उपसंपादक - नूरजहाँ शेख
टाइम्स 45 न्युज मराठी
- शब्दांगण बहुउद्देशीय ज्ञान प्रबोधिनी संस्था,चंद्रपूर व्दारा आयोजित राज्यस्तरीय शब्दांगण साहित्य पुरस्कारासाठी इंद्रजीत पाटील यांच्या 'शेलक्या बारा' या कथासंग्रहाची निवड झाली होती.
स्व.लक्ष्मी तुकारामजी सूर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ हा राज्यस्तरीय पुरस्कार लेखक इंद्रजीत पाटील यांना प्रदान करण्यात आला.त्यांच्या या कथासंग्रहास मिळालेला हा तेरावा राज्यस्तरीय पुरस्कार असून त्यांच्या 'कळ पाेटी आली आेठी' या अष्टाक्षरी कवितासंग्रहासही दहा व एकूण साहित्यिक कामगिरीसाठी इतर सात असे २०२४ या वर्षासाठी तीस राज्यस्तरीय पुरस्कार मिळाले आहेत.शब्दांगण संस्थेचे अध्यक्ष प्रा.डाॅ.अनंता सूर यांनी हा पुरस्कार त्यांना सन्मानपूर्वक प्रदान केला.सन्मानचिन्ह,सन्मानपत्र,शाल,श्रीफळ व राेख रक्कम असे पुरस्काराचे स्वरूप हाेते.
ग्रामीण भागातील या प्रतिभाशाली साहित्यिकाची गरूडभरारी पाहून श्री. माधवरावजी कुतवळ,पंडितराव लाेहाेकरे,चंद्रकांत पाटील,रावसाहेब पाटील,संजय भड,अमाेल देशमुख,जीवराज गरड यांनी विशेष अभिनंदन केले व पुढील साहित्यिक वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.






कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा