Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

गुरुवार, ५ फेब्रुवारी, २०२६

*करमाळा तालुक्यातील पंचायत समिती तसेच जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये तीन गटाच्या विरोधात आमदार नारायण आबा पाटील यांचा गट देत आहे एकाकी कडवी झुंज*

 *करमाळा-- तालुका प्रतिनिधी* 

  *टाइम्स 45 न्यूज मराठी* 

*मो:-9850686360*


 

करमाळा तालुक्यामधील स्थानिक स्वराज्य संस्था अर्थात पंचायत समिती तसेच जिल्हा परिषदेच्या येत्या 7 फेब्रुवारी रोजी होऊ पाहणाऱ्या निवडणुकीमध्ये करमाळा तालुक्यामध्ये अटीतटीची कडवी झुंज पहावयास मिळत आहे

संपूर्ण जिल्ह्याचे नव्हे तर महाराष्ट्र राज्याचे लक्ष वेधू इच्छिणाऱ्या करमाळा तालुक्यामधील जिल्हा परिषद तसेच पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये कधी नव्हे या निवडणुकीत माजी आमदार संजय मामा शिंदे यांचा राष्ट्रवादी पक्ष तर माजी आमदार जयवंतराव जगताप यांचा जगताप गट याशिवाय माजी आमदार शामलताई बागल तसेच भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश महिला उपाध्यक्ष रश्मीताई बागल व युवा नेते दिग्विजय बागल यांचा भारतीय जनता पार्टी हा पक्ष असे मिळून बागल जगताप व शिंदे अशी तिन्ही गट एकत्र येऊन सत्ताधारी आमदार नारायण आबा पाटील यांच्या विरोधात निवडणूक लढवीत आहे मात्र अशाही परिस्थितीत आमदार नारायण आबा पाटील यांच्या करमाळा तालुका विकास आघाडीच्या माध्यमातून निवडणुकीच्या मैदानात उतरून एकाकी कडवी झुंज देत आहे त्याचप्रमाणे त्यांना करमाळा तालुक्यातील जनता देखील उस्फूर्त प्रतिसाद देत आहे 

करमाळा तालुक्यातील राजकारणात एकेकाळी एकमेकाचे कट्टर शत्रू तसेच वैरी असणारे सध्या मित्र असल्याचे पहावयास मिळत आहे या निवडणुकीमध्ये माजी आमदार जयंतराव जगताप यांनी पत्रकार परिषदेमध्ये चक्क मी जिल्हा परिषदचे व पंचायत समितीचे निवडणुकीमध्ये कसल्याही परिस्थितीमध्ये माझे उमेदवार उभा करणार नाही व मी निवडणुकीमध्ये माघार घेणार अशा पद्धतीने जाहीर पत्रकार परिषदेमध्ये सांगणारे माजी आमदार जगताप मात्र बागल अर्थात भारतीय जनता पार्टीला पाठिंबा देताना दिसत आहे अचानकपणे महाविकास आघाडीला पाठिंबा देणारे जगताप आज जाहीर सभेमध्ये माजी आमदार नारायण आबा पाटील यांच्यावर टीका टिपणी करीत असल्याचे पहावयास मिळत आहे तर दुसरीकडे आमदार नारायण आबा पाटील तालुक्याच्या विकासात्मक दृष्टिकोनातून आपण सत्ता आल्यानंतर तालुक्याचा कसा कायापालट करू अशा पद्धतीने भाषण करून तालुक्यातील मतदाराची मने जिंकत आहे तर दुसरीकडे उघडपणे विरोधक टीका टिप्पणी करीत आहे 

आमदार नारायण आबा पाटील यांच्या करमाळा तालुका विकास आघाडीच्या माध्यमातून मात्र त्यांनी व त्यांच्या उमेदवाराने संपूर्ण तालुका पिंजून काढला असून त्यांना तालुक्यामधून मतदार उस्फूर्त व चांगला प्रतिसाद देत असल्याचे पहावयास मिळत आहे तर काही मतदार विरोधक हे एकमेकांचे शत्रू असणारे आता फक्त सत्तेचा मलिदा खाण्यासाठी एकत्र आले आहे असे खाजगीत बोलताना दिसत आहे एकंदर पाहता करमाळा तालुका विकास आघाडीने प्रचारात चांगलीच मजल मारली असून यामध्ये त्यांचे कार्यकर्ते व उमेदवार करून मतदारांना मतदान करण्याचे भावनिक आवाहन करीत आहे याशिवाय करमाळा शहरात नुकतेच नगरपालिकेवर सावंत गटाने एक हाती सत्ता काबीज केल्यानंतर आमदार नारायण आबा पाटील यांच्या खांद्याला खांदा लावून सावंत गट आज जिल्हा परिषद तसेच पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये उतरला आहे सावंत गटाला देखील मानणारा वर्ग आजही करमाळा तालुक्यामध्ये आहे याचा निश्चित फायदा आमदार नारायण आबा पाटील यांच्या करमाळा तालुका विकास आघाडीला होणार आहे त्याच पद्धतीने आमदार नारायण आबा पाटील यांचे कार्यकर्ते रात्रंदिवस आपल्या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी जीवाचे रान करीत असल्याचे पहावयास मिळत आहे याशिवाय राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदे यांच्या शिवसेना या पक्षाच्या वतीने सोलापूर जिल्हा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख महेशराव चिवटे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषद तसेच पंचायत समितीच्या निवडणुका ह्या चिवटे व त्यांचे शिवसेनेचे शिलेदार लढवीत आहे त्यांना देखील ग्रामीण भागातून चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे पहावयास मिळत आहे गटातटाच्या राजकारणाला व दळभद्री युतीला वैतागून यंदाच्या निवडणुकीत आमच्या शिवसेना पक्षाला मतदार भरभरून मते देतील व आमचे जिल्हा परिषद तसेच पंचायत समिती मधील सर्व उमेदवार निवडून येतील असे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख महेशराव चिवटे यांनी बोलताना सांगितले


                         चौकट 

पंचायत समिती तसेच जिल्हा परिषदेच्या सर्व जागा आम्ही जिंकणारच,,,,,, प्रवक्ते सुनील तळेकर यांचा दावा 

करमाळा तालुक्यातील स्थानिक स्वराज्य संस्था अर्थात पंचायत समिती तसेच जिल्हा परिषदेच्या दिनांक सात फेब्रुवारी रोजी होऊ पाहणाऱ्या निवडणुकीमध्ये आम्ही जिल्हा परिषदेच्या सहा तसेच पंचायत समितीच्या बारा जागेवर आमची निर्विवाद सत्ता येणार असून आम्ही विरोधकांना चारी मुंड्या चीत करू याशिवाय करमाळा तालुका विकास आघाडीच्या माध्यमातून आम्ही सत्ता स्थापन करू असे आमदार पाटील गटाचे प्रवक्ते सुनील तळेकर यांनी बोलताना सांगितले

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा