Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

सोमवार, ९ फेब्रुवारी, २०२६

*शहापूर जिल्हा परिषदसह गटातील येवती पंचायत समिती गणावर शिवसेनेचा भगवा फडकला;प्रियंका कुबेर मिटकरी प्रचंड बहुमताने विजयी*

 *मुख्यसंपादक*

*टाइम्स 45 न्यूज मराठी* 

*मो:-9730867448/*

*9421577488*


तुळजापूर:शहापूर जिल्हा प रिषद गटाअंतर्गत येणाऱ्या येवती पंचायत समिती गणामधून शिवसेना पक्षाच्या उमेदवार प्रियंका कुबेर मिटकरी यांनी प्रचंड बहुमताने दणदणीत विजय मिळवला आहे. या विजयामुळे संपूर्ण परिसरात शिवसैनिकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

या निवडणुकीत तुळजापूर तालुकाप्रमुख अमोल जाधव यांनी प्रचाराची संपूर्ण धुरा समर्थपणे सांभाळली होती. घराघरांत जाऊन केलेला प्रचार, मतदारांशी थेट संवाद, शिवसेनेची ध्येयधोरणे पोहोचवण्यासाठी घेतलेले अथक परिश्रम आणि उमेदवाराच्या सहकाऱ्यांची मेहनत यामुळेच हा विजय शक्य झाल्याचे बोलले जात आहे.

विजयाची अधिकृत घोषणा होताच शिवसैनिकांनी जल्लोष करत आनंद व्यक्त केला. फटाक्यांची आतषबाजी, गुलाल उधळत एकमेकांचे अभिनंदन करत कार्यकर्त्यांनी विजयाचा आनंद साजरा केला.

या प्रसंगी तुळजापूर तालुकाप्रमुख अमोल जाधव यांनी मतदारांचे मनःपूर्वक आभार मानले. ते म्हणाले की, “हा विजय जनतेच्या विश्वासाचा आणि शिवसेनेच्या कार्याचा विजय आहे. येवती पंचायत समिती आणि शहापूर जिल्हा परिषद गटावर शिवसेनेचा झेंडा फडकवण्याचे स्वप्न मतदारांनी साकार केले आहे.”

या निवडणुकीच्या माध्यमातून शिवसेनेने येवती पंचायत समितीवर आपले वर्चस्व प्रस्थापित करत शहापूर जिल्हा परिषद गटात मजबूत पकड निर्माण केली आहे. येत्या काळात विकासकामांना गती देऊन जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा निर्धार नवनिर्वाचित सदस्य प्रियंका कुबेर मिटकरी यांनी व्यक्त केला आहे.

हा विजय शिवसेनेसाठी राजकीयदृष्ट्या महत्त्वाचा ठरत असून, आगामी काळात तालुका व जिल्हास्तरावर शिवसेनेची ताकद अधिक वाढणार असल्याचे चित्र दिसून येत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा