Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शुक्रवार, १३ फेब्रुवारी, २०२६

*जैन समाजाचे देश विकासात मोठे योगदान असून हा समाज देशात जिडीपी तयार करणारा समाज आहे :- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस*

 *पुणे, डॉ. संदेश शहा*.

*टाईम्स 45 न्यूज मराठी*

*सहसंपादक मो. ९९२२४१९१५९*



जैन देश विकासात मोठे योगदान असून हा समाज आजच्या भाषेत देशात सर्वाधिक जीडीपी तयार करणारा समाज आहे. या समाजाचे सर्वाधिक सेवा व दानशूरता हे देखील वैशिष्ट्य आहे असे प्रतिपादन राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी केले.

णमोकार तीर्थ मालसाने ( तालुका चांदवड जिल्हा नाशिक ) येथे सुरू असलेल्या पंचकल्याणक महोत्सवात तीर्थंकर भगवान यांचा  जन्मकल्याणक (पूर्वार्ध) सोहळा मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल होते. यावेळी आचार्य पुष्पदंत सागर, आचार्य कुंथुसागर, कार्यक्रमाचे मुख्य संयोजक आचार्य देवनंदी महाराज, आचार्य कनकनंदी महाराज, भक्तांबर वाले आचार्य प्रमाणसागर महाराज, युगल मुनिराज अमोघकिर्ती व अमरकीर्ती यांच्यासह ३५० हून जास्त मुनी, आर्यिका, ब्रह्मचारी उपस्थित होते.




मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस पुढे म्हणाले,  प्रभू रामचंद्र यांच्या पावन स्पर्शाने ही भूमी पवित्र झाली असल्याने या भूमीतील णमोकार तीर्थ ही पवित्र भूमी सर्वांसाठी भक्ती केंद्र बनली आहे. ती समाजाला कायम प्रेरणा देणारी ठरेल.   पंचकल्याणक महोत्सवास उपस्थित राहण्याचा योग आला हे माझे भाग्य असून, सर्व मुनीश्रींचे दर्शन व आशीर्वाद मिळाल्याने आंनदी आहे. या सेवाकार्यास सर्वतोपरी सहकार्य केले जाईल अशी ग्वाही त्यांनी दिली.

यावेळी अध्यक्षीय भाषणात प्रफुल्ल पटेल म्हणाले, जैन समाजाने कायम धार्मिक संस्कार जपत देशाच्या चौफेर विकासात सर्वांगीण योगदान दिले आहे. हे तीर्थक्षेत्र कायम अहिंसा व त्यागाचा संदेश देत राहील.

यावेळी मंत्री गिरीश महाजन, शिक्षणमंत्री दादा भुसे, माजी केंद्रीय मंत्री डॉ. भारती पवार, चांदवड देवळा मतदार संघाचे आमदार डॉ. राहुल आहेर, आमदार दिलीप बनकर, आमदार सतीश केळकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. 




यावेळी णमोकार तीर्थ ट्रस्टच्या वतीने संतोष पेंढारी, नीलम अजमेरा, भूषण कासलीवाल, महावीर गंगवाल यांनी मान्यवर अतिथींचा सत्कार केला. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्या हस्ते बालब्रह्मचारी वैशाली दीदी, जया दीदी, नीलम अजमेरा, संतोष पेंढारी, भूषण कासलीवाल यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर महसूल आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, जिल्हाधिकारी

आयुष प्रसाद, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार, पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील, सहायक जिल्हाधिकारी कश्मिरा संख्ये, आंतरराष्ट्रीय पंचकल्याणक समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष संतोष पेंढारी, संयोजक नीलम अजमेरा, कीर्ती अजमेरा, दिनेश शेठी, कमल ठोलिया, बालब्रह्मचारी वैशाली दीदी, जयू दीदी, रुबीजी देवडा लोहाडे, उपाध्यक्ष महावीर गंगवाल, ट्रस्टी पवन पाटणी, विजय लोहाडे, संतोष काला, सुमेर काले, ललित पाटणी, महेंद्र काले, अनिल जमगे, भूषण कासलीवाल, चंद्रशेखर कासलीवाल, पारस लोहाडे, डॉ. अतुल पाटणी, वर्धमान पांडे, पूनम संचेती, नूतन कासलीवाल, सोनल दगडे, आर. आर. पहाडे, अमित कासलीवाल, निलेश काला, संजय कासलीवाल, रूपेश जैन, अमित लोहाडे, विजय झांजरी, सन्मती सेवा दलाचे संस्थापक बाबूभाई गांधी, तीर्थक्षेत्र समितीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष मिहिर गांधी, दिगंबर जैन हुमड फेडरेशनचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. श्रेणिक शहा, प्रीतम शहा पळसदेवकर, अनिल जमगे, राजेश फडकुले, राहुल शहा, मंगेश दोशी, शरद दोशी आदी उपस्थित होते.

दुपारी अडीच वाजता हेलिपॅडवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिक्षणमंत्री दादा भुसे,  आमदार राहुल आहेर यांचे पंचकल्याणक समितीच्या वतीने जोरदार स्वागत करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी राष्ट्रसंत गणधराचार्य १०८ श्री कुंथूसागरजी महाराज, आचार्य १०८ श्री देवनंदीजी महाराज व सर्व मुनीश्रींचे आशीर्वाद घेतले. यावेळी अहिंसा परमो धर्म,आचार्य देवनंदी महाराज यांचा जयघोष करण्यात आला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा