*करमाळा-- तालुका प्रतिनिधी*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-9850686360*
*वडशिवणे सारख्या छोट्याशा खेडेगावातून डॉ. भगवंत ने मिळवलेले दैदीप्यमान यश परिसरातील विद्यार्थ्यांसाठी निश्चितच प्रेरणादायी ठरेल असे मत जगप्रसिद्ध प्लॅस्टिक सर्जन डॉक्टर विठ्ठल लहाने यांनी व्यक्त केले वडशिवणे येथे दिनांक 1 फेब्रुवारी रोजी डॉक्टर भगवंत पवार यांना शालेय जीवनामध्ये लाभलेल्या शिक्षकांचा सन्मानार्थ कृतज्ञता सोहळा आयोजित करण्यात आलेला होता भगवंत पवार यांचे शिक्षण वडशिवणे या छोट्याशा खेडेगावात जिल्हा परिषद शाळेत व व माध्यमिक शिक्षण अजित दादा पवार विद्यालय वडशिवणे या ठिकाणी मराठी माध्यमातून पूर्ण झाले.
अकरावी बारावी सायन्स सोनवणे कॉलेज उकडगाव इथून पूर्ण केले नीट परीक्षेत *पहिल्याच प्रयत्नात 720 पैकी 645 गुण घेऊन त्याने एमबीबीएस साठी एम्स हैदराबाद या ठिकाणी प्रवेश मिळवला. एमबीबीएस पूर्ण करत असताना चार गोल्ड मेडल मिळवून ते टॉपर राहिले एमबीबीएस नंतर एमडी साठी घेतल्या जाणाऱ्या परीक्षेत देशात 668 वी रँक प्राप्त करत त्यांची एमडी शिक्षणासाठी हैदराबाद या ठिकाणी निवड झाली यासोबतच यूपीएससी सीएमएस ची परीक्षा देऊन ते देशात 25 व्या रँक नेउत्तीर्ण झाले एका खेड्यातील शेतकरी पुत्राने हे मिळवलेले यश पाहून समस्त ग्रामस्थांतर्फे त्याच्या शिक्षकांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आलेला होता. याप्रसंगी जगप्रसिद्ध प्लास्टिक सर्जन डॉक्टर विठ्ठल लहाने हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री संजीव सोनवणे हे होते याप्रसंगी उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनोज राऊत, यश कल्याणी सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष गणेश भाऊ करे पाटील , प्राध्यापक संजय चौधरी, प्राचार्य ठोंबरे सर, उद्योजक सुनील शेठ कदम, प्रसिद्ध लोक व्याख्यानकार प्राध्यापक विशाल गरड, उद्योजक सोमनाथ खराडे, ह भ प ढगे महाराज, गोमाता मंदिर केमचे(गोसेवक )श्री परमेश्वर तळेकर, श्री गोविंद जगदाळे सर, प्राचार्य पांचाळ सर, सुभाष पवार, भूषण शेठ लुंकडआदी मान्यवर उपस्थित होते याप्रसंगी भगवंत ला शालेय जीवनामध्ये लाभलेले अंगणवाडी ताई पासून प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे सर्व शिक्षक वृंद यावेळी आवर्जून उपस्थित होते सर्व शिक्षकांचा श्री विठ्ठलाची मूर्ती व भगवद्गीता भेट देऊन सन्मान करण्यात आला
या कार्यक्रमा साठी परिसरातून हजारोंचा जनसमुदाय उपस्थित होता हा सन्मान पाहून सर्व गुरुजन अक्षरशः भारावून गेले होते याप्रसंगी श्री मनोज राऊत साहेब, डॉक्टर खरात, श्री गोविंद जगदाळे सर प्राध्यापक विशाल गरड, श्री सोनवणे सर, चौधरी सर आदींनी मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी *यशकल्याणी सेवाभावी संस्थेतर्फे डॉक्टर भगवंत यांना करमाळा भूषण पुरस्कार देऊन सन्मानचिन्ह व मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले*. *कार्यक्रमासाठी डॉक्टर लहाने सर उपस्थित राहिल्यामुळे त्यांच्या प्रेरणादायी व्याख्यानाने सर्व उपस्थित लोकांची मने जिंकली* *व कार्यक्रमास अतिशय छान शोभा आली. सर्व उपस्थित गुरुजनांचे ऋण डॉ. भगवंत यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केले .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन साईनाथ देवकर गुरुजी व श्री नागनाथ मोरे सर यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री गणेश पवार यांनी व्यक्त केले*.
*या कार्यक्रमाचे चित्रीकरण*
*गोसेवक श्री परमेश्वर तळेकर*
*गोमाता मंदिर केम*
*मो 9850464760/8766469433*
______________________________________________''____







कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा