Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

बुधवार, ११ फेब्रुवारी, २०२६

अकलूजमध्ये नॅशनल लेव्हल ‘आय चॅम्प’ अबॅकस स्पर्धेचा भव्य पारितोषिक वितरण सोहळा संपन्न.

 उपसंपादक - नूरजहाँ शेख

टाइम्स 45  न्युज मराठी


अकलूज  समृतीभवन येथे नॅशनल लेव्हल ‘आय चॅम्प’ अबॅकस कॉम्पिटिशन अंतर्गत यशस्वी विद्यार्थ्यांचा भव्य पारितोषिक वितरण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.आय चॅम्प अबॅकस चे डायरेक्टर विशाल माने व स्नेहल माने यानी कार्यक्रमाचे आयोजन केले होते.सहकार 



महर्षी शंकरराव मोहिते पाटील व रत्नप्रभा देवी मोहिते पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन प्रमुख पाहुणे स्वरूपाराणी मोहिते पाटील  यांच्या हस्ते करून कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला ,

 या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून स्वरूपाराणी मोहिते , पाटील, शीतल देवी मोहिते पाटील ,सयाजी राजे मोहिते पाटील ,महेंद्र वाकसे,गणपत शिवाजी मोरे,हेमंत बर्डे,जय फडतरे,वनिता कोरटकर,मनोरमा लावंड आदी मान्यवर  उपस्थित होते. 



या स्पर्धेत विविध जिल्ह्यातील 458 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवून आपल्या गणिती कौशल्याचे प्रभावी प्रदर्शन केले. क्षणात उत्तर देण्याची क्षमता, एकाग्रता व आत्मविश्वास यामुळे विद्यार्थ्यांनी उपस्थितांची मने जिंकली.सहभागी प्रत्येक विद्यार्थ्यांना ट्रॉफी मेडल व सर्टिफिकेट देवून सन्मानित करण्यात आले.

यशस्वी विद्यार्थ्यांना सायकल ,स्मार्टवॉच अशी  आकर्षक पारितोषिके.मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आली. यावेळी प्रमुख पाहुण्या स्वरूपा राणी मोहिते पाटील यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करत अबॅकस शिक्षणामुळे मुलांचा बौद्धिक विकास व आत्मविश्वास वाढत असल्याचे सांगितले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षक, पालक व आयोजकांचे मोलाचे सहकार्य लाभले.कार्यक्रमाचे प्रस्ताविक लेखिका नूरजहाँ शेख यांनी केले

सुत्रसंचलन अभिनेत्री करिश्मा गावडे यांनी केले तर आभार सौ. स्नेहल माने यांनी मानले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा