*मुख्यसंपादक*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-9730867448/*
*9421577488*
शहरातील ब्रिटीशकालीन पोलीस वसाहतीचा प्रश्न अनेक वर्षापासून रखडलेला असून लवकरच मार्गी लागणार असल्याची माहिती सोलापूर जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी माळशिरस पोलीस ठाण्याला भेट दिल्यानंतर पत्रकारांशी बोलताना दिली .पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी आज माळशिरस पोलीस ठाण्याला भेट दिली. यावेळी त्यांनी परिसराची केली. यावेळी अकलूज विभागीय पोलीस अधिकारी संतोष वाळके पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विकास दिंडुरे सहा पो नि सुनिल जानकर,संदीप गोसावी पो नि स्वाती पवार उपस्थित होते
माळशिरस शहरातील मध्यवर्ती ठिकाणी पोलीस ठाण्यांनी मोठी जागा असून या जागेत पोलीस ठाणे ,व पोलिसांना राहण्याची ब्रिटीश कालीन वसाहत होती.या पोलीस ठाण्याची व वसाहतीची अनेक वर्षापासून दुरावस्ता झाल्यानंतर या.ठिकाणी पोलीस ठाण्यासाठी इमारत बांधण्यात आली परंतु पोलिसांच्या वसाहतीचा प्रश्न अनेक वर्षापासून प्रलंबित राहिला आहे. वसाहत नसल्याने अनेक पोलीस कर्मचारी शहराबाहेर रहातआहेत. या ठिकाणी नातेपुते व माळशिरस पोलिसांच्या सोयीच्या दृष्टीने अत्याधुनिक सुविधा असणारी वसाहत तयार करण्यात येणार असल्याने पोलीस कर्मचाऱ्यांचा राहण्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे.यावेळ अतुल कुलकर्णी यांनी डीजे मुक्त सोलापूर जिल्हा जाहीर केला असल्याने आगामी सर्व कार्यक्रमात डीजेचा वापर करू नये असे आवाहन केले.
त्यांनी वसाहतीची पाहणी केल्यानंतर अकलूज विभागीय पोलीस अधिकारी संतोष वाळके यांना संबधित विभागाशी संपर्क करून ही जुनी वसाहत पडण्याची सूचना दिली तसेच भितीच्या कडेला झाडांची लागवड करण्याची सूचना दिल्या
पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी प्रशिक्षणार्थी पोलीस अधीक्षक म्हणून पहिल्यांदा माळशिरस पोलीस ठाण्याचे अधिकारी म्हणून काम केले होते. त्या काळात त्यांनी अनेक गुन्ह्यांची उकल करून कायदा व सुव्यवस्था व्यवस्थित ठेवली होती. या कालावधीत त्यांनी परिसरातील स्वच्छता करून अनेक वृक्षांची लागवड केली यावेळी भेट देताच त्यांनी स्वतः लागवड केलेल्या झाडांची पाहणी केली .वाढलेली झाडे पाहून त्यांना झालेला आनंद व झाडांखाली फोटो घेण्याचा मोह आवरला नाही.त्यांनी पत्रकारांशी मनमुराद गप्पा मारल्या .






कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा