उपसंपादक - नूरजहाँ शेख
टाइम्स 45 न्युज मराठी
माळशिरस तालुक्यातील पूर्व भागातील लवंग २५/४ लवंग व गणेशगाव मधील विद्यार्थ्यानी
अकलूज स्मृतीनगर येथे झालेल्या नॅशनल लेव्हल आय चॅम्प अबॅकस स्पर्धेत घवघवीत यश मिळवले आहे. स्पर्धेचा भव्य पारितोषिक वितरण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. या सोहळ्यात विविध वयोगटातील विद्यार्थ्यांनी आपल्या वेगवान गणनकौशल्याचे प्रभावी प्रदर्शन केले.या प्रसंगी शीतलदेवी मोहिते पाटील ,स्वरुपाराणी मोहिते पाटील ,सयाजीराजे मोहिते पाटील प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते अबॅकस मुळे विद्यार्थ्यांमध्ये गणिताची भीती दूर होऊन आत्मविश्वास, एकाग्रता व स्मरणशक्ती वाढत असल्याचे यावेळी उपस्थित प्रमुख पाहुण्या स्वरुपाराणी मोहिते पाटील यांनी आपल्या मनोगतातून सांगितले.
स्पर्धेत उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या फिनिक्स स्कूल ची विध्यर्थिनी अदिती सोमनाथ चव्हाण सायकल विनर तर तस्मिया सत्तार शेख व रुद्रदीप रणजित चव्हाण १०० पैकी १०० गुण कमीत कमी वेळेत मिळवले व सुपर इंटेलिजन्स हा किताब मिळवून स्मार्ट वॉच विनर ठरले शिवराज चव्हाण वल्लभ कोळेकर ,गुरुराज कोळेकर ,आली कोरबु,रुद्र उघाडे , जिशान कोरबु,आदित्य यादव,राजकन्या मोरे ,असद शेख,आयशा कोरबू,अलीयान मुलाणी,अर्णव पाटोळे,कृष्णा चव्हाण,आहील शेख,महिरा शेख, अन्वीता कोळेकर, अफान शेख,गौरी देशमुख,तृप्ती चव्हाण,विरोही जगदाळे ,प्रणव कोळेकर,अतीब शेख, आसिया शेख, नूबैद मुलाणी,समर्थ वाघमारे या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह, प्रमाणपत्रे व पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. यावेळी प्रमुख अतिथी शीतल देवी मोहिते पाटील यांनी आपले विचार मांडताना सांगितले की विद्यार्थ्यांच्या यशामागे पालकांचे पाठबळ आणि मार्गदर्शक शिक्षकांचे योगदान मोलाचे ठरते .आय चॅम्प अबॅकस चे डायरेक्टर विशाल माने व स्नेहल माने यांनी सर्व विजेत्या विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
कार्यक्रमास पालकवर्ग, शिक्षक, प्रशिक्षक तसेच शिक्षणप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. टाळ्यांच्या गजरात विद्यार्थ्यांचे कौतुक होत असताना संपूर्ण सभागृहात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. हा सोहळा विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरला.ग्रामस्थांकडून या यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक होत आहे.
---------------------------------------------------------------------------







कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा