*करमाळा-- तालुका प्रतिनिधी*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-9850686360*
सवितादेवी राजेभोसले ह्या संधीसाधू असून राजकीय निष्ठेपासून त्या कोसो मैल दूर आहेत अगोदर आपल्या मुलाला गावच्या एका प्रभागात निवडून आणुन दाखवा आणि मग तालूकापातळी नेत्यांना आवाहन द्या,असा हल्लाबोल पाटील गटाचे सोशल मीडिया प्रमुख संजय फडतरे यांनी माजी जिल्हा परिषद सदस्या सवितादेवी राजेभोसले यांचेवर केला. करमाळा तालूका विकास आघाडीकडून उमेदवारी दिली गेली नसल्याने मोहिते पाटील गटाच्या सवितादेवी राजेभोसले यांनी कोर्टी जिल्हा परिषद गटातील उमेदवार वनीताताई गुळवे यांचा प्रचार सुरू केला. केतुर ता करमाळा येथील सभेत बोलताना त्यांनी विद्यमान आमदार नारायण आबा पाटील यांच्या वर टिका केली. या टिकेस आज पाटील गटाकडून उत्तर देण्यात आले. यावेळी बोलताना पाटील गटाचे सोशल मिडीया प्रमुख संजय फडतरे यांनी सांगितले की सवितादेवी राजेभोसले ह्या कट्टर मोहिते पाटील समर्थक असतानाही त्या सध्या माजी आमदार संजयमामा शिंदे गटाकडून उमेदवारी मिळालेल्या वनीता सुभाष गुळवे यांचा प्रचार करीत आहेत. सोलापूर जिल्ह्यातील इतर तालूक्यात मोहिते पाटील यांच्या विरोधी गटाचे नेतृत्व माजी आमदार संजयमामा शिंदे हे करत असताना करमाळा तालुक्यात सविता राजेभोसले यांनी घेतलेली भुमिका ही त्यांच्या मोहिते पाटील यांच्या वर असलेल्या निष्ठेवर शंका घ्यावी अशीच आहे. मुळात सवितादेवी राजेभोसले यांना उमेदवारी देण्यास आमदार नारायण आबा पाटील हे कायमच सकारात्मक राहीले होते. आमदार पाटील यांनी सवितादेवी राजेभोसले यांची उमेदवारी सुध्दा जाहीर केली होती. परंतू त्यावेळी त्यांनी करमाळा तालूका विकास आघाडी कडून उमेदवारी अर्ज दाखल न करता राष्ट्रवादी कडुन आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. विशेष म्हणजे त्यांनी प्रसिद्धी माध्यमातून सुध्दा ही माहिती मतदारांना दिली. त्यावेळी आपण मोहिते पाटील एकनिष्ठ आहोत हे दाखवण्याचा त्यांनी प्रयत्न केला. पण अवघ्या एकदोन दिवसात त्यांनी आपली भुमिका बदलली व मोहिते पाटील विरोधक असलेल्या संजयमामा शिंदे यांच्या गटाचा प्रचार सुरु केला आहे. सवितादेवी राजेभोसले ह्या संधीसाधू असून राजकीय निष्ठेपासून त्या कोसो मैल दूर आहेत.गेल्या सात आठ वर्षांपासून कोर्टी जिल्हा परिषद गटात सवितादेवी राजेभोसले यांच्या बद्दलच्या तक्रारीत वाढच होत राहीली असून त्यांची विश्वासार्हता पुर्णपणे संपली आहे. पण तरीही त्यांना उमेदवारी दिली असती तर विरोधी उमेदवार हा कोणताही प्रचार न करता अगदी घरी बसुन निवडुन आला असता. मुळात सवितादेवी राजेभोसले ह्या जिंती येथील एका प्रभागातुन स्वतःच्या मुलाला सुद्धा निवडुन आणु शकत नाहीत. त्यामुळे त्यांनी आमदार नारायण आबा पाटील यांना राजकीय जागा दाखवून देण्याची भाषा करु नये. इथुन पुढे सवितादेवी राजेभोसले ह्या ग्रामपंचायत पासुन ते जिल्हा परिषदे पर्यंत एकाही पदावर निवडुन आल्या नाहीत पाहिजे याची पाटील गट दक्षता घेणार असुन भविष्यात त्या कोणत्याच राजकीय पदावर असणार नाहीत असा सुचक इशाराही संजय फडतरे यांनी दिला आहे.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा