Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

रविवार, ८ फेब्रुवारी, २०२६

सोलापूर जिल्ह्यात या गावाजवळ चक्क ढाब्यावर आढळल्या ईव्हीएम मशीन आढळून आल्याने एकच खळबळ;-- राष्ट्रवादीच्या उमेश पाटलांचा गंभीर आरोप!

 *मुख्यसंपादक*

*टाइम्स 45 न्यूज मराठी* 

*मो:-9730867448/*

*9421577488*



Solapur ZP Election : सोलापूरच्या मोहोळमध्ये ईव्हीएम मशीन चक्क धाब्यावर (हॉटेल) आढळून आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाआहे. काही लोक या ईव्हीएम मशीन घेऊन जात असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार उमेश पाटील यांनी केला आहे. दरम्यान हा प्रकार उघडकीस आल्या नंतर प्रशासकीय यंत्रणेच्या कार्यक्षमतेवर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. मोहोळ शहरानजीक असलेल्या हॉटेल स्वराज्य येथे या ईव्हीएममशीन घेऊन जाताना पकडल्याचा दावा, करण्यात येतोय. दरम्यान यावेळी 2 सीलबंद EVM मशीन देखील आढळून आल्याची माहिती आहे. 

प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी, मतदानाच्या प्रक्रियेत पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह

मोहोळ मतदारसंघात जिल्हा परिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरुअसताना मध्यरात्रीच्या सुमारास एक वेगळाचप्रकारघडलाआहे. मोहोळ शहराजवळील एका हॉटेल आणि बारच्या परिसरात ईव्हीएम मशिन आढळून आल्याने लोकशाहीच्या या उत्सवात खळबळ उडाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार उमेश पाटील यांनी हा प्रकार उघडकीस आणला असून त्यांनी या संबंधित व्यक्तींना जाब विचारलाय. घटनेची माहिती मिळताच निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. सीमा होळकर आणि पोलिस निरीक्षक हेमंत शेंडगे हे देखील घटनास्थळी दाखल झालेत. दरम्यान, याबाबत प्रशासनाला विचारले असता, या मशीन्स 'राखीव' स्वरूपातील होत्या असं स्पष्टीकरण देण्यातआलंआहे. मात्र उमेश पाटील यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली असून, मतदानाच्या प्रक्रियेत पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

दरम्यान मोहोळचे तहसीलदार आणि सहायक निवडणुक निर्णय अधिकारी सचिन मुळीक यांच्या माहितीनुसार 'लोकांनी अडवलेल्या मशीन ह्या राखीव मशीन आहेत. त्यांचा वापर मतदानासाठी झालेला नाही. अद्याप ही या मशीन सिलबंद स्वरूपातच आहेत. मतदान झालेल्या सर्व मशीन रात्री 10.30 पर्यंत स्ट्रॉंग रूममध्ये जमा करून स्ट्रॉंग रूम सील करण्यात आलीय.' अशी माहिती मोहोळचे तहसीलदार सचिन मुळीक यांनी दिलीय.

सोलापूर जिल्ह्यात सरासरी 65.90 टक्के मतदान

सोलापूर जिल्ह्यात जिल्हापरिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत सरासरी 65.90 टक्के मतदान झालंय. जिल्ह्यात सांगोला तालुक्यात सर्वाधिक 70.55 टक्के मतदान झालंआहे. तर दक्षिण सोलापूर तालुक्यात सर्वात कमी 58.39 टक्के मतदानाची नोंद करण्यातआलीआहे. मागील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत 66.96 टक्के इतके मतदान झाले होते. दरम्यान, मागील निवडणुकीच्या तुलनेत 1 टक्याने मतदान घसरले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा