Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

बुधवार, १८ फेब्रुवारी, २०२६

*करमाळा तालुका पत्रकार संघाच्या सल्लागार व मार्गदर्शक पदी ज्येष्ठ "पत्रकार --अलीम शेख" यांची निवड*

 *करमाळा प्रतिनिधी*

*टाइम्स 45 न्यूज मराठी*



करमाळा तालुका पत्रकार संघा च्या सल्लागार व मार्गदर्शक पदी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे प्रांतिक सदस्य तसेच करमाळा तालुका पत्रकार संघाचे माजी उपाध्यक्ष अलीम शेख यांची निवड करण्यात आली आहे सदरची निवड करमाळा तालुका पत्रकार संघाच्या बैठकीमध्ये करण्यात आली सदर ची निवड नवोदित पत्रकाराच्या बैठकीमध्ये सर्वानुमते एकमताने करण्यात आली 

करमाळा तालुका पत्रकार संघाचे मार्गदर्शक ज्येष्ठ पत्रकार अलीम महंमदशरीफ शेख हे गेली 35 वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रात निर्भीडपणे कार्य करीत आहे त्यांनी आजपर्यंत विविध दैनिकांमध्ये प्रतिनिधी मधून उत्कृष्टपणे काम केले आहे सध्या ते राज्यस्तरावरील विविध नामांकित दैनिकांमध्ये प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे  महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या राज्य कार्यकारिणीवर सदस्य म्हणून देखील ते कार्य करीत आहे त्यांनी गेली काही वर्षापासून सर्व दैनिकांमध्ये वृत्तपत्र लेखक म्हणून देखील कामगिरी बजावली आहे त्यांचा पत्रकारितेमधील दांडगा अनुभव व त्यांना आज पर्यंत विविध सामाजिक संस्थेने दिलेले आदर्श पत्रकार पुरस्कार यामुळे त्यांची करमाळा तालुका पत्रकार संघाच्या सल्लागार तसेच मार्गदर्शक पदी सर्व पत्रकाराच्या ठरावानुसार एकमताने निवड करण्यात आली 

करमाळा तालुका पत्रकार संघाच्या सल्लागार तसेच मार्गदर्शक पदी ज्येष्ठ पत्रकार आलिम शेख यांची निवड झाल्याबद्दल त्यांचे विविध स्तरातून अभिनंदन होत आहे

करमाळा तालुका पत्रकार संघाच्या माध्यमातून आम्ही करमाळा शहरात पत्रकार बांधवांसाठी नवीन पत्रकार भवनासाठी तसेच पत्रकारांच्या अडी अडचणी सोडविण्यासाठी शासकीय दरबारी प्रयत्न करणार असल्याचे ज्येष्ठ पत्रकार अलीम शेख यांनी बोलताना सांगितले

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा