*करमाळा, तालुका --प्रतिनिधी*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-9850686360*
दिनांक 13 फेब्रुवारी 2026 रोजी पोथरे जिल्हा परिषद शाळेत विदर्थ्यांसाठी स्नेहभोजन म्हणून स्वादिष्ट अशा मिसळपावचे आयोजन करण्यात आले होते . नुकत्याच झालेल्या प्रजासत्ताक दिनी विद्यार्थ्यांच्या विविध गुणदर्शन कार्यक्रमांतर्गत पोथरे ग्रामस्थ व पालकांकडून *14350* रु. रोख बक्षीसाची रक्कम शाळेला प्राप्त झाली होती . त्यातूनच आजच्या स्नेहभोजनाचा खर्च करण्यात आला . सकाळपासूनच मुख्याध्यापक, सर्व शिक्षकवृंद,स्वयंपाकी श्रीम. जैबाताई पठाण व इयत्ता सहावी व सातवीच्या विद्यार्थ्यांनी यासाठीची जय्यत तयारी केली होती . यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सौ . मनिषा शिंदे, उपाध्यक्ष श्री . राजेंद्र झिंजाडे व सर्व सन्माननीय सदस्य आवर्जून उपस्थित होते .
दुपारी 1.30 वाजता विद्यार्थ्यांनी या चमचमीत मिसळपावचा मनसोक्त आस्वाद घेत त्यांच्या आवडीचा पदार्थ बनवल्याबद्दल मुख्याध्यापक व शिक्षक वृंद यांचे आभार मानले .
पोथरे शाळेमधे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीबरोबर त्यांचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी नेहमीच नाविण्यपूर्ण उपक्रम राबवले जातात, शाळेचे कर्तव्यदक्ष मुख्याध्यापक श्री. शकुर शेख सर, सर्व उपक्रमशील शिक्षकवृंद श्री . बापूराव रोकडे सर, श्री. लहू जाधव सर,सौ . शगुफ्ता शेख मॅडम, श्रीम. शाबिरा मुलाणी मॅडम, श्रीम. राजश्री सावंत मॅडम यांच्या समन्वयातून शाळेत विद्यार्थी हीतास विशेष प्राधान्य दिले जाते त्यामुळे आमच्या गावची जिल्हा परिषद शाळा ही आमच्या गावचा अभिमान आहे अशा शब्दांत शाळा व्यवस्थापन समिती , पोथरे ग्रामस्थ व पालकांनी शाळेचे विशेष कौतुक केले आणि शाळेत राबवल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांना आमची नेहमीच सहकार्याची भूमिका राहिल असे अभिवचन दिले .
शाळेमधे शैक्षणिक विकास व व्यक्तिमत्व विकासासाठी राबवले जाणारे विविध उपक्रम, टॅलेंट हंट स्पर्धेमधे विद्यार्थ्यांनी जिल्हा पातळीपर्यंत मारलेली मजल, नुकताच शाळेच्या मेन गेट वर भव्य आणि आकर्षक स्वरूपात बसवलेला शाळेच्या नावाचा बोर्ड, मुलांच्या शौचालयासाठी करण्यात आलेली पाईपलाईन व पाण्याची सोय, क्रिडांगणाची स्वच्छता, किरकोळ दुरुस्तीची कामे , नुकताच घेतलेला विद्यार्थ्यांचा आनंदबाजार , अंगणवाडी शेजारच्या इयत्ता चौथीच्या वर्गात करण्यात येणारी लाईट व फॅनची सोय या सर्व सुविधा करण्यासाठी शाळेला ग्रामपंचायत पोथरे, आदर्श आणि कार्यशील शाळा व्यवस्थापन समिती, सन्माननीय पालकवर्ग आणि सर्व प्रतिष्ठित व शाळेविषयी तळमळ असणारे ग्रामस्थ यांचे सहकार्य मिळत असल्याने आणि त्यांनी शाळेवर टाकलेल्या विश्वासामुळे आम्हा शिक्षकांना शाळेचा विकास साधण्यास भरपूर पाठबळ मिळत आहे आणि याचा फायदा शाळेच्या पटसंख्या वाढीबरोबरच विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी होत असल्याचे मत मुख्याध्यापक श्री . शकुर शेख यांनी व्यक्त केले .
पोथरे शाळेत होत असलेल्या उत्कृष्ट कामकाजाबाबत गटशिक्षणाधिकारी श्री . नितीन कदम साहेब, विस्ताराधिकारी श्री . मिनीनाथ टकले साहेब व श्री. जयवंत नलवडे साहेब, केंद्रप्रमुख श्री. निशांत खारगे साहेब यांनी शाळेचे विशेष कौतुक करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या .








कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा