Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

रविवार, ८ फेब्रुवारी, २०२६

*करमाळा पंचायत समिती तसेच जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचा उद्या होणार फैसला* *सर्व पक्षाने व गटाने केला विजयाचा दावा*

 *करमाळा-- तालुका प्रतिनिधी* 

  *टाइम्स 45 न्यूज मराठी* 

*मो:-9850686360*




करमाळा तालुक्यातील पंचायत समितीच्या तसेच जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचा आज फैसला होणार असून कोणता गट जिंकणार तर कोणता गट हरणार याकडे संपूर्ण तालुकावाशियांचे लक्ष लागले आहे 

करमाळा पंचायत समितीच्या एकूण बारा जागे करिता तसेच जिल्हा परिषदेच्या सहा जागा करिता सदरची निवडणूक असून या निवडणुकीमध्ये सर्वच पक्षाने तसेच गटाने आपले अस्तित्व पणाला लावले असून आम्हीच जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका जिंकणार असा विश्वास व्यक्त केला आहे या निवडणुकीमध्ये सत्ताधारी आमदार नारायण आबा पाटील यांच्या करमाळा तालुका विकास आघाडी ची पार्टी स्वतंत्ररीत्या लढत असून यांच्या विरोधात भारतीय जनता पार्टीच्या वतीने माजी आमदार शामलताई बागल, भाजपाच्या महिला राज्य उपाध्यक्षा रश्मीताई बागल याशिवाय युवा नेते दिग्विजय बागल हे भारतीय जनता पार्टीच्या वतीने त्यांचे उमेदवार उभे करून सदरची निवडणूक लढवीत


आहे तर माजी आमदार संजय मामा शिंदे हे स्वर्गीय अजितदादा पवार यांच्याराष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने अ घड्याळाचे चिन्ह घेऊन निवडणूक लढवीत आहे याशिवाय उपरोक्त सर्व उमेदवारांना माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी उघडपणे पाठिंबा दिलेला आहे याशिवाय  राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना देखील निवडणुकीच्या मैदानात आहे 


करमाळा तालुका पंचायत समिती तसेच जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये कमालीची चुरस लागली होती या निवडणुकीमध्ये तीन गट एकीकडे तर दुसरीकडे स्वतंत्रपणे करमाळा तालुका विकास आघाडीचे आमदार नारायण आबा पाटील यांचा स्वतंत्र गट निवडणूक लढवीत होता या निवडणुकीमध्ये तिन्ही गटाच्या विरोधात एकाकी कडवी झुंज करमाळा तालुका विकास आघाडीच्या सर्व उमेदवारांनी दिलेली पहावयास मिळत होती या निवडणुकीमध्ये आम्हीच बाजी मारू असा आत्मविश्वास तिन्ही गटातील राजकीय कार्यकर्त्यांनी तसेच उमेदवारांनी बोलून दाखविला आहे 



दिनांक 9 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या निकालाकडे मात्र संपूर्ण तालुक्याचे नव्हे तर संपूर्ण सोलापूर जिल्ह्याचे लक्ष लागले आहे या निवडणुकीमध्ये करमाळा तालुका विकास आघाडी चे सर्व उमेदवार मोठ्या मताधिक्याने निवडून येतील असा दावा पाटील गटाचे प्रवक्ते सुनील तळेकर यांनी बोलून दाखवला तर दळभद्री युतीला कंटाळून करमाळा तालुक्यातील मतदार आमच्या शिवसेना पक्षातील उमेदवाराला भरघोस मतांनी निवडून देणार व आमचे सर्व उमेदवार  निवडून येणार असा आत्मविश्वास शिवसेना जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांनी बोलताना व्यक्त केला 

याशिवाय आमचे नेते माजी आमदार संजय मामा शिंदे यांचे तालुक्यातील विकासात्मक कामे पाहता मतदार जिल्हा परिषद तसेच पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये आमच्या उमेदवाराला भरघोस मतांनी निवडून देतील असा ठाम आत्मविश्वास शिंदे गटाचे युवा नेते सुजित बागल यांनी आपले मत बोलताना व्यक्त केली 

देशाचे नेते माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली आम्ही भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून करमाळा तालुक्यामधील पंचायत समिती तसेच जिल्हा परिषदेच्या सर्व जागा मोठ्या मताधिक्याने जिंकू असे भारतीय जनता पार्टीचे युवा नेते दिग्विजय बागल यांनी बोलताना सांगितले 

करमाळा तालुक्यातील पंचायत समिती तसेच जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये आम्ही सर्वच्या सर्व जागा जिंकून असा आत्मविश्वास सर्वच गटाच्या तसेच पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी बोलून दाखविला मात्र दिनांक 9 फेब्रुवारी रोजी होऊ घातलेल्या निकालाकडे मात्र संपूर्ण तालुक्याचे नव्हे तर जिल्ह्याचे लक्ष लागले आहे सदरचा निकाल कसा लागेल कोण कोणाला तारणार की कोण कोणाला हरविणार याकडे मात्र करमाळा तालुक्यातील मतदाराचे विशेष लक्ष लागले आहे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा