Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

रविवार, १ फेब्रुवारी, २०२६

*लोहार समाज बहुउद्देशिय संस्था पुणे यांचा "उद्योगरत्न पुरस्कार" 'प्रल्हाद नवगन 'यांना जाहीर* *१ फेब्रुवारीला करण्यात येणार प्रदान*

 *संपादक -*

*टाइम्स 45 न्यूज मराठी*

*मो:-9730867448*


*लोहार समाज बहुउद्देशीय संस्था पुणे यांच्या वतीने दरवर्षी  उद्योजकांना दिला जाणारा उद्योग रत्न पुरस्कार या वर्षी अकलुज (जि. सोलापूर) येथील उद्योजक श्री प्रल्हाद अंबादास नवगण यांनी पटकावला आहे.* 

*डिसेंबर महिन्यात संस्थेच्या वतीने या पुरस्कारांसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले होते. या पुरस्कारासाठी संस्थेचे निवड समितीने केलेल्या शिफारशीनुसार संस्थेने वरील मान्यवरांची शैक्षणिक पात्रता, अनुभव आणि अनुक्रमे* *सामाजिक, कला, शिक्षण, उद्योग क्षेत्रातील सहभाग लक्षात घेऊन त्यांची लोहार समाज बहुउद्देशीय संस्था पुणे यांचा मानाचा* *उद्योगरत्न पुरस्कारांसाठी महाराष्ट्र राज्यातून निवड केली आहे. संस्थेचे वतीने अध्यक्ष बाळासाहेब शेलार यांनी त्यांचे अभिनंदन केले. संस्थेच्या वतीने रविवार दि. १ फेब्रुवारी २०२६ रोजी भोसरी (पिंपरी चिंचवड) येथील गोविंद गार्डन मंगल कार्यालयात होणाऱ्या विश्वकर्मा जयंती महोत्सवात प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सदर पुरस्कार प्रदान केला जाणार आहे.* 

*प्रल्हाद नवगण यांना अनेक राज्यस्तरीय पुरस्काराणे सन्मानित करण्यात आले आहे. आविष्कार फाउंडेशन यांच्या वतीने मुबई येथे समाज भूषण पुरस्कार खासदार संजय राऊत, आमदार मंगल प्रभात लोढा, माजी न्यायाधीश नागपूर व फाउंडेशनचे अध्यक्ष संजय पवार कोल्हापूर यांच्या हस्ते मिळाला आहे. तसेच जालना येथे समाज भूषण माजी जिल्हाधिकारी यांचे हस्ते व गोवा येथे आमदार गोविंद गावडे यांच्या हस्ते उत्कृष्ट उद्योजक तसेच सोलापूर येथे सहाय्यक पोलीस आयुक्त दीपक आर्वे साहेब यांच्या हस्ते उद्योग श्री पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे,असे अनेक पुरस्कार मिळाले आहेत.*

 *सन्मान सामाजिक आणि औद्योगिक क्षेत्रातील योगदानाला प्रोत्साहन देतो.*

     *उद्योग क्षेत्रातील आपल्या उल्लेखनीय कामगिरीचा आणि सामाजिक बांधिलकीचा हा बहुमान अत्यंत अभिमानास्पद आहे. ही यशोगाथा भविष्यात अधिक प्रगतीसाठी प्रेरणादायी ठरो, पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा मित्र परिवार व लोहार समाज बांधवांनी दिल्या.*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा