Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

बुधवार, ११ फेब्रुवारी, २०२६

मिनी आमदारकीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचा ऐतिहासिक, न भूतो न भविष्यती असा विजय, इंदापूर च्या मतदारांची उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांना मतदान रूपी श्रद्धांजली. बावडा गटातून अंकिता पाटील ठाकरे यांचा सर्वाधिक मतांनी विजय.

 इंदापूर, डॉ. संदेश शहा.

टाईम्स 45 न्यूज मराठी सहसंपादक मो. ९९२२४१९१५९



इंदापूर तालुक्यातील 

जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस ने ऐतिहासिक, न भूतो न भविष्यती असा विजय संपादन करून तालुक्यात निर्विवाद सत्ता मिळवली. केंद्रात, राज्यात सत्ता असताना देखील या निवडणुकीत भाजपाचे कमळ फुलविण्यास स्थानिक नेत्यांना अपयश आले.  इंदापूरच्या मतदारांनी भरघोस मतांच्या रुपाने उपमुख्यमंत्री दिवंगत अजित पवार यांना आदरांजली वाहिली असल्याचे निकाला वरुन सिद्ध झाले आहे. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी इंदापूरच्या विकासा साठी दिलेले योगदान, निवडणुकी दरम्यान त्यांचे विमान अपघातात झालेले दुर्दैवी निधन, राज्याचे मंत्री दत्तात्रय भरणे यांनी तालुक्याच्या विकासासाठी आणलेला भरघोस निधी, मार्गी लावलेली विकासकामे, त्यास माजी मंत्री हर्षवर्धन पाटील तसेच पुणे जिल्हा बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे यांची मिळालेली समायोचित साथ त्यामुळे तालुक्यात सर्वत्र घड्याळाची टिकटिक वाढून सर्वत्र राष्ट्रवादीचा झेंडा फडकला आहे. राष्ट्रवादीस सर्व जागी निर्विवाद विजय मिळाला असताना देखील विजयाचा जल्लोष न करता विजयी उमेदवार व कार्यकर्त्यांनी स्वर्गीय अजितदादा पवार यांना आदरांजली वाहणे पसंद केल





निवडणूक काळात ज्यांनी उमेदवारीसाठी भाजपला जवळ केले होते, त्यांचा जनतेने प्रचंड पराभव केला. या निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादीचे मनोमिलन झाल्याचे दिसून आले, त्यांचे काम संघटित झाल्याचे दिसून इंदापूर तालुका हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला असल्याचे सिद्ध झाले.  विशेष म्हणजे अजितदादा पवार यांची इच्छा केंद्रबिंदू मानून इंदापूर तालुक्यात एकमेकाचे कट्टर राजकीय विरोधक असलेले मंत्री दत्तात्रय भरणे व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी खांद्यास खांदा लावून ही निवडणूक लढवली. मतदारांना ही राजकीय युती आवडल्याचे निवडणूक निकाला वरून स्पष्ट झाले आहे. विशेष म्हणजे हर्षवर्धन पाटील यांची कन्या सौ. अंकिता पाटील ठाकरे या बावडा जिल्हा परिषद गटातून दुसऱ्यांदा विजयी झाल्या आहेत तसेच त्यांना विजयाची सर्वाधिक मते पडली आहेत. मंत्री दत्तात्रय भरणे यांचे चिरंजीव श्रीराज भरणे हे बोरी पंचायत समिती गणातून पहिल्यांदाच निवडणूक लढवून विजयी झाले आहेत. जिल्हा बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे यांचे चिरंजीव यशराज जगदाळे यांनी वडापुरी माळवाडी गटातून विजयी होऊन आपला राजकीय श्री गणेशा केला आहे. पदार्पणातच त्यांनी पंचायत समितीचे माजी सदस्य सतीश पांढरे यांचा पराभव केला आहे. श्रीमंत ढोले यांची जिल्हा परिषद सदस्य म्हणून पूर्वी उजवी कारकिर्द झाली होती. आता काटी लाखेवाडी या नव्या गटातून ते विजयी होत त्यांनी विजयी पताका फडकवली आहे. त्यांनी निरा भीमा कारखान्याचे माजी उपाध्यक्ष तसेच पंचायत समितीचे माजी सभापती विलासराव वाघमोडे यांचा पराभव केला आहे.




    या निवडणुकीत भिगवण गटात मेघना तुकाराम बंडगर विजयी झाल्या. पळसदेव बिजवडी जिल्हा परिषद गटातून वजनदार नेते दीपक जाधव यांच्या पत्नी हर्षदा जाधव या विजयी झाल्या. निमगाव केतकी शेळगाव गटातून कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तुषार जाधव यांच्या पत्नी सोनाली जाधव विजयी झाल्या. तर बोरी वालचंदनगर गटातून संजय गांधी निराधार योजनेचे माजी तालुकाध्यक्ष सागर मिसाळ यांच्या पत्नी निर्मला मिसाळ विजयी झाल्या. 




 भिगवण गणातून हेमा पद्माकर माडगे यांनी तर शेटफळगढे गणातून जितेंद्र प्रल्हाद वणवे यांनी विजय मिळवला. बिजवडी गणात दिलीप माणिक भिसे हे विजयी झाले. पळसदेव गणा तून किर्ती प्रवीणकुमार काळे विजयी झाल्या. माळवाडी गणातून मौजे शहा गावचे माजी सरपंच विष्णू पाटील यांच्या पत्नी कल्पना विष्णू पाटील तर वडापुरी गणातून भाटनिमगावचे सरपंच अजित खबाले यांच्या पत्नी अर्चना अजित खबाले विजयी झाल्या.  वालचंदनगर गणातून पंचायत समितीचे माजी सभापती डॉ. नंदकुमार सोनवणे यांच्या पत्नी अनिता सोनवणे विजयी झाल्या. निमगाव केतकी गणातून रणजित मनोज भोंग तर शेळगाव गणातून जयकुमार गोपाळ कारंडे विजयी झाले.



 भिगवण शेटफळ गढे  गट : मेघना तुकाराम बंडगर ( १९१७६ ) त्यांनी कोमल हरिश्चंद्र बंडगर ( ४५७५ ) यांचा पराभव केला.

भिगवण गण : जितेंद्र प्रल्हाद वणवे ( ६५६१) त्यांनी अपक्ष उमेदवार सौरभ गणेशकुमार झगडे ( ५१९९ ) व भाजपचे दत्तू गेना वणवे ( २६५० ) यांचा पराभव केला.

शेटफळ गढे गण : हेमा पद्माकर माडगे ( ११३१३ ) त्यांनी प्राजक्ता सचिन वाघ ( २०७२ ) यांचा पराभव केला.

लासुर्णे सणसर गट :  माधुरी सागर भिसे ( १७९८० ). त्यांनी धनश्री संदीप कांबळे ( ३२०८ ) यांचा पराभव केला.

लासुर्णे गण : हर्षवर्धन मधुकर लोंढे (७९९०). त्यांनी नितीन पोपट भिसे यांचा पराभव केला.

सणसर गण : ज्योत्स्ना मोहन सुरुडकर (८२९०). त्यांनी पूनम अनिल शेंडगे यांचा पराभव केला. पळसदेव बिजवडी गट : हर्षदा दीपक जाधव ( १८७७६ ). त्यांनी अनिता चांगदेव डूके (८८४६ ) यांचा पराभव केला.

पळसदेव गण : किर्ती प्रवीणकुमार काळे (७४५२). त्यांनी दीपाली महेंद्र काळे ( ४०१२) यांचा पराभव केला.

बिजवडी गण : दिलीप माणिक भिसे (८९९४ ). त्यांनी रामदास सुखदेव चितळकर ( ४६९५) यांचा पराभव केला.

वडापूरी माळवाडी गट :  यशराज आप्पासाहेब जगदाळे (१८३०६). त्यांनी सतीश भीमराव पांढरे ( ८२१७ ) यांचा पराभव केला.

वडापूरी गण : अर्चना अजित खबाले ( ९६६८). त्यांनी शारदा मारुतराव देशमुख यांचा पराभव केला.

माळवाडी गण : कल्पना विष्णू पाटील ( ९२८१). त्यांनी वैशाली पांडुरंग मारकड यांचा पराभव केला.

निमगाव केतकी शेळगाव गट : सोनाली तुषार जाधव ( १९७५१). त्यांनी दीपाली सचिन राऊत ( ५३२१ ) यांचा पराभव केला.  

निमगाव केतकी गण : रणजित मनोज भोंग ( ९२०६). त्यांनी गोरख बळीराम आदलिंग यांचा पराभव केला.

शेळगाव गण : जयकुमार गोपाळ कारंडे ( ७००५). त्यांनी शुभम भारत शिंगाडे यांचा पराभव केला.

काटी लाखेवाडी गट :  श्रीमंत पोपट ढोले (२०७९९). त्यांनी विलासराव रामचंद्र वाघमोडे ( ७६७२) यांचा पराभव केला.

काटी गण : बापू लिंबाजी शेंडे (9907) 

लाखेवाडी गण विमल किसन काळे (11071)

बावडा लुमेवाडी गट : अंकिता हर्षवर्धन पाटील (२०१७४). त्यांनी अंजली अभिजीत घोगरे ( ४४१९ ) यांचा पराभव केला.

बावडा गण : धनश्री किरण पाटील ( १०८१२ ). त्यांनी यास्मिन मुनीर अत्तार यांचा पराभव केला.

लुमेवाडी गण : शिवाजी विजयसिंह मोहिते ७४३४). त्यांनी सुधीर प्रकाश कोकाटे यांचा पराभव केला. 

वालचंदनगर बोरी गट निर्मला सागर मिसाळ ( १७७८२). त्यांनी अमृता राजकुमार भोसले ( ४५७५) यांचा पराभव केला.

वालचंदनगर गण :  अनिता नंदकुमार सोनवणे (८४२६). त्यांनी भामा दादा भालेराव यांचा पराभव केला.

बोरी : श्रीराज दत्तात्रय भरणे (१०९४४). श्रीराज यांनी सचिन पोपट धापटे यांचा पराभव केला. 

इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समिती प्रांगणात उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या प्रतिमेस आणि माजी खासदार स्वर्गीय शंकररावजी पाटील यांच्या अर्ध पुतळ्यास माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, आप्पासाहेब जगदाळे, मधुकर भरणे आदी मान्यवरांनी  पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

दरम्यान, 'टीकाटिप्पणी करणारांना व भाषणे करणारांना जनता महत्त्व देत नाही. ती विकासाला महत्व देते हे या निकालाने सिद्ध केले आहे. हा विजय आदरणीय अजितदादा पवार यांना अर्पण आहे. हा विजय पाहण्यासाठी आदरणीय अजितदादा हवे होते अशी भावनिक  प्रतिक्रिया कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी व्यक्त केली.

इंदापूर तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सर्व जागी राष्ट्रवादीचा झालेला विजय हा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या विचारधारेचा विजय आहे. त्यांना अभिप्रेत असलेला तालुक्याचा विकास करणे हीच खरी त्यांना श्रद्धांजली आहे अशी प्रतिक्रिया माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी व्यक्त केली.

इंदापूर तालुक्याचा सर्वांगीण विकास व्हावा हे उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांचे स्वप्न होते. ते पूर्ण करण्यासाठी आम्ही सर्व जण संघटित प्रयत्न करू अशी ग्वाही पुणे जिल्हा बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे यांनी दिली.

भाजपचे कमळ फुलविण्यासाठी राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, आमदार सुरेश धस, मोहोळ चे माजी आमदार यशवंत माने, भाजपचे ज्येष्ठ नेते प्रदीप गारटकर, जिल्हा परिषदेचे माजी आरोग्य व बांधकाम सभापती प्रवीण माने, माऊली चवरे व कार्यकर्त्यांनी खूप प्रयत्न केले. मात्र त्यांना यश आले नाही. 

जिल्हा परिषद निवडणुकीत राष्ट्रवादीने १ लाख ५२ हजार ७४४ मते घेतली तर भाजपस ४६ हजार ८९३ मते मिळाली. केंद्र व राज्यात सत्तेत एकत्र असताना देखील राष्ट्रवादी काँग्रेस ने भाजप वर मात करून आपली ताकद दाखवून दिली आहे. मात्र आता राष्ट्रवादी काँग्रेसने विकासाचा अनुशेष भरून काढणे ही काळाची गरज आहे.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा