*करमाळा, तालुका --प्रतिनिधी*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-9850686360*
करमाळा प्रतिनिधी
कर्जत जामखेड तालुक्याचे आमदार रोहित दादा पवार यांना सध्या झेड प्लस कॅटेगिरी ची सुरक्षा देण्यात यावी अशी मागणी आमदार रोहित दादा पवार यांचे कट्टर समर्थक तसेच रोहित दादा पवार फाउंडेशन चे करमाळा तालुका अध्यक्ष मुस्तकीम उर्फ एम डी पठाण यांनी राज्याचे मुख्यमंत्री मा. श्री देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री मा. श्री एकनाथ रावजी शिंदे यांच्याकडे एका लेखी निवेदनाद्वारे केली आहे
राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांना पाठवलेल्या निवेदनात श्री पठाण यांनी म्हटले आहे की महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित (दादा) पवार यांच्या विमान दुर्घटनेतील अपघाती मृत्यूची सखोल व निष्पक्ष चौकशी सीबीआय मार्फत होऊन सत्य जनतेसमोर यावे, ही राज्यातील जनतेची व कार्यकर्त्यांची तीव्र भावना आहे. संबंधित विमान दुर्घटना ही केवळ अपघात होता की घातपात, याचा सखोल उलगडा व्हावा यासाठी महाराष्ट्र राज्याचे युथ आयकॉन आ.रोहित (दादा) पवार हे स्वतःच्या जीवाची पर्वा न करता सातत्याने व निर्भीडपणे लढा देत आहेत. असे निवेदनात म्हटले आहे
निवेदनात पुढे आणखीन असे म्हटले आहे की
त्यांच्या या ठाम भूमिकेमुळे त्यांच्या जीवितास संभाव्य धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. राज्यातील सध्याच्या संवेदनशील परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने तातडीने Threat Assessment करून त्यांना ‘Z+’ दर्जाची सुरक्षा प्रदान करण्यात यावी अशी मागणी रोहित दादा यांचे निष्ठावंत व रोहित पवार फाऊंडेशन.करमाळा तालुकाध्यक्ष मुस्तकीम ऊर्फ एम डी पठान यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मागणी केली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजित दादा पवार यांच्या विमान दुर्घटनेतील घटनेची सखोल व सीआयडीमार्फत त्वरित चौकशी करण्यात यावी व सत्य जनतेसमोर लवकरात लवकर आणावे अशी मागणी ही श्री पठाण यांनी निवेदनाच्या शेवटी केली आहे
स्वर्गीय अजितदादा पवार यांचे विमान अपघात आजही महाराष्ट्र राज्यातील जनतेच्या मनात कायमस्वरूपी आठवणीत असून अशा या नेत्याच्या विमान अपघाताची सखोलपणे व निपक्षपातीपणे सीबीआय मार्फत चौकशी होऊन संबंधितांना त्वरित कठोर शिक्षा व्हावी व याबाबत वेळोवेळी आवाज उठवणारे आमचे नेते आमदार रोहित दादा पवार यांना राज्य शासनाने झेड कॅटेगिरी ची सुरक्षा पुरवावी अशी मागणी ही श्री पठाण यांनी केली आहे
यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष जमिर भाई सय्यद, रमजान बेग, अमोल सुरवसे, आमिर सय्यद, जावेद पठान, सारंग परदेशी, जगदीश शिंदे, गणेश कोकाटे, अभिजीत चव्हाण, नागेश कांबळे यांच्यासह बहुसंख्य कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.





कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा