Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शुक्रवार, २७ फेब्रुवारी, २०२६

*अकलूजच्या कु.पल्लवी सुभाष कोळी हिचे महाराष्ट्र लोकसेवा आयोगामध्ये दैदीप्यमान यश.*

 *अकलूज--- प्रतिनिधी* 

       *केदार लोहकरे*

            *टाइम्स 45 न्यूज मराठी*



अकरावी इयत्तेत असताना आई- वडील विभक्त झाले.वडील आणि लहान भावाची जबाबदारी संभाळत हे यश मिळवले.

 कोठेही कोणत्याही प्रकारचे क्लास न लावता घरात बसून केलेल्या अभ्यासातून मिळवलेले यश.


महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या महाराष्ट्र कृषी सेवा २०२४ परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून अकलूज येथील रत्नाई कृषी महाविद्यालयाची विद्यार्थीनी कु. पल्लवी सुभाष कोळी हिने भव्य दिव्य यश संपादन केले आहे. पल्लवीने अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये आणि जिद्दीने हे यश संपादन केले आहे. 

           कु.पल्लवीचे पहिली ते चौथी पर्यंतचे प्राथमिक शिक्षण पंढरपूर येथील आदर्श प्राथमिक शाळेत झाले.पुढे पाचवी ते दहावीपर्यंतचे शिक्षण कवठेकर प्रशाला पंढरपूर या ठिकाणी झाले आहे.त्यानंतर अकरावी बारावीचे शिक्षण शारदाबाई पवार महिला महाविद्यालय बारामती या ठिकाणी झाले.बीएससी ॲग्री रत्नाई कृषी महाविद्यालय अकलूज या ठिकाणी झाले.अकरावीनंतर आईचे छत्र हरपून देखील जिद्दीने तिने वडिलांचा संसार सांभाळून वडिलांची व भावाची काळजी घेत.प्रथम वर्षापासून एमपीएससी परीक्षेचा अभ्यास जिद्द व चिकाटीने रात्रंदिवस अभ्यास करून पहिल्याच प्रयत्नात पूर्व मुख्य मुलाखत असे तीनही टप्पे पार करून कृषी अधिकारी या क्लास वन पदावर झेप घेतली आहे. कोणताही क्लास न लावता स्वतः अभ्यास करून तिने हे यश मिळवले आहे.     


             अभ्यासासोबत इतर कलागुणांमध्ये देखील अवगत असणाऱ्या या मुलीचे यश अतिशय प्रेरणादायी आहे.तिचे वडील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चाकोरे (ता.माळशिरस) या ठिकाणी शिक्षक या पदावर कार्यरत आहेत. वडिलांची साथ मुली व मुलीचे प्रामाणिक कष्ट याचे उत्तम उदाहरण म्हणजे कु.पल्लवी चा प्रवास आहे.तिने केवळ कुटुंबाचेच नव्हे तर संपूर्ण माळशिरस तालुक्याचे नाव उज्वल केले आहे. तिच्या या यशाबद्दल माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील,शिक्षण प्रसारक मंडळाचे मार्गदर्शक संचालक जयसिंह मोहिते पाटील,अध्यक्ष संग्रामसिंह मोहिते पाटील यांनी तिचे कौतुक केले.सयाजीराजे शिक्षक कॉलनी संग्रामनगर-अकलूज या ठिकाणी पार पडलेल्या कार्यक्रमामध्ये तिथे विशेष अभिनंदन करण्यात आले असून आगामी प्रशासकीय प्रवासासाठी तिला शुभेच्छा देण्यात आल्या.

*चौकट*

माझा उघड्यावर पडलेला संसार मुलीने संभाळून हे मिळविलेले यश केले आहे.हि गोष्ट माझ्यासाठी अभिमानास्पद असून मी माझ्या मुलीला दिलेल्या शिक्षणाची संधी व माझा विश्वास तिने सार्थ ठरवत हे उज्वल यश संपादन केले आहे. तिला दिलेल्या संधीचे सोने केले आहे.

       *सुभाष अर्जुन कोळी*

शिक्षक,जिल्हा परिषद शाळा वि. पा.चाकोरे

*चौकट*

मला मेडिकल क्षेत्राची आवड होती. नीटमध्ये उत्तम मार्क असताना देखील बारावीनंतर घरची पडलेली जबाबदारी स्वीकारून वडिलांजवळ राहून पुढील शिक्षण घेण्याचा व प्रशासकीय अधिकारी होण्याचा मी निर्णय घेतला.भविष्यात उत्तम प्रशासकीय अधिकारी होण्याच्या दृष्टिकोनातून अकलूज या ठिकाणी उपलब्ध असलेल्या सर्व शिक्षणाची संधींचा उपयोग करून बीएससी ऍग्री करत बीए हे एक्स्टर्नल स्वरूपात दोन वेळा राज्यशास्त्र व इंग्रजी या विषयातून शंकरराव मोहिते महाविद्यालय माळेवाडी अकलूज येथून केले. त्याचबरोबर बीएड सुद्धा श्रीराम महिला शिक्षण संस्था,पाणीव या ठिकाणाहून केले आहे.अशाप्रकारे चार डिग्रीमधून ग्रॅज्युएट केले आहे,या डिग्री करत तिने एमपीएससीचा अभ्यास सातत्याने पहिल्या वर्षापासूनच सुरू ठेवला होता.त्याचे मला मिळालेले यश आहे.

*कु.पल्लवी सुभाष कोळी*

कृषी अधिकारी क्लास वन अधिकारी.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा