*संपादक -*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-9730867448*
मुंबई : अजित पवार यांच्या अपघाती निधनाबद्दल अनेक गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. शिवाय राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून अनेक शंका कुशंकाही उपस्थित केल्या जात आहेत. याच दरम्यान आमदार रोहीत पवार यांनी एक सूचक वक्तव्य केलंय त्यामुळे चर्चाना पुन्हा एकदा उधाण आले आहे.
अजित पवारांच्या विमान अपघाताने अनेक प्रश्नांना जन्म दिला आहे. दादांच्या विमानाचा अपघात का आणि कसा झाला? याचा अद्याप उलगडा झाला नाही. पण या अपघाताच्या दिवसापासून त्याविषयी अनेक शंका कुशांका व्यक्त केल्या जात आहे.आता रोहित पवारांनी त्या विषयी हे सूचक वक्तव्य केलं आहे.
पक्षातील नेत्यांचे गंभीर प्रश्न
अजित पवारांच्या विमानाचा अपघातावर त्यांच्याच पक्षातील नेत्यांनी यापूर्वी काही गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. अजित पवारांसह विमानातील एकूण व्यक्ती आणि अपघातानंतर मिळालेले मृतदेह यातील तफावतीवर अमोल मिटकरींनी सवाल उपस्थित केला होता. ज्या पद्धतीनं अजित पवारांच्या विमानाचा अपघात झाला त्यावरून काहींच्या मनात संशयाची पाल चुकचुकली आहे. अजित पवारांचा विमान अपघात होण्यापूर्वी काय घडलं याविषयी अनेक तर्क वितर्क लावले जात आहेत.
अजित पवारांच्या विमान अपघाताचा घटनाक्रम
* सकाळी 8.10 वाजता अजित पवार मुंबई विमानतळावरून खासगी विमानानं बारामतीच्या दिशेनं निघाले.
* पावणे 9 वाजण्याच्या सुमाराला ते बारामतीच्या विमान धावपट्टीच्या परिसरात पोहोचलं होतं.
* विमान धावपट्टीच्या अंतिम टप्प्यावर आल्याचा वैमानिकानं संदेश दिला
* पण धावपट्टी स्पष्ट दिसत नसल्यानं विमान धावपट्टीवर उतरवण्यात वैमानिकाला अपयश आलं
* वैमानिकानं धावपट्टीला एक गोल चक्कर मारला. दरम्यान विमानाच्या स्थिती विषयी विचारणा करण्यात आली होती.
* विमान धावपट्टीच्या अंतिम टप्प्यावर असल्याचं वैमानिकानं सांगितलं
* धावपट्टी दिसते का? अशी विचारणा वैमानिकाला करण्यात आली.
* धावपट्टी दिसत नसल्याचं विमानातून कळवण्यात आलं. धावपट्टी दिसल्यावर कळवतो असं उत्तरही देण्यात आलं.
* काही सेकंदानंतर धावपट्टी दिसत असल्याचं वैमानिकानं कळवलं
* सकाळी 08:43 वा. विमानाला उतरवण्याची सूचना देण्यात आली. पण विमानातून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.
* सकाळी 08:44 वाजता ATC कर्मचाऱ्यांना धावपट्टी लगत आग दिसली.
* धावपट्टीच्या सुरुवातीच्या डाव्या बाजूला विमान कोसळलं
* खरं तर 8.50 लँण्डिंग अपेक्षित होतं. मुंबईतून निघाल्यानंतर अवघ्या 35 मिनिटांतचं तो भीषण अपघात झाला.
नेमकं काय म्हणाले रोहित पवार?
रोहित पवार म्हणाले, विमानात काय घडलं? कसं घडलं? हे सुद्धा नऊ तारखेनंतर स्पष्टपणे बोलता येईल, जी काय आमच्यापर्यंत माहिती आली आहे, काही माहिती आम्ही मागत आहोत, तर एखादी घटना घडल्यानंतर खरंच काय झालं, हे लोकांसमोर येणं फार महत्त्वाचं आहे आणि पवार परिवार म्हणून किंवा एक महाराष्ट्राचा नागरिक म्हणून सुद्धा लोकांच्या मनामध्ये ज्या शंका आहेत जे काही अनुत्तरीत प्रश्न आहेत त्याचे योग्य उत्तर मिळेल ही अपेक्षा आहे.
अजित पवारांच्या विमानात नेमकं काय घडलं?
याविषयी अद्याप ठोस माहिती बाहेर आली नसली तरी रोहित पवारांच्या सूचक वक्तव्याचा अर्थ काय? रोहित पवार 9 तारखेला अपघाताविषयी नेमकी कोणती माहिती उघड करणार आहेत? रोहित पवारांकडे अशी कोणती माहिती आहे? हे 9 तारखेला उघड होईल




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा