इंदापूर, डॉ. संदेश शहा.
टाईम्स 45 न्यूज मराठी सह संपादक, मो. ९९२२४१९१५९
विद्यार्थी सहाय्यक समिती, पुणे तसेच शंकरराव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट, इंदापूर यांच्या संयुक्त विद्यमाने महाशिवरात्रीचे औचित्य साधून आणि माजी खासदार कर्मयोगी श्रद्धेय स्व. शंकररावजी पाटील ( भाऊ ) यांच्या जयंतीनिमित्त पालकांसाठी विशेष मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. ' यशस्वी पालकत्व आणि उद्याचे तंत्रज्ञान ' हा या शिबिराचा मुख्य विषय असून, रविवार दि. १५ फेब्रुवारी २०२६ रोजी हे शिबिर संपन्न होणार आहे.
तज्ज्ञ मार्गदर्शकांचे लाभणार मार्गदर्शन :
या शिबिरात पुण्यातील सुप्रसिद्ध मानसशास्त्रीय समुपदेशक डॉ. स्नेहल महेशकर ( Neuro Parenting & Studies) आणि डॉ. स्मिता जोशी या पालकांना मार्गदर्शन करणार आहेत. बदलत्या काळात मुलांचे संगोपन करताना येणारी आव्हाने आणि तंत्रज्ञानाचा वापर यावर त्या प्रकाश टाकणार आहेत.
*शिबिरातील मुख्य विषय:*
शिबिरामध्ये पालकांसाठी अत्यंत महत्त्वाच्या विषयांवर चर्चा केली जाणार आहे, ज्यात प्रामुख्याने:
युवापिढीचे मानसशास्त्र आणि जनरेशन गॅप.
* मोबाईल व गॅजेट्सचे व्यसन आणि त्यावरील उपाय.
* परीक्षेचा ताण, नियोजन आणि अभ्यासाच्या आधुनिक पद्धती.
* भावनिक बुद्धिमत्ता (Emotional Intelligence) आणि सायबर सुरक्षा.
* विशेष आकर्षण: पालकांसाठी AI (Artificial Intelligence) टूल्सचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक (Live Demo).
*कार्यक्रमाची वेळ आणि स्थळ:*
हे शिबिर दोन सत्रांत होणार असून पालकांना कोणत्याही एका सत्रासाठी नोंदणी करता येईल:
* प्रथम सत्र: सकाळी ११ ते दुपारी १ वाजेपर्यंत.
* द्वितीय सत्र: दुपारी ३ ते ५ वाजेपर्यंत.
* स्थळ: अल्फा बाइट कॉम्प्युटर्स, नगरपालिकेच्या मागे, ४० फुटी रोड, इंदापूर, जि. पुणे.
नोंदणी आवश्यक :
हे शिबिर सर्वांसाठी मोफत असून प्रवेश मर्यादित आहेत. त्यामुळे पालकांनी आपली जागा निश्चित करण्यासाठी ७०५८३३३०३३ या क्रमांकावर संपर्क साधावा किंवा जाहिरातीतील QR कोड स्कॅन करून नाव नोंदणी करावी, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा