Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

सोमवार, १६ फेब्रुवारी, २०२६

ऍड, वजीर शेख यांचा महात्मा फुले महाराष्ट्ररत्न पुरस्कार देऊन गौरव

 अकलूज प्रतिनिधी 

   एहसान मुलाणी 

  टाइम्स 45 न्यूज मराठी 



अकलूज येथील मुस्लिम समाजाचे नेते व  राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष  अल्पसंख्यांक विभागाचे राज्य सरचिटणीस अँड  वजीर रहि महुल्लाह शेख यांना आहिल्यानगर येथे “महात्मा फुले महाराष्ट्र रत्न” हा राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले 

हा मानाचा पुरस्कार सायलीताई धनाबाई व प्रसिद्ध आदर्श समाजसेवक ज्योतिषाचार्य दिपक दीक्षित यांच्या हस्ते हॉटेल गोल्ड रोज येथे संपन्न झालेल्या भव्य सोहळ्यात प्रदान करण्यात आला.

        ऍड. वजीर शेख यांनी कोरोना काळात रुग्ण व गरजू नागरिकांसाठी केलेली अतुलनीय सेवा, मौलाना आझाद अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळ मार्फत सुमारे ६००० लाभार्थ्यांना केलेले कर्जवाटप तसेच अकलूज परिसरात स्थानिक पातळीवर सातत्याने केलेले सामाजिक व राजकीय कार्य शिवाय समाजातील प्रत्येक व्यक्तीच्या आणि अडचणी सुखदुःखात सहभागी होऊन सर्वांना सहकार्य करणारे प्रत्येक समाजाच्या कार्यात सहभागी होऊन सर्व समाजात त्यांना मानणारा मोठा गट असून  ऍड. वजीर शेख हे अकलूज नव्हे तर संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात. त्यांचा संपर्क असून या सर्व कार्याची दखल घेऊन त्यांना हा सन्मान प्रदान करण्यात आला.

या उल्लेखनीय यशाबद्दल अकलूज परिसर शहर तसेच विविध सामाजिक व राजकीय स्तरातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत असून सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.


*टाइम्स 45 न्यूज मराठी"* परिवाराच्या वतीने हार्दिक शुभेच्छा

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा