Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

रविवार, ८ फेब्रुवारी, २०२६

मिनी आमदारकीची समजली जाणारी जिल्हापरिषद व पंचायत समितीची निवडणूक शांततेत.

 इंदापूर, डॉ. संदेश शहा.

टाईम्स 45 न्यूज मराठी 

सहसंपादक, मो. ९९२२४१९१५९



इंदापूर तालुक्यात मिनी आमदारकीची समजली जाणाऱ्या जिल्हा परिषदेच्या ८ व पंचायत समितीच्या १६ जागांसाठी संध्याकाळी सात वाजेपर्यंत मतदान प्रकिया शांततेत पार पडली. प्रशासनाच्या योग्य नियोजनामुळे निवडणूक प्रक्रियेत कायदा व सुव्यवस्था चोख राहिली. पोलिस निरीक्षक विलास नाळे व सहकाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

जिल्हा परिषदेच्या ८ जागांसाठी ४१, तर पंचायत समितीच्या १६ जागांसाठी ७२ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. एकूण ३ लाख २१ हजार २ मतदारांसाठी जिल्ह्यात सर्वाधिक ४०० मतदान केंद्र उभारण्यात आली आहेत. २ हजार ४५० अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांची मतदान केंद्रांवर नियुक्ती करण्यात आली होती. सकाळी साडेसात वाजता मतदान प्रक्रियेस सुरुवात झाली.

  राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी सकाळी आठ वाजता भरणेवाडी येथे तर  माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्या अंकिता पाटील ठाकरे यांनी नऊ वाजण्याच्या सुमारास बावडा येथे मतदान केले. माजी जिल्हा परिषद सदस्य प्रवीण माने यांनी दुपारी एक वाजता रुई या गावी मतदान केले. सायंकाळी साडेपाच वाजता मतदान प्रक्रिया बंद करण्यात आली. मात्र काही प्रमुख गावांमधील मतदान केंद्रांमध्ये असणाऱ्या मतदारांचे मतदान सहा वाजेपर्यंत पूर्ण करुन घेण्यात आले. 

    डिसेंबर महिन्यात झालेल्या नगरपरिषद निवडणुकीदरम्यान एकमेकांविरुद्ध लढलेले कृषी मंत्री दत्तात्रय भरणे व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील या निवडणूकीसाठी एकत्र आले आहेत तर कृष्णा भीमा विकास आघाडीच्या पॅनलमधून भाजपसह इतर पक्षाची मोट बांधणारे प्रदीप गारटकर, प्रवीण माने हे भाजपच्या वतीने खिंड लढवत आहेत. नेत्यांची  अनपेक्षित झालेल्या युती मुळे अनेक प्रमुख कार्यकर्त्यांना पक्ष बदलून निवडणूक लढवावी लागली आहे. नेते व कार्यकर्त्यांच्या संधीसाधू युतीमुळे मतदार शांततेत क्रांती करणार असल्याची चर्चा मतदान प्रक्रिये दरम्यान रंगली होती. नेते व कार्यकर्त्यांची युती व आघाडी मतदारांना आवडली की आवडली नाही हे निकालावरून स्पष्ट होणार आहे.

 नगरपरिषद निवडणुकीत कृष्णा भीमा विकास आघाडीच्या माध्यमातून मंत्री दत्तात्रय भरणे यांना जोरदार आव्हान देणारे हर्षवर्धन पाटील आत्ता त्यांच्या खांद्याला खांदा लावून रिंगणात उतरले आहेत. तसेच दोघांची ही दुसरी पिढी निवडणूकीत आपले भविष्य आजमावत आहेत. त्यांच्यासह आप्पासाहेब जगदाळे यांचे सुपुत्र आपल्या राजकीय आयुष्यातील पहिल्या निवडणुकीला सामोरे जात आहेत. विलास वाघमोडे तसेच श्रीमंत ढोले या वजनदार नेत्यांनी केलेल्या कामावर मते मागितली आहेत. मात्र

 बदलणाऱ्या युत्या व आघाड्या पाहून चक्रावून गेलेले मतदार व कार्यकर्ते, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकल्पित अकस्मात निधनामुळे सैरभर झाला आहे. तो पूर्णतः अजित पवार यांना आदरांजली वाहण्याच्या मनस्थितीत दिसत आहे. मतदार राजाचा एकंदरीत कल पाहून निवडणुकीतील दोन्ही महत्वाच्या पक्षांनी स्वर्गीय अजित पवार यांच्याच भोवती फिरेल अशा पध्दतीने भावनिक प्रचार केला आहे. कोणाला कितपत यश मिळेल यांचे गणित तूर्तास मतपेटीत बंद झाले आहे. निवडणूक प्रचारात झालेले अनेक गौप्यस्फोट, प्रचाराला मिळालेला कमी वेळ, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात झालेले दुर्दैवी निधन यामुळे ही निवडणूक वैशिष्टपूर्ण ठरली आहे.  

दरम्यान कृषीमंत्री दत्तात्रय भरणे, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी आज पार पडलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक प्रक्रियेत मतदान करून आपले कर्तव्य बजावणारे सर्व मतदार, निवडणूक प्रक्रिया यशस्वीपणे पार पाडणारे निवडणूक कर्मचारी, पोलिस प्रशासन निवडणुकीसाठी अथक परिश्रम घेतलेले सर्व नेते,पदाधिकारी व असंख्य कार्यकर्त्यांचे

आभार मानले असून विजयाचा दावा केला आहे तर भाजप चे नेते प्रदीप गारटकर, प्रवीण माने, यशवंत माने यांनी यावेळी परिवर्तन होणार असल्याचे सूतोवाच केले आहे. त्यामुळे निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सोबत प्रशासनाकडून उपलब्ध झालेली गट व गण निहाय मतदानाची आकडेवारी पुढील प्रमाणे आहे.

जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक 

इंदापूर तालुक्यातील मतदारांची संख्या ३२१००२, झालेले एकूण मतदान २१०७८८ (६५.६७ ) टक्के.

भिगवण : 

भिगवण एकूण मतदार २१०८३, झालेले मतदान १३५६७ (६४.३५ टक्के)

 शेटफळगढे एकूण मतदार २०९०७, झालेले मतदान १४७२३ (७०.४२ टक्के) गटातील 

एकूण मतदार (४१९९०) झालेले मतदान (२८२९०)(६७.३७ टक्के)

पळसदेव 

पळसदेव : एकूण मतदार (१८५०८) झालेले मतदान(१२३१३) (६६.५३ टक्के)

 बिजवडी : एकूण मतदार (२२६७४) झालेले मतदान (१५८८६),(७०.०६ टक्के)

 गटातील एकूण मतदार  (४११८२) झालेले मतदान (२८१९९), (६८.४७ टक्के)

वडापूरी 

 माळवाडी : एकूण मतदार (१८७१८) झालेले मतदान (१३६३२) (७२.८३टक्के)

 वडापूरी : एकूण मतदार (१७९२८) झालेले मतदान (१३३९५) (७४.७२ टक्के), गटातील एकूण मतदार (३६६४६) झालेले मतदान २७०२७(७३.७५ टक्के)

निमगाव केतकी

 निमगाव केतकी : एकूण मतदार (१९०१८), झालेले मतदान ( १३१२५), (६९.०१ टक्के),

 शेळगाव : एकूण मतदार(२०८८०), झालेले मतदान (१३२३७),( ६३.४ टक्के),गटातील 

 एकूण मतदार (३९८९८) झालेले मतदान (२६३६२) (६६.०७ टक्के)

वालचंदनगर

 बोरी : एकूण मतदार( २०५०६) झालेले मतदान (१२४८०)(६०.८६ टक्के),

वालचंदनगर : एकूण मतदार (२१४६९) झालेले मतदान (११०५१)(५१.४७ टक्के), गटातील

एकूण मतदार  (४१९७५) झालेले मतदान (२३५३१) (५६.०६ टक्के)

लासुर्णे

 लासुर्णे : एकूण मतदार ( २१७२६) झालेले मतदान (११८०३)( ५४.३३टक्के)

सणसर : एकूण मतदार(२२२८४) झालेले मतदान (११०९९) (४९.८१ टक्के) गटातील 

 एकूण मतदार (४४०१०) झालेले मतदान (२२९०२) (५२.०४ टक्के)

काटी

 काटी : एकूण मतदार(१९३५५) झालेले मतदान (१४९६७)(७७.३३ टक्के)

 लाखेवाडी : एकूण मतदार (१९१८७) झालेले मतदान (१४२८२) (७४.४४ टक्के), गटातील एकूण मतदान  (३८५४२) झालेले मतदान (२९२४९)(७५.८९ टक्के)

बावडा 

 बावडा : एकूण मतदार(१९५६६) झालेले मतदार (१३१०५) (६६.९८ टक्के)

 लुमेवाडी : एकूण मतदार (१७१९३) झालेले मतदान  (१२१२३) (७०.५१ टक्के), गटातील 

 एकूण मतदान  (३६७५९) झालेले मतदान (२५२२८)(६८.६३ टक्के).

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा