*अकलूज- प्रतिनिधी*
*एहसान मुलाणी*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-9096837451*
इस्लाम धर्मात रमजानच्या 'रोजा'ला अनन्यसाधारण महत्त्व असून प्रत्येकाला रमजानचे रोजे करणे अनिवार्य असून लहान मुले ही अल्लाह ची भक्ती म्हणून रोजे करत असतात त्याच अनुषंगाने सराटी तालुका इंदापूर जिल्हा पुणे येथील सेवानिवृत्त माजी सैनिक व पोलीस कर्मचारी मुबारक पापाभाई तांबोळी यांचे जुळी नात व नातू आणि हुसेन मुबारक तांबोळी यांचे जुळी मुलं आहिल हुसेन तांबोळी ( मुलगा)आणि आलिया हुसेन तांबोळी (मुलगी)यांचे वय केवळ ८ वर्ष असून इयत्ता तिसरी मध्ये शेखर असलेल्या या दोघा जुळ्या बहिण भावांनी रमजान चा रोजा यशस्वीरित्या पूर्ण केल्याने त्यांचे कौतुक होत आहे
रमजान या महिन्यात मुस्लिम बांधव अबाल वृद्ध ही रोजे करत असतात पहाटे 5/30 पासून ते सायंकाळी 6/30 वाजे पर्यंत अन्न पाणी वर्ज करून 'रोजा'च्या वेळात अल्लाचे नामस्मरण करणे महापुण्य असल्याचे इस्लाम धर्मात याची शिकवण आहे
रोजा इफ्तार पूर्वी (रोजा उपवास सोडण्यापूर्वी) त्यांच्या कुटुंबातील आजी आजोबा आई-वडील इतर नातेवाईकांनी या दोघांना नवीन कपडे नेसवून आणि पुष्पहार घालून त्यांचा सत्कार करून कौतुक केले त्यांनी रोजा यशस्वीरित्या पूर्ण केल्यामुळे अनेक नातेवाईक, मित्रमंडळींनी कौतुक करून शुभेच्छा दिल्या






कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा