*अकलूज--- प्रतिनिधी*
*केदार लोहकरे*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
माळेवाडी-अकलूज येथे प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ जिल्हा सोलापूर यांच्या वतीने गेल्या वर्षी अकलूज ग्रामपंचायतीचे माजी सरपंच व अकलूज नगरपरिषदेचे विद्यमान उपनगराध्यक्ष शिवतेजसिंह मोहिते-पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त माळेवाडी परिसरात जेष्ठ नागरिकांसाठी मोफत वाचनालय सुरू करण्यात आले होते.त्याचे उद्घाटन सौ.देवन्या शिवतेजसिंह मोहिते-पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आले.या वाचनालयाला आज एक वर्ष पूर्ण झाले आहे.
प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाने मोफत जेष्ठ नागरिकांसाठी वाचनालय सुरू केल्यामुळे या परिसरातील जेष्ठ नागरिकांना जिल्हातील, तालुक्यातील व गावातील सामाजिक व राजकीय घडामोडी वृत्तपत्राच्या माध्यमातून समजू लागल्या आहेत.या स्तुत्यपर उपक्रमामुळे वयोवृद्धांसाठी हे वाचनालय एक विरंगुळ्याचे ठिकाण ठरले आहे.या वाचनालयामुळे त्यांच्या आनंदात व ज्ञानात भर पडत आहे.हे वाचनालय सुरू करण्यासाठी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ जिल्हा सोलापूर चे जिल्हाध्यक्ष सोमनाथ खंडागळे, जिल्हा उपाध्यक्ष शशिकांत कडबाने,अकलूज शहराध्यक्ष संजय लोहकरे यांनी परिश्रम घेतले आहे.





कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा