*अकलूज --प्रतिनिधी*
*केदार लोहकरे*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील जयंती समारंभ समितीच्या वतीने सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील यांच्या १०८ व्या जयंती निमित्त आयोजित केलेल्या राज्यस्तरीय लावणी नृत्य स्पर्धेला दिमाखात प्रारंभ झाला.या स्पर्धेचे उद्घाटन सौ.सुलक्षणादेवी मोहिते पाटील यांचे हस्ते दिपप्रज्वलनाने झाले.
या वेळी माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील,जयंती समितीचे संस्थापक अध्यक्ष जयसिंह मोहिते पाटील,अकलूज बाजार समितीचे सभापती मदनसिंह मोहिते पाटील,सुमित्रादेवी खानविलकर,स्पर्धा समितीच्या अध्यक्षा कु.स्वरूपाराणी मोहिते पाटील,अकलूजचे नगरसेवक सयाजीराजे मोहिते पाटील,सहकार महर्षी लावणी कलावंत पुरस्कर्ते रेश्मा परितेकर,प्रमिला लोदगेकर, पांडुरंग घोटकर,थिएटर मालक सुरेखा पवार,कल्याणी घावरे, अनिता डवरी,डॉ.अशोकराव जाधव,किसनराव जाधव,सुरेश हरगुडे,भरत पालवे,संदीप चंदन, रूपा परभणीकर यांचे सह कलाकार,रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.स्मृतिभवन शंकरनगर येथे दि.२८ फेब्रुवारी व १ मार्च या कालावधीत या स्पर्धांचे आयोजन केले आहे.
प्रस्ताविकात कु.स्वरुपाराणी मोहिते पाटील म्हणाल्या,जयसिंह मोहिते पाटील यांनी सहकार महर्षींचे अमृत महोत्सवी जयंती वर्ष १९९३ पासून राज्यस्तरीय लावणी नृत्य स्पर्धेला सुरुवात केली.व हा लावणी स्पर्धेचा प्रवास अविरतपणे तब्बल २६ वर्ष चालला.पुन्हा २०२४ पासून हा प्रवास पुढे सुरु आहे.आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात जुनी पारंपारिक कला जतन करण्याचा हा प्रयत्न आहे.यामध्ये पारंपारिक कलाकारांचे व रसिकांचे मोठे योगदान आहे.या वर्षी ११ पार्ट्यांना सहभाग दिला आहे.
स्पर्धेच्या प्रारंभी सादरीकरणाचा पहिला मान अलंकार सांस्कृतिक कला केंद्र ग्रुप पार्टी सुपा अहिल्यानगर या संघाला मिळाला.त्यांनी सादर केलेल्या सर्वच लावण्याला रसिकांनी दाद दिली.सायंकाळी उशिरापर्यंत
गीता अश्विनी श्रुती वाईकर रेणुका सांस्कृतिक कला केंद्र गोकुळ शिरगाव कोल्हापूर,अपर्णा कीर्ती नगरकर लक्ष्मी सांस्कृतिक कला केंद्र सणसवाडी पुणे,वैशाली समसापुरकर जय अंबिका सांस्कृतीक कला केंद्र सणसवाडी पुणे,बेला श्रद्धा नेटूरकर जय भवानी सांस्कृतिक कला केंद्र, पांढरीचा पूल अहिल्यानगर या पार्ट्यांचे दमदार सादरीकरण झाले. सूत्रसंचालन राजकुमार पाटील व किरण सूर्यवंशी यांनी केले.
*चौकट..*
या स्पर्धेसाठीची भव्य पारितोषिके प्रथम क्रमांकास रुपये तीन लाख, द्वितीय क्रमांकास रुपये दोन लाख, तृतीय क्रमांकास रुपये एक लाख अशी बक्षिसे आहेत तर उत्कृष्ट नृत्यांगना रुपये ५ हजार व कै. श्रीमती रत्नप्रभादेवी मोहिते पाटील स्मृती चषक,उत्कृष्ट अदा(वैयक्तिक) रुपये ५ हजार,उत्कृष्ट मुजरा रुपये ३ल हजार,या शिवाय उत्कृष्ट ढोलकीपटू,उत्कृष्ट पार्श्वगायिका, उत्कृष्ट पेटीवादक व उत्कृष्ट तबलावादक यांनाही वैयक्तिक पारितोषिक देण्यात येणार आहेत.






कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा