*करमाळा, तालुका --प्रतिनिधी*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-9850686360*
सध्या मनपा मराठी मुलांची शाळा क्रमांक 11, सोलापूर येथे प्रभारी मुख्याध्यापक म्हणून कार्यरत असणाऱ्या शुभांगी रितपुरे पाटील यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाची पीएच. डी. डॉक्टरेट पदवी प्राप्त झाली.
*सोलापूर जिल्ह्यातील निम्न प्राथमिक स्तरावरील बहुभाषिक विद्यार्थ्यांना मराठी विषय अध्ययनात येणाऱ्या समस्यांचा अभ्यास व त्यावर उपाययोजना* या संशोधन विषयावर त्यांना ही पदवी मिळाली आहे.
प्रा. डॉ. फुरडे, प्रा.डॉ. हिरेमठ, प्रा. डॉ.काळे आदींनी श्रीमती रितपुरे पाटील यांचे अभिनंदन केले. पीएच. डी. पदवी मिळविल्याबद्दल त्यांचे जाहीर सर्व स्तरातून शिक्षक वर्गातून कौतुक होत आहे.
श्रीमती रितपुरे पाटील या बंधन बँक मोहोळ येथील ब्रँच मॅनेजर वैजिनाथ पाटील यांच्या पत्नी आहेत.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा