*करमाळा, तालुका --प्रतिनिधी*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-9850686360*
एसटी बसने सवलतीत प्रवास करणाऱ्या कोट्यवधी प्रवाशांसाठी राज्य सरकारने एक महत्त्वाचा नियम लागू केला आहे. आता महिला, ज्येष्ठ नागरिक आणि विद्यार्थ्यांना सवलतीचा लाभ घेण्यासाठी 'नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड' (NCMC) जवळ बाळगणे बंधनकारक असेल.
नेमकं काय बदललंय?
यापूर्वी केवळ आधारकार्ड किंवा ओळखपत्र दाखवून महिलांना ५०% आणि ज्येष्ठ नागरिकांना १००% सवलत मिळत असे. पण आता सवलत मिळवण्यासाठी हे नवीन डिजिटल 'स्मार्ट कार्ड' अनिवार्य असेल.
नवीन NCMC कार्ड घेण्यासाठी १९९ रुपये शुल्क मोजावे लागेल. ज्यांच्याकडे जुने स्मार्ट कार्ड आहे, त्यांना ते जमा केल्यास १४९ रुपयांत नवीन कार्ड मिळेल.
हे एक 'प्रीपेड' वॉलेटसारखे असेल. यात किमान १०० रुपयांचा बॅलन्स ठेवावा लागेल आणि ५० च्या पटीत रिचार्ज करता येईल.
कोणाला कोणते कार्ड मिळणार?
१.विद्यार्थी: शालेय आणि तांत्रिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या 'सरल' (Saral) क्रमांकाशी हे कार्ड जोडलेले असेल.
२ महिला व ज्येष्ठ नागरिक: महिला सन्मान योजना आणि अमृत ज्येष्ठ नागरिक (७५ वर्षांवरील) लाभार्थ्यांचे कार्ड त्यांच्या 'आधार' क्रमांकाशी लिंक असेल.
३.दिव्यांग: दिव्यांगांचे कार्ड त्यांच्या 'UDID' क्रमांकाशी जोडलेले असेल.
हा बदल का केला?
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या मते, सवलतींची अचूक नोंद ठेवणे, पारदर्शक व्यवहार करणे आणि 'कॅशलेस' प्रवासाला चालना देणे हा यामागचा मुख्य उद्देश आहे.
"सवलतीसाठी १९९ रुपये देऊन कार्ड घेण्याचा नियम तुम्हाला पटतो का? यामुळे प्रवाशांची सोय होईल की त्रास वाढेल? तुमची प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की सांगा!"
तुमच्या ओळखीच्या ज्येष्ठ नागरिक आणि महिला प्रवाशांना ही महत्त्वाची अपडेट शेअर करा!




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा