Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शुक्रवार, ६ फेब्रुवारी, २०२६

*अकलूज(महावीर पथ )येथे अकस्मित लागलेल्या आगीत रूपाली मशीनरी दुकानाचे लाखो रूपयांचे नुकसान.*

 *अकलूज --प्रतिनिधी*

  *केदार लोहकरे*

 *टाइम्स 45 न्यूज मराठी*



अकलूज येथील महावीर पथवरील रुपाली मशीनरी व पाईप्स या दुकानास पहाटे ४ वाजता शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीत दुकानातील शेतीच्या साहित्य जळून खाक झाल्याने ८० लाख ९० हजारांचे नुकसान झाले. दुकानाशेजारीच्या आयडीएफसी बँकेचे फर्निचरचे व उपाध्ये यांची बुलेट व रिक्षा जळाली आहे या घटनेची खबर सोहन सुहास गांधी यांनी अकलूज पोलिस ठाण्यात दिली असून या घटनेची अकस्मात जळीत नोंद करण्यात आली आहे.



              याबाबत सोहन गांधी यांनी अकलूज पोलिस ठाण्यात दिलेल्या खबरीनुसार गुरुवारी पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास मोठा आवाज झाल्याने बाहेर येऊन पाहिले असता.त्यांच्या मशीनरीच्या दुकानाला आग लागल्याचे दिसून आले.त्यांनी कुटुंबासह खाली येण्याचा प्रयत्न केला पण आग खूप मोठी असल्याने घराच्या खिडकीच्या गज वाकवून आई, वडील,पत्नी,२ मुलांसह बाहेर आले.त्यावेळी अग्निशामक दलाच्या गाड्यांनी तातडीने आग विझवल्यामुळे पुढील अनर्थ टळला.


         या आगीत दुकानातील शेतीचे इलेक्ट्रिक मोटरी (पंप) २२, सबमर्सिबल केबल ४ रोल,पिठाची चक्की व मिरची कांडप मशीन (२०),पीव्हीसी पाइप व फिटिंग साहित्य,इलेक्ट्रिक मोटर साहित्य, शेती खते,संसारोपयोगी वस्तू व फर्निचर,होंडा सिटी कार १ व दुचाकी २ असे साहित्य जळाले.



शॉर्ट सर्किटच्या आगीमुळे ८० लाख २० हजार रुपयांचे नुकसान झाले तर शेजारच्या आयडीएफसी फर्स्ट बँकेचे शटर,फर्निचर,एसी, सीसीटीव्ही सिस्टिम तसेच धन्यकुमार उपाध्ये यांची बुलेट गाडी व रिक्षा जळाले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.अधिक तपास पोलिस हेडकॉन्स्टेबल रणवरे हे करत आहेत.

*चौकट*

रूपाली मशिनरी या दुकानला अचानक लागलेल्या आग समजताच आग विझवण्यासाठी अकलूज नगरपरिषदेच्या पाण्याचा टॅंकर,स.म.शंकरराव मोहिते- पाटील कारखाना अग्निशामक दल शंकरनगर,पांडुरंग सहकारी साखर कारखाना आग्निशशामक दल श्रीपूर,श्री शंकर सहकारी साखर कारखाना आग्निशामक दल सदाशिवनगर यांच्या अथंग प्रयत्नामुळे आगीवर नियंत्रण आले.त्यामुळे पुढील अनर्थ टळला.पण या आगीत वित्त हानी मोठी झाली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा