*अकलूज --प्रतिनिधी*
*केदार लोहकरे*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
महाराष्ट्र राज्य जनसेवा संघटना यांचे वतीने जनसेवा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ.धवलसिंह प्रतापसिंह मोहिते-पाटील यांचे मार्गदर्शनाखाली सहकार महर्षी कै.शंकरराव नारायणराव मोहिते-पाटील यांच्या ४७ व्या पुण्यतिथीनिमीत्त अकलूज येथील सदुभाऊ सांस्कृतिक भवन येथे भव्य चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
या चित्रकला स्पर्धेचे उद्घाटन जनसेवा संघटनचे मार्गदर्शक माणिकराव मिसाळ यांचे हस्ते सहकार महर्षी कै.शंकरराव मोहिते-पाटील व लोकनेते स्वर्गीय प्रतापसिंह शंकरराव मोहिते-पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले.या स्पर्धेत ४५०० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.यावेळी मार्गदर्शन करताना जनसेवा संघटनेचे सरचिटणीस सुधीर रास्ते म्हणाले विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव मिळावा या प्रामाणिक हेतुने जनसेवा संघटनेचे संस्थापक लोकनेते स्वर्गीय प्रतापसिंह मोहिते-पाटील यांनी १९८० साला पासून हा चित्रकला स्पर्धेचा उपक्रम चालू केला असुन महाराष्ट्र राज्य जनसेवा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ.धवलसिंह मोहिते-पाटील यांचे मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा आजतागायत सुरू आहे.गेली ४६ वर्ष ही स्पर्धा अखंडितपणे चालु असुन या चित्रकला स्पर्धेमध्ये सुमारे २ लाख ५० हजार पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला आहे.या चित्रकला स्पर्धेत सहभागी झालेले अनेक विद्यार्थी आज चित्रकला विषयाचे शिक्षक झाले आहेत असे सांगितले.
या स्पर्धा एकुण १२ केंद्रावर घेण्यात आल्या होत्या.सुमारे ४५०० विद्यार्थ्यांनी चित्रकला स्पर्धेत सहभाग घेतला होता.या कार्यक्रमास जनसेवा संघटनेचे जेष्ठ नेते काकासाहेब इनामदार, सदाशिवराव माने विद्यालयाचे मुख्याध्यापक अमोल फुले, उपमुख्याध्यापक दत्तात्रय घंटे, जनसेवा संघटनचे सचिव विलासराव लोंढे,दिपक सुत्रावे, विकास शिंदे,तानाजी काशीद, सिद्धनाथ टिंगरे,दत्ता शिंदे, प्रतापराव कोकीळ,फिरोज देशमुख,राहुल जाधव,अरुण शहाणे,इस्लाम पटेल उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन दिग्विजय जाधव सर यांनी केले.






कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा