पुणे, डॉ. संदेश शहा.
टाईम्स 45 न्यूज मराठी
सहसंपादक, मो. ९९२२४१९१५९
महाराष्ट्र पेंशनर्स असोसिएशन पुणे अंतर्गत अहिल्यानगर, शाखा जामखेडचे अध्यक्ष डॉ. संजय गिते, माजी अध्यक्ष तथा कार्याध्यक्ष पोपट भुते, कोषाध्यक्ष दत्तात्रय अटकरे, दक्षिण विभाग प्रमुख ज्ञानेश्वर थोरात यांच्यासह ७१ सेवानिवृत्त शिक्षकांनी मुख्यमंत्री सहायता निधीस ३५८५१ रुपयांचा निधी धनादेश प्रदान केला. शेतकरी सबलीकरण तसेच पूरग्रस्त शेतकरी व नागरिक यांच्या मदतीसाठी अध्यक्ष डॉ. गीते यांच्या हस्ते मुख्यमंत्री सहायता निधि कक्ष प्रतिनिधी नायब तहसीलदार किशोरी त्र्यंबके, महसूल सहायक रमेश कांबळे यांच्याकडे धनादेश प्रदान करण्यात आला.
यावेळी डॉ. संजय गीते म्हणाले, जामखेड तालुक्यातील सर्व सेवा निवृत्त शिक्षकांनी फूल न फूलाची पाकळी या भावनेतून ३५८५१ रुपयांचा निधी जमा करून देणगी चेक तालुका दंडाधिकारी श्री. बांगर साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत मुख्यमंत्री सहायता निधीसाठी प्रदान केला. जामखेड तालुका शिक्षक संघटनेचे अध्यक्ष डॉ. संजय गीते, ज्ञानेश्वर थोरात, पोपट भुते, मोहन शंकर खवळे यांनी सर्व सेवानिवृत्त शिक्षक यांच्याशी संपर्क करून हा निधि जमा केला. या अभिनव उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा