लेखन डॉक्टर,:- सलीम शाहिदा सिकंदर शेख
श्रीरामपूर, जिल्हा :- अहमदनगर
9271640014
रमजान मुबारक 2026
रोजा नं. 8वा ,
गुरुवार दिनांक, 26-02-2026
रोजा :,!!' तुम्हीं( स्वतः ) रोजा (उपवास ) करा ते तुमच्या साठी अधिक फायद्याचे आहेत ,
जर तुम्हीं हें समजलात तर !! ( दिव्य कुरआन 1 : 2 : 184).
उन्हामध्ये रोजे शारीरिक व मानसिक दृष्टीने खडतर परीक्षा घेणार, अध्यात्मिक फायदे मोजण्या पलीकडे आहेत, त्याबरोबर आरोग्य दायी फायदे तर अनेक हें जगातील अनेक देशात संशोधनातून सिद्ध केलेत. , रोजे ( उपवास ) होणार कसे??. प्रश्न -भरपूर असतात व असणार सुद्धा. उत्साहीं बंधूनी चंद्र कोर बघून वजन बघितली असतील - शारीरिक तपासणी, शुगर रेकॉर्ड, ब्लड प्रेशर, चरबी तपासून, थायरॉईड रिपोर्ट, विविध रिपोर्ट तपासून घेतले असतील, मल्टिनेशन कंपनीचे वजन( weight reducing )कमी करण्याचं 100% गॅरंटी देणारे प्रॉडक्ट, दहा पंधरा वर्षांपासून भारतात फ्याड आलेलं डाएटिंग, डाएट च, वेगवेगळे आहार तज्ञ वेगवेगळ्या प्रकारचे डाएट देतात कोणी दोन वेळा भरपूर जेवा मध्ये काहीच खाऊ नका, तर काही आहार तज्ञ सांगतात, दिवसभर ज्या कॅलरी (उषमांक ) लागतात, ते मोजून ठेवढे दिवसभर थोडं थोडं खा. असें भरपूर मजेशीर प्रयोग चालू असतात,त्यातूनच व्यवहार इस्पित. बुद्धी मान व्यवसायिक चैन सिस्टिम च्या अनेक स्किम्स... यातून साध्य काय?? रिझल्ट काय??. अनेकानां पडलेलं प्रश्न -कोडं.
उत्तर शोधता शोधता..शेवटी माथ्यावर हात मारणं...
आज जमाना फास्टफूड , इन्स्टंट चविष्ट खाण्याचा, त्याचं नुकसान कायिक पटीनें,( फॅट्स) चरबीचे अति प्रमाण, चवी साठी मिठाचं जास्त प्रमाण, शिजवण्याची पद्धती वेगळ्याच, त्यात सिनथेंटीक केमिकॅल चे प्रमाण जास्त, असें म्हणतात, चवी साठी घातलेल अझीनो मोटो डुकराच्या चरबी व हाडानी बनवलेले असतं. आरोग्यासाठी घातक, अर्थात आपल्याच शरीरावर, हृदय रोग, मधुमेह (डायबेटिस,) वजन वाढत, वजनांमुळे गुढग्यावर दवाब येऊन संधिवातचा , कमरेचा व मनके, हाडंचा त्रास, वजन वाढलं मधुमेह, ब्लड प्रेशर, पुष्कळ आजरांना स्वतः आमंत्रण देतात,
जमाना इंटरनेट चा,आय टी करियर करणाऱ्या इंजिनीरचं 14 तास कॉम्प्युटर समोरच सतत काम - मिटींगा , बॉस वारंवार मीटिंग साठी कॉल करतोय, नवीनच खूळपट काढून प्रॉब्लेमस उकरून काढतोय, असे अनेक प्रॉबलेम, नवीन फंडा वर्क फॉर हॉम -घरामध्ये काम करणाऱ्या IT इंजिनीर घरी असून देखील पारखे, घरातील एका बंदिस्त खोलीत आडवं -तिडवं शरीर करून -खुर्चीवर काम , त्यांना सतत काहींना इन्स्टंट चटपटीत खायची सवय, त्यांची गरज असती नाईलाज असतो म्हणून जरा जास्तच फास्टफूड खातात. बहुतेक IT इंजिनीर आपल्या कामाच्या व्यस्ततेमुळे गले लठ्ठ झालेले आपण बघतो, कारण फास्टफूड व शारीरिक हालचाल हा विषय च नाहीं. काम पुर्ण न झाल्याने येणार मानसिक आजार डिप्रेशन,
लवकरच येणारे अलझायमर आजार..
दैनंदिन कामाच्या व्यस्तते मुळे अपायकारक पद्धतीने केलेले अन्न पदार्थ खातोय, खुरमुरीत -चटपटीट -सटरबटर - जंक फूड खायची सवय लागलेली असते . आत्ताची भूक कशी घालवायची एवढंच डोक्यात असतं, कसलेही पदार्थ खाऊन स्वतःचे आरोग्य धोक्यात घालून आजार लावून घेतो, या सगळ्याचा दुष्परिणाम म्हणजे पचन संस्था बघडलेली असते. वारंवार बिघलेली असते म्हणून, bad cholesterol चे प्रमाण वाढल्या मुळे हृदय रोगाची शक्यता वाढलेली.
अमेरिकेत सतत 25 वर्ष झालेल्या विविध संशोधनातून हें सिद्ध झालं की उपवासातुन शरीर सर्वात अगोदर ऑटो (ऑटो )म्हणजे स्वतः फेजी ( fagy, )म्हणजे खाने.. अर्थातच स्वतः च स्वतःच्या खराब पेशी खाऊन टाकणं. म्हणजे आपलं शरीर नैसर्गिक रित्या आपल्या शरीरातील खराब बॅड उत्ती (डी एन अ ) पेशी हळू हळू खाऊन नवीन आरोग्यदायी पेशी तयार करत. याला ऑटो फेजी म्हणतात, यामुळे आपल्या शरीरातील कॅन्सर सारख्या पेशी हीं खाऊन टाकून नवीन पेशी तय्यार करते. अँटी इम्म्युन, अँटी कॅन्सर, अँटी दिसेस सेल तय्यार होतात.इम्युन सिस्टिमचे कार्य सुधारून कॅन्सर सेल फॉरमेशन थांबते फ्री रेडिकल चे दयामेज कमी करून इन्फलेमेटरी कंडिशन नियमित करते.सहा तासाच्या उपवासात शरीर सर्वात अगोदर ग्लुकोज ( शुगर )चा वापर करते म्हणून शरीरातील इन्सुलिन चे प्रमाण कमी होतं. आठ 8ते बारा (12) तसाच्या रोजा मुळे इन्सुलिन लेव्हल कमी होणं सुरू होऊन शरीरातील फॅट बर्निंग, ( जलन ) चालू होऊन आपली शुगर कमी होते. 12 -16 तासाच्या उपवास मध्ये इन्सुलिन रेजीजस्तन कमी होत जावून शरीरातील पेशी मसलस मधील चरबी जळून त्याला व्यस्थीत आकार येण्यास सुरुवात होऊन शुगर कमी होतं त्यामुळे मधुमेह खास टायप एक मधुमेही आजार कंट्रोल मध्ये राहतं. पुढे इन्सुलिन बरोबरच सॉल्ट ची मात्रा कमी कमी होऊन चरबी चे प्रमाण कमी होऊन बॅड कॉलिस्टरोल चे प्रमाण कमी होत जावून ब्लड प्रेशर, रक्तदाब कमी होऊन हृदय रोग कमी होतात, ब्याड कोलेस्टरोल (bad cholesterol ) चे प्रमाण कमी होऊन हृदयाची क्षमता वाढते, स्ट्रोक्र,( कार्डीयक )हृदय रोग धोका कमी होण्यास मदत होते. ब्रेन दिरॉईड ने्युरोट्रॉफीक फॅक्टर BDNF प्रोटीन वाढून मेंदूची गती वाढून अलझायमर, डिप्रेशन Anxianty सारखे विकार कमी होतात.. सर्वात जास्त फायदा फाट्टी लिव्हर अर्थात याकृत ला फायदा होतो.
पचन संस्था ( digestive system ) व्यवस्थित होण्यास मदत होते, बहुतेक संशोधकानी विविध प्रयोग करून बघितलं तर त्यांच्या लक्षात आले, 12-14 तासाचे रोजा (उपवास )ठेवल्यास पचन संस्थेला काही प्रमाणात अराम भेटून त्यामुळे शरीरात नैसर्गिक पणे आदिपोनेक्टिन हार्मोन्स चे प्रमाण जास्त होते, आणि हेच Hormones हार्मोन्स अन्नातील पौष्टिक घटक पचविण्यास मदत करते.मेटाबॉलिझम ची गती वाढते. त्यामुळे कॅलरी बर्न करण्यास संधी मिळते.लॉंगीटीव्हिटी वाढ होतें, रोजा नें शरीराचे नैसर्गिक डेटॉक्स होतें.
जपान मध्ये एक नवीनच संशोधन जपान च्या शरीर शास्त्र चे संशोधक योशिनोरो ओसुनी "AUTO FEGO" चा " ऑटो फेजी "सिद्धांत मांडला, " ऑटो फॅगो "हा ग्रीक शब्द म्हणजेच "स्वतः ला खाऊन टाकणं " सतत उपाशी पोटी राहिल्याने शरीरातील नॉर्मल पेशी ह्या शरीरातील अतिरिक्त वाढलेल्या चरबी ( fats )ना स्वतः खाऊन टाकून नष्ट करतात, यालाच ऑटो फेगो म्हणतात. आपल्या शरीरातील घातक अपाय कारक पेशी cell ज्यामध्ये कॅन्सर सारख्या हीं कदाचित असू शकतात, तर अशा पेशी ही नष्ट होतात. ही प्रक्रिया रामजानुल मुबारक रोज्या (सतत उपवास करण्यामुळे )मध्ये घडून येत असते. संशोधन तर आजच्या युगात झालं परुंतु याचे फायदे अल्लाह( परमेश्वर भगवंत ) नें प्रेषित मुहम्मद स्व. यांनी 1450 वर्षां पूर्वीच सांगितलं होतं.
मानवी कल्याण कारी संशोधन करणाऱ्या जपान च्या योशिनोरी ओसुनी यांना 2016 मध्ये नोबेल पारितोषिक देवून गौरव करण्यात आलं. ते गरजेचं हीं होतं.
म्हणून साथी नों आपल्या कामाचं योग्य नियोजन करून आज आयती संधी आलेलीच आहेत म्हणून लगातार तीस रोजा ( उपवास ) करण्याची संधी आलेली आहेत सतत रोजे ठेवून आपलं इस्पित वजन कमीत कमी करून, आरोग्याचे बरेच फायदे होतात . महिना भर तर संधी आहेत कारण मनुष्य हा सामूहिक गोष्टी नां जास्त प्राधान्य देत असतो, आशियाई मंडळी तर एक दुसऱ्याला बघून अनुकरण करतो, एकमेकांना बघून पुढे पुढे जाण्याची ओढ स्पर्धा शर्यत लागलेली असते तर आजच्या रमजान च्या रोजा (उपवासा) ची स्पर्धेत भाग पार्टीसिपीट करून आपल्या शारीरिक क्षमता वाढविण्याच्या स्पर्धेत हीं बाजी मारणं किती फायद्याचं राहील.
नियोजन वर्षेभरासाठी केलं, आठवड्यात एक रोजा (उपवास) ठेवून, आपल्या भारतीय समाजात सोमवार, मंगळवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, एकादशी शिवरात्री चतुर्थी आपल्या श्रद्धा असलेल्या देवी देवता नुसार एक उपवासाच्या पद्धती आहेतच तर त्याचं व्यवस्थित नियोजन करून वजन कमी करून पुन्हा वाढणार नाहीत याची वर्षभर काळजी घेतली तर वजना बरोबर असंख्य आरोग्यदायी फायदे होतील .
पैगंबर मुहम्मद स्व. हें स्वतः वर्षभर प्रत्येक महिन्यात सोमवार व गुरुवार चा व महिन्यातील 13 व 14 वा रोजा (उपवास )करीत असत.काही बंधू हीं पैगंबर मुहम्मद स्व च्या सुन्न त चा आदर्श म्हणून असेच (रोजे उपवास ) ठेवतात.
दिव्य कुरआन सांगते, "पण तुम्ही स्वतः रोजा (उपवास ) करा ते तुमच्या साठी फायदेचे राहील, जर तुम्ही हें समजलात तर "
(मित्रांनो लेख आवडला तर मित्र व नातेवाईकांना जरूर पाठवा, त्यांनाही निश्चित फायदा होईल - प्रतिक्रिया कळवा )
लेखन डॉक्टर,:- सलीम शाहिदा सिकंदर शेख
बैतुशशिफा मल्टिस्पेसिलिटी हॉस्पिटल,
श्रीरामपूर, जिल्हा :- अहमदनगर
9271640014





कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा