Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

बुधवार, ११ फेब्रुवारी, २०२६

*महर्षी संकुल यशवंत नगर येथे सहकार महर्षींच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांचे विचार व कार्याला उजाळा*

 अकलूज प्रतिनिधी 

शकुरभाई तांबोळी 

टाइम्स 45 न्यूज मराठी


माळशिरस तालुक्याचे भाग्यविधाते सहकार महर्षी स्वर्गीय शंकररावजी नारायणराव मोहिते पाटील यांच्या ४७ व्या पुण्यतिथीनिमित्त महfर्षी संकुल यशवंतनगर येथे त्यांच्या पवित्र स्मृतीस आदरांजली वाहण्यात आली.

 प्रमुख अतिथीं मा. कु.भाग्यश्री शेंडे,अकलूज प्रादेशिक परिवहन कार्यालय ,अधिकारी ,  शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक श्री. बाळासाहेब सनस ,श्री वसंत जाधव,सभापती ॲड . नितीन खराडे साहेब , यांच्या  हस्ते सहकार महर्षी शंकररावजी मोहिते पाटील यांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात आले .



मुख्याध्यापक संजय गळीतकर सर यांनी प्रथम कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले ,कु. वेदिका सराटे व सहशिक्षक श्री. अनंत कोळी सर यांनी सहकार महर्षींच्या जीवनकार्याबाबत मनोगत व्यक्त केले .

मोठे यश मिळवण्यासाठी जिद्द चिकाटी मेहनत करणे आवश्यक असल्याचे भाग्यश्री शेंडे मॅडम यांनी सांगितले ,अध्यक्षीय मनोगतामध्ये बाळासाहेब सनस साहेब यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक केले .

सदर प्रसंगी विविध स्पर्धेचे बक्षीस वितरण उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले .


कार्यक्रमासाठी सर्व प्रशाला समिती सदस्य, प्रशालेचे मुख्याध्यापक उपस्थित होते .सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ.पाचपुंड मॅडम यांनी केले व आभार मुख्याध्यापक श्री . पारसे सर यांनी केले .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा