत पिवळ्या रंगात आल्याने त्या रंगाची खरेदी करण्याचे महिला टाळत आहेत.

   नरसिंहपूर परीसरातील पिंपरी बुद्रुक, बावडा, अकलूज, टेंभुर्णी येथील बाजारपेठेत महिलांच्या उपस्थितीमुळे मागील सहा महिन्यांपासून ठप्प झालेल्या बाजार पेठेतील आर्थिक हालचाल वाढल्याचे येथील व्यापारी मगनदास क्षिरसागर यांनी सांगितले. परंतू म्हणावी तशी मनसोक्त खरेदी करण्यात महिला हात आखडता घेताना दिसत असल्याचे बांगडी व्यापारी मुमताज फुलारी, बानूबाई तांबोळी यांनी सांगितले.

     यावेळी संक्रांत पिवळ्या रंगात आली असल्याने महिला हिरव्या रंगाच्या बांगड्या घालणे जास्त पसंत करत असल्याचे जस्मिन फुलारी यांनी सांगितले. तर साधे गोट, फॅन्सी गोट, सौंदर्य प्रसाधने, लाखेचे चुडे, पाटल्या, विविध रंगी खड्यांचे गोट खरेदी करण्याकडे महिलांचे लक्ष मोठ्या प्रमाणात आहे. गावोगावी ऊसतोड मजुरांच्या टोळ्यातील महिलांना दिवसभर काम करून संध्याकाळी खरेदीसाठी जाण्याची वेळ येते आहे.

     नीरा नरसिंहपूर परीसरातील आठवडे बाजारात भाजीपाल्यापेक्षा संक्रांतीचे साहित्य खरेदी करण्याकडे जास्त लक्ष दिले जात आहे. सर्व साहित्यांचे दर मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी जेमतेम १० ते २० रूपयांनी वाढ झाल्याचे शोएब तांबोळी यांनी सांगितले.

फोटो - अकलूज येथे संक्राती निमित्ताने खरेदीसाठी महिलांची बाजार पेठेत गर्दी.

---------------------------

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा