*अकलूज --प्रतिनिधी*
*केदार लोहकरे*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
घरात किंवा घराच्या परिसरात साप निघाल्याचे समजताच नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होते.मात्र अकलूज येथील पत्रकार संजय लोहकरे यांच्या घराच्या परसबागेत नाग आसल्याचे निदर्शनास आल्यानंतर सर्प अभ्यासक प्रा.धनंजय देशमुख यांना फोन करून बोलवले होते पण ते बाहेर गावी असल्याने खंडाळी (ता.माळशिरस) येथील युवा सर्पमित्र प्रणव इंगवले देशमुख याला फोन करताच क्षणाचाही विलंब न करता तो कोणतीही भीती न बाळगता तो तत्काळ घटनास्थळी पोहचून अत्यंत शिताफीने अत्यंत विषारी असणा-या नाग या सापाला पकडून निसर्गाच्या सान्निध्यात सोडून दिला.त्यामुळे या परिसरातील लोकांमधील सापाबद्दलची भितीही नष्ट झाली.त्यामुळे मानव तसेच साप दोघांचाही जीव सुरक्षित राहिला आहे.
अकलूज परिसरातील घराच्या अंगणात,स्वयंपाकघरात,
शेतशिवारात,गोठ्यात किंवा कडेलोटाच्या भागात आढळणारे कोब्रा,मण्यार,अजगर,धामण यासारखे साप प्रा.धनंजय देशमुख आणि त्यांनी तयार केलेले ९ सर्पमित्र अत्यंत संयमाने व कौशल्याने पकडून त्यांच्या अधिवासात सोडून देतात.साप दिसताच ठार मारण्याची मानसिकता ग्रामीण भागात आजही मोठ्या प्रमाणावर आढळून येते.मात्र या सर्व सर्पमित्रांच्या सातत्यपूर्ण कार्यामुळे ही मानसिकता हळूहळू बदलू लागली आ
*चौकट...*
नागाचा रंग काळा,तपकिरी, ऑलिव्ह हिरवा किंवा पिवळसर असू शकतोफणा काढल्यावर पाठीवर चष्म्यासारखी किंवा 'U' आकाराची खूण दिसते.आकार व आयुष्य: नागाची लांबी साधारणपणे ३ ते १० फुटांपर्यंत असू शकते. स्वभाव: नाग स्वतःहून हल्ला करत नाहीत.भीती वाटल्यास किंवा डिवचल्यास ते फणा काढून उभे राहतात.नागाचे मुख्य अन्न उंदीर, बेडूक आणि इतर लहान कीटक आहेत.प्रजनन: नाग अंडी घालतात.
*प्रा.धनंजय देशमुख.*
सर्पमित्र व सर्प अभ्यासक






कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा