Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शुक्रवार, २७ फेब्रुवारी, २०२६

*अकलूज नगरपरिषदेने* *रमजान ईद (Eid-ul-Fitr) पूर्वी* *ईदगाह परिसराची स्वच्छता*, *सुशोभीकरण व देखभाल बाबत तातडीने उपाय योजना करण्याबाबत मुख्याधिकारी व नगराध्यक्ष यांना निवेदन...*

 *मुख्य संपादक*

        *टाइम्स 45 न्यूज मराठी* 

   ‌.            *मो:-9730867448*


अकलूज नगरपरिषदेने 

 रमजान ईद (Eid-ul-Fitr) पूर्वी ईदगाह परिसराची स्वच्छता, सुशोभीकरण व देखभाल बाबत तातडीने उपाय योजना करण्याबाबत मुख्याधिकारी व नगराध्यक्ष यांना निवेदन. घेण्याचा आले आहे

सदर निवेदनाद्वारे अकलूज नगर परिषदेस  विनंती करण्यात आली आहे की, अकलूज येथील ईदगाह परिसराची सद्यस्थिती अत्यंत गैरसोयीची व अस्वच्छ असून सार्वजनिक आरोग्य, पर्यावरण संरक्षण व कायदा-सुव्यवस्था यांच्या दृष्टीने तातडीने उपाययोजना करणे आवश्यक आहे. या वर्षी रमजान ईद (Eid-ul-Fitr) 20 मार्च 2026 रोजी मोठ्या भक्ती भावाने साजरी केली जाणार आहे. या धार्मिक कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने जनता ईदगाह मैदानात एकत्र येणार आहे


सदर जागेचे पावित्र्य राखण्यासाठी तसेच तमाम मुस्लिम बांधवांची गैरसोय होऊ नये म्हणून कृपया खालील बाबी तातडीने कराव्यात.


१. वृक्षारोपण मोहिम :- पर्यावरण संतुलन व नागरिकांना गारवा मिळावा यासाठी वड, पिंपळ, आंबा तसेच इतर प्रदूषणरोधक झाडे लावावीत. त्यांची नियमित देखभाल करण्याची जवाबदारी निश्चित करावी.

२. मातीचे ढिगारे आणि काटेरी झाडे दुर करणे. सदर परिसरात मातीचे ढिगारे आणि काटेरी झुडपे अस्वच्छता वाढवत आहेत. यांचे त्वरित निष्कासन करावे.


३. उघड्यावर शौचास बसणाऱ्यांवर कारवाई स्थानिक लोकवस्तीतील काही व्यक्ती त्या ठिकाणी उघड्यावर शौचास बसत असल्याचे निदर्शनास येत आहे. सामाजिक आरोग्याच्या दृष्टीने व संबंधित कायद्यांनुसार कठोर दंडात्मक कारवाई करावी तसेच सूचना फलक व जनजागृती राववावी

               ईदगाह जवळ शौचास बसलेली व्यक्ती 👆


४. सुशोभीकरण व मूलभूत सुविधा ईदग्यास दर्जेदार रंगकाम करणे. नमाज पठणाच्या जागी दर्जेदार टाइल्स बसविणे. संपूर्ण परिसरास सुरक्षित कंपाऊंड (Compound Wall) घालणे. प्रवेशद्वाराची योग्य रचना करून गेट करून घेणे.


५. नियमित देखभाल (Maintenance) नगरपरिषदेकडून कर्मचारी नेमल्यास नियमित स्वच्छता व देखभाल सुनिश्चित करता येईल. आवश्यक असल्यास सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत.


६. पाणी व प्रकाश व्यवस्था पर्याप्त पिण्याचे पाणी तसेच स्ट्रीट लाईटची व्यवस्थित व्यवस्था करण्यात यावी.


७. कचरा व्यवस्थापन कचरा पेट्या बसवून नियमित कचरा उचलण्याची व निपटारा करण्याची व्यवस्था करावी.


वरील सर्व बावी सार्वजनिक आरोग्य, पर्यावरण आणि धार्मिक स्थळाच्या पवित्रतेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या आहेत. त्यामुळे संबंधित कायदे आणि नगरपरिषद अधिनियमांनुसार रमजान ईदपूर्वी हा परिसर योग्य स्वरूपात तयार करून देण्यात यावा, ही विनंती. तसेच या निवेदनावर निश्चित कालावधीत लेखी उत्तर देण्यात यावे.


सणांच्या वेळीच प्रशासनाला जाग येते, ही परंपरा आता बदलली पाहिजे!

ईद हा लाखो भाविकांचा श्रद्धेचा विषय आहे — त्याचा अवमान आम्ही सहन करणार नाही.प्रशासनाने तातडीने कारवाई करावी, अन्यथा जनतेच्या रोषाला सामोरे जाण्याची तयारी ठेवावी असा इशारा ही निवेदनाद्वारे दिला आहे 


           याप्रसंगी निवेदन देताना नगरसेवक -राहुल लोंढे, महेश शिंदे, संतोष वाघमोडे, अमरसिंह देशमुख भैया, विक्रांत देशमाने, अमोल माने, अशोकदादा गायकवाड, अमर शेख (अकलूज मंडळ अल्पसंख्याक मोर्चा अध्यक्ष), सुहास गायकवाड, शुभम वाघमारे, श्रीकांत दोरकर, शुभम सूर्यवंशी, शहाबाज काझी, उबाळे आदी मान्यवर उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा