इंदापूर, डॉ. संदेश शहा.
टाईम्स 45 न्यूज मराठी सहसंपादक मो. ९९२२४१९१५९
मौजे कालठण क्रमांक एक ( ता. इंदापूर ) येथील कै. लक्ष्मीबाई चॅरीटेबल ट्रस्टच्या पुढाकारातून
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या विशेष बस सेवेतून ४० महीला व ४ पुरुष यांनी तीर्थक्षेत्र देवदर्शनातून पर्यटनाचा आनंद लुटला.
दोन दिवसीय तीर्थाटनातून पर्यटन काळात भाविकांनी नटराज मंदिर, शिवाजी महाराज संग्रहालय, सातारा, छावा चित्रपट प्रदर्शित बारा मोटेची इतिहास कालीन विहीर लिंब सातारा, वाई गणपती मंदिर वाई,
गणपती पुळे मंदिर गणपती पुळे, कोकण दर्शन, प्राचीन कोकण, नरेंद्र महाराज मंदिर व नाणीज मठ आदी ठिकाणी भेट दिली.दोन दिवसाच्या काळात त्यांनी प्राचीन कोकण ग्रामीण संस्कृतीचे दर्शनासह गणपती पुळे येथील गणेश मूर्ती जी समुद्राकडे पश्चिम दिशेला तोंड करून स्थापीत आहे त्याचे दर्शन घेऊन गणपतीची आरती व महाप्रसाद याचा लाभ घेतला.
या प्रवासयात्रेत सौ. राणी क्षीरसागर, मैनाबाई जावळे, सखुबाई पाडुळे, सुभद्रा
पाडुळे, सवीता सपकळ लक्ष्मी पाटील, चंद्रकला लोंढे, स्वप्नाली भैलूमे, संगीता माने, छाया खंडाळे यांच्या सह जयश्री करे, निकीता बनसोडे, शैला नरुटे, सुशीला पावणे, सोनाली बनसोडे, लता करे, छाया करे, द्रोपदा करे आदींनी सहभाग घेतला. यात्रेचे आयोजन नितीन क्षीरसागर यांनी केले तर माजी सरपंच अर्जुन कुंभार यांनी मार्गदर्शन केले. केरबा जावळे, ज्ञानदेव शिंदे, बाळासाहेब जगताप यांनी सहभाग घेऊन सहकार्य केले. या
यात्रा प्रवासासाठी इंदापूर आगार व्यवस्थापक हनुमंत गोसावी, सहाय्यक वाहतूक अधिकारी संजय वायदंडे, दत्तात्रय भोसले, वाहतूक नियंत्रक विक्रम चंदनशिवे, भिमराव शिंगाडे, शंकर कोरटकर तसेच विशाल रणवरे यांचे योगदान लाभले. यात्रा बससेवे कामी विवेक पोरे, नंदकुमार दळवी यांनी परिश्रम घेतले.
यात्रेकरुनी या हेरिटेज पर्यटनात माहिती घेऊन हा धार्मिक दर्शन सोहळा यशस्वीपणे पार पाडला असल्याची माहिती संयोजक नितीन क्षीरसागर यांनी दिली.





कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा