Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शुक्रवार, ६ फेब्रुवारी, २०२६

*लहान मुले महिला पळविणाऱ्या टोळीपासून सावधान* *हत्या करून मानवी अवयवांचा तस्करी साठी वापर होत असल्याचा संशय?*

 इकबाल  बाबासाहेब  मुल्ला* 

( *पत्रकार* )

*मोबाईल - 8983587160*


*पत्ता* विचारत, जवळीक साधत एखादी व्यक्ती तुमच्याकडे आली तर अजिबात *उत्तर* देऊ नका,त्याच्या जवळ जाऊ नका..कारण कदाचित ते *मानव तस्करी* करणाऱ्या टोळीतील गुंड असू शकतील. तुमच्या *लहान मुलाला* एखादी व्यक्ती बोलावत असेल, *चॉकलेट* देत असेल,मी तुमच्या मम्मी -पप्पा यांचा "मित्र" आहे,मी तुझा *काका* आहे असे म्हणत ती व्यक्ती "खाऊ" देत असेल तर आपल्या मुलाला चॉकलेट न घेण्यासंदर्भात सांगा, घरात *साधू अथवा फकीरच्या* वेषात येऊन पिण्यासाठी *पाणी* कोणी मागत असेल तर "माणुसकी" न दाखवता अजिबात पाणी देऊ नका कारण पाणी पिण्याच्या "बहाण्याने" ते तुमच्या घराची "रेकी" करून,तुमच्या घरातील लहान मुलं *पळवून* नेऊ शकतात, तुमची *कॉलेजला* असणारी *मुलगी* कॉलेजवरून घरी येत असेल,रस्त्यात एखादी *वृद्ध* अचानक *चक्कर* येऊन पडली तर तिच्या जवळ जाऊ नका.कारण हा तुमच्यासाठी *सापळा* असू शकतो.

एकांतात कॉलेजच्या मुलीसमोर "चक्कर" येऊन पडल्याचे नाटक करून,त्या टोळीतील इतर *साथीदार* जवळ येऊन *घेरतात.*,नाकावर *स्प्रे* मारून बेशुद्ध करतात,आणि त्यांचा साथीदार *चारचाकी* घेऊन तेथे येतो,आणि त्या मुलीला क्षणार्धात गाडीमध्ये घेऊन पळवून नेले जाते.

*दिल्लीमध्ये*, उत्तरप्रदेशमध्ये, 10 वर्षात *13 लाख* लहान मुले आणि महिला गायब झाले  आहेत.  सध्या दिल्लीमध्ये महिन्यात *48 मुले - महिला* गायब होत आहेत. सरकार काय करत आहे?? *पोलिसांचे* लक्ष नाही का ?? असे प्रश्न आता विचारत बसायचे नाही.कारण तुमच्या घरातील एखादी व्यक्ती पळवली गेल्यास पोलीस केवळ *तक्रार* नोंद करतात. चौकशी होईल अथवा न होईल याची श्वाश्वती नाही. त्यामुळे *पालकांनीच* खबरदारी घेत आपल्या लहान मुलांना -महिलांना *सावध* करणे अत्यावश्यक आहे.कारण तिचं आपली जबाबदारी आहे. आपणच पोलीस आणि आपणच प्रशासन आहोत हे समजून आपल्या मुलांची *सुरक्षितता* करायची आहे. आपल्या *मुलांची हत्या* करून त्याचा वापर मानवतस्करी साठी होऊ शकतो.त्यामुळे तुमच्या कुटुंबाचे "संरक्षण" व्हावे या उदात्त हेतूने हा लिहिलेला लेखप्रपंच !



आपण स्वतःला *कमनशिबी* समजतो तथापि स्वतःची किंमत "शून्य" समजतो,परंतु *पाश्चात्य देशात* तस्करी केलेल्या अर्थात पळवून आणलेल्या मुलांना - मुलींना महिलांची *हत्या* रून त्यांच्या शरीरातील *अवयव* काढले जातात त्या अवयवांची किंमत "करोडो" रुपये असते.किडनी पासून डोळ्यापर्यंत *25 ते 50 कोटी* रुपयांची किंमत आपल्या अवयवयांची असते.आणि आपण इतके *कोट्यवधी* रुपयांचे शरीर *परमेश्वराने* दिलेले असताना देखील त्या परमेश्वराचे "*आभार*" कधी मानत नाहीत ही शोकांतिका आहे.

सर्वानी लहान मुले - महिला पळविणाऱ्या टोळीपासून सावध राहावे,आपल्या लहान मुलांची - महिलांची स्वकीयांची आवर्जून काळजी घ्यावी ही विनंती !

. *इकबाल  बाबासाहेब  मुल्ला* 

( *पत्रकार* )

संपादक - सांगली वेध 

संपादक - वेध मीडिया न्यूज,सांगली.

*मोबाईल - 8983587160*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा