*मुख्यसंपादक -हुसेन मुलाणी*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-9730867448*
आद्य पत्रकार आणि दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचा यांचा जन्मदिवस म्हणजेच राज्यात सर्वत्र पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो त्या अनुषंगाने अकलुज येथे पत्रकार दिन मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला
या पत्रकार दिनानिमित्त अकलूज येथील उपजिल्हा रुग्णालयात अधीक्षक डॉक्टर ओवाळ सर आणि त्यांच्या सहकारी स्टाफ च्या वतीने पत्रकारांच्या पुष्प व पेन देऊन सत्कार करण्यात आला तसेच अकलूज पोलीस स्टेशन च्या वतीने पोलीस निरीक्षक निरज उबाळे आणि त्यांचे सहकारी अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या वतीने उपस्थित पत्रकारांचा डायरी ,पेन व पुष्प देऊन सत्कार करण्यात आला त्याचप्रमाणे शिक्षण प्रसारक मंडळ, सदाशिवराव माने विद्यालय च्या वतीने प्राचार्य अमोल फुले व शिक्षक वर्गाच्या वतीने पत्रकारांचा शाल व पुष्प देऊन सन्मान करण्यात आला तसेच अकलूज नगर परिषदेचे मुख्याधिकारी सुनील पाटील व नगरपरिषद कर्मचाऱ्यांच्या वतीने पत्रकारांचा सन्मान करण्यात आला
याप्रसंगी बोलताना पोलीस निरीक्षक नीरज उबाळे म्हणाले की आमच्याकडून काही चुका होत असतील किंवा आमचे कुठे चुकले असेल तर आपण आमच्या विरोधात अवश्य लेखणी चालवावी आणि बातमी छापावी कारण त्यामुळे आमच्या उणीवा आम्हाला कळतील आणि आम्ही त्यात सुधारणा करू आम्ही केव्हाही सुडबुद्धिने कारवाही करणार नाही आमचे कुठे चुकत असेल तर आपण अवश्य आम्हाला निदर्शनास आणून द्यावे आणि या माझ्या पाच सहा महिन्याच्या अकलूज पोलीस स्टेशन मधील कार्यकाळात पत्रकार बांधवांचे पोलीस प्रशासनाला मोलाचे सहकार्य लाभल्याचे त्यांनी अधोरेखित करुन पत्रकारांची प्रशंसा केली तसेच समाजात कुठे चुकीच्या घटना घडत असतील तर पत्रकारांनी तेही आमचे निदर्शनास आणून देऊन सहकार्य करावे अशी अपेक्षा व्यक्त केली तसेच पत्रकार दिनाच्या उचित साधून पत्रकार नागेश लोंढे यांच्या झालेल्या चोरीचा तपास करून मुद्देमाल पोलिसांनी याप्रसंगी त्यांच्या स्वाधीन केले
अकलूज येथील आयडीबीआय बँकेच्या वतीने उपजिल्हा रुग्णालयास किमान एक लाखाचे आरोग्य साहित्य भेट दिल्याने आयडीबीआय बँकेच्या अधिकाऱ्यांचा सन्मान उपजिल्हा रुग्णालय प्रशासना च्या वतीने करण्यात आला याचे अनुकरण इतर बँकांनाही करून उपजिल्हा रुग्णालया साठी आवश्यक असलेल्या भेटवस्तू देऊन मदत करावी असे याप्रसंगी डॉक्टर ओवाळ यांनी सांगितले
तसेच याप्रसंगी बोलताना सदाशिवराव माने विद्यालयाचे प्राचार्य अमोल फुले म्हणाले की शासनाच्या अनेक जाचक निर्बंधामुळे आम्हाला अध्यापन करताना तारेवरची कसरत करावी लागते तसेच शासनाच्या परिपत्रकाप्रमाणे विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास नाही झाला पाहिजे असे आदेश देण्यात आल्याने आम्ही विद्यार्थ्याला घडवू शकत नाही कारण विद्यार्थ्यांच्या मनात आदर युक्त भीती असेल तरच तो अभ्यास करेल व्यवस्थित वागेल परंतु यावर सर्व शासनाने बंधने आणल्याने यामध्ये विद्यार्थ्यांची नुकसान होणार असल्याचे सांगून याबाबतीत आम्ही वरिष्ठ स्तरावर तक्रार करून लढा लढत असल्याचे सांगितले तसेच काही विद्यार्थ्यांच्या वाढत्या अश्लीलव खोडकर वृत्ती वर शासनाच्या बंधनामुळे आम्ही त्याच्यावर आळा घालू शकत नाही
हे भयावह असून विद्यार्थ्यांचे जीवन उध्वस्त करणारा शासनाचानिर्णय असल्याचे ते म्हणाले तसेच पत्रकारांनी याबाबत लेखणी द्वारे विद्यार्थ्याबाबत शासनाच्या परिपत्रका मुळे होणारे दुष्परिणाम शासनाच्या निदर्शनास आणावे








कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा