डॉक्टर सलीम शाहिदा सिकंदर शेख
बैतुशशिफा मल्टिस्पेसिलिटी दवाखाना
श्रीरामपूर
पैगंबर मुहम्मद स्व. सांगतात, रोजा इफ्तार हा खजूर नें करावं, कारण खजूर मध्ये बारकत आहेत ! अगर खजूर नसेल तर पाणी पिऊन रोजा इफ्तार करा ". ( हादिस तिर्मिझी 0657).जगभरातील कोट्यावधी मुस्लिम रमजान महिन्यात आपला रोजा( उपवास ) "इफ्तार "( सोडताना ) करतांना खजूर खाऊन करतात. महिनाभर चालणाऱ्या रमजान मध्ये पहाटे पासून ते संध्याकाळ पर्यंत काहीही न खाता पिता निरंकारी राहून दिवसभर आत्मचिंतन करतात. रोजा सोडताना खजूर खातात. पैगंबर मुहम्मद स्व. यांनीच खजूर खाण्यास सांगितले.
खजूर खाण्यामागे फक्त्त श्रद्धा नाहीत तर आरोग्याची मोठी गुपित दडलेली आहेत, दिवसभर उपाशी राहिलेल्या शरीराला लगेंच ताकद देण्यासाठी खजूर हें जगातील सर्वात उत्तम फळ मानले जाते.
खजूर ( फिनिक्स डेक्टिफिफेरा ) प्रामुख्याने इंग्रजीत '" डेट" date म्हणतात. प्रामुख्याने अरबस्थानात,आशियाई, आफ्रिका संबंधित फळ वर्गीय आहेत, अरब व आफ्रिका उष्णता वातावरणातील मुख्य भरपूर उत्पन्न देणारं पीक आहेत, याला व्यापारी वास्तू म्हणून मान्यता आहेत.अन खास म्हणजे व्यापार मोठया प्रमाणात होतो. याचे (1)मेडजूला, (2)डेंगलेत, (3)बराहीं, (4)जाहिदी, (5)हलवा व (6)आजवा खजूर असें विविध प्रकार आहेत. त्यामध्ये " आजवा " खजूर अख्या जगात लोकप्रिय आहेत.
अरबस्थान, आफ्रिका, आशियाई व जगात ' " "सुपर फूड " म्हणून जगात लोकप्रिय होत आहेत.
खजूर मधील पोषण मूल्य शंभर (100 ग्राम )ग्राम खजूर मध्ये,(1)Carbohydrate कार्बहैद्राते :- 75 मिली ग्राम,)(2) (शुगर साखर :- 63 मिली ग्राम )(3) वसा :- 0.2 मिली ग्राम, (4) calories उष्मान्क :- 277 किलो कॅलारी, (5),फायबर :-7 ग्राम आहेत (8)प्रोटीन :- 7 ग्राम (9) आयर्न 0.9 ग्राम ( 10) पोटॅशिअम :- 655 मिली ग्राम,इतर . मॅग्नेशिम, antioxidant अंतिऑक्सिदंत, फॉस्परस, झिंक, सल्फर, पोटॅशियम, नुरोजेणेरेटिव्ह, कॅलसियम, फ्लॅवोनोंइडस करोटीनाईस, फ्लेवोनोंएडस सारखी अँटीऑक्सिदंत,इत्यादी.
ब्रिटन मधील प्रसिद्ध आहार तज्ञ शहेंनाझ बशीर स्वतः रोजा ठेवून सांगतात, जेंव्हा आपण उपवास "इफ्तार " सोडतो, त्यावेळी आपल्या शरीराला सर्वात आधी " ग्लुकोज "ची गरज असते. कारण त्यातूनच आपल्याला ताकत ( शक्ती ) मिळते " इतर कोणत्याही पदार्थाच्या तुलनेत खजूर मधील नैसर्गिक साखर आपल्या रक्तातील शुगर लेव्हल लगेंच वाढवते. बाकीचे पदार्थ पचवायला व त्यातून ऊर्जा मिळायला वेळ लागतो.
शाहेनाझ बशीर यांच्या मते खजूरचं खरं गुपित हें आहेत की,साध्या साखरे बरोबरच शरीराला आवश्यक असलेले Carbohydrate कार्बहैद्राते हीं भरपूर प्रमाणे आहे. त्यामुळे शरीराला दिवसभर पुरेल इतकी ताकत हळूहळू मिळत राहाते इतर वेळी हीं बरेच लोकं दिवसभर त्यांच्या साठी हीं हें एक वरदानच आहेत. त्यामध्ये व्हिटॅमिन बी 6 ( B6), व्हिटॅमिन (A ए ), आणि व्हिटॅमिन k कें सोबत भरपूर प्रमाणात आयरन ( iron ) त्यामुळे कमी वेळात शरीराला आवश्यक असलेले सर्व पोषक घटक मिळून थकवा लवकरच दूर होतो.
दिहैद्राशन ( Dehydration ) पासून खास बचाव खजूराची खास किमया :- सुखा मेवे सारखं असलेतरी शरीरातील पाण्याची पातळी टिकवून ठेवण्यास खुप मदत करते, कारण यात नैसर्गिकरित्या पोटॅशियम असल्यामुळे शरीरातील इलेक्ट्रॉलाईट बॅलन्स सांभाळून पाणी संपूर्ण पेशी पर्यत पोहचवण्यास मदत करते. रोजा (उपवास )इफ्तार करतांना बहुतेक जन खजूर बरोबरच पाणी एकत्र घेतात म्हणून ऊर्जा मिळवण्यासाठी शरीरातील पाण्याचे प्रमाण भरून काढण्यासाठी हें उत्तम कॉम्बिनेशन आहे. त्यामुळे बाहेरून वेगळे इलेक्ट्रॉलईट घेण्याची गरज भासत नसते.
बऱ्याच मंडळीणा वाटतं की रमजान मध्ये आपलं वजन कमी करू या, परंतु इफ्तार मध्ये भरपूर खाल्लं तर उलटं वजन वाढू शकतो, म्हणून नियोजन करून खजूर 01, 03,05 विषम संख्येत खजूर खाऊन इफ्तार करून लगेच नमाज अदा करण्यासाठी जाताय म्हणून त्या नमाजच्या हलचली मुळे चांगला व्यायाम होत असल्यामुळे शरीर खजुरातील फायबर ( तंतुमय पदार्थ ). पाचवायला सुरुवात करतो.
आहार तज्ञ शहेंनाझ बशीर सांगते, " खजूर खाल्यामुळे शरीराला एक सिग्नल मिळतं की अन्न पोटात गेलय आणि पचन हीं सुरू झालंय. " म्हणून नमाज अदा नंतर जेंव्हा आपण जेवायला बसतो तेंव्हा उगाचच जास्त खाण्याची इच्छा च होत नाहीं म्हणून आपलं वजन नियंत्रनात राहतं.
रोजा ठेवणाऱ्यानां प्रामुख्याने पोटाचा त्रास होण्याच प्रमाण बरेच असतं त्यामध्ये बध्यकोष्ठाता ( constipation. Indigestion, etc )पोट फुगल्या सारखं वाटतं, दिवसभर रिकाम असल्यामुळे आतड्याची हलचाल मंदावते. खजूर मध्ये भरपूर फायबर ( तंतुमय ) ( 7 सात ग्राम )पदार्थ असल्यामुळे पचना साठी उपयोग होतो, निरोगी राहण्यासाठी दिवसभर आहारात 30 ग्राम फायबर असनं गरजेचं आहे.
आहार तज्ञ शहेंनाझ बशीर सांगतात की खाजुरीला फक्त्त रोजा पुरतंच मर्यादित ठेवू नका आपण दैनंदिन आयुष्यात दिवसाची सुरुवात हीं बिस्कीट व बेकरी पदार्थ नें करण्यापेक्षा दोन -तीन खजूरीने करून बघावं नक्कीच त्याचे फायदे होतील.
धार्मिक कारणा व्यतिरिक्त आरोग्यासाठी हीं अधून मधून उपवास करणं लोकप्रिय होत आहेत.. आणि जर रमजान मध्ये ज्या प्रमाणे उपवास करतो त्याप्रमाणेच करावं. खजूर हा फायबर चा उत्तम नैसर्गिक श्रोत आहेत.
आहार तज्ञ शहेनाझ बशीर सांगतात, " खजूर आणि दुध एकत्र मिसळा त्यात थोडे दहीं आणि काजू घालून मिसळून प्यावे "
अरब लोकं खजूरला दूध दही रोटीसह कधी कधी लोणी आणि मासे बरोबर खातात. अरब लोकं खजूर मधील बी काढून त्यात लोणी ( मख्खन )भरून खातात.
" खजूर एक उत्तम अन्न आहेत जें अनेक आजारावर व महत्वाच्या गरजा पुर्ण करते
(लेख आवडला तर आपल्या मित्र व नातेवाईकांना जरूर पाठवा. प्रतिक्रिया अवश्य कळवा )
लेखन :- डॉक्टर सलीम शाहिदा सिकंदर शेख
बैतुशशिफा मल्टिस्पेसिलिटी दवाखाना
श्रीरामपूर
जिल्हा :- अहमदनगर (अहिल्यानगर )
मोबाईल :- 9271640014





कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा