Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

रविवार, ८ फेब्रुवारी, २०२६

विरोधकांच्या युतीची व्हॅलिडीटी उद्या संपणार असून आमदार नारायण आबा पाटील यांच्या नेतृत्वाखाली विजयाची हॅट्ट्रिक होणार,,,,,,,,,,, प्रवक्ते सुनील तळेकर यांचा दावा Head

 *करमाळा-- तालुका प्रतिनिधी* 

  *टाइम्स 45 न्यूज मराठी* 

*मो:-9850686360*


करमाळा प्रतिनिधी 

विरोधकांच्या युतीची व्हॅलिडीटी उद्या संपणार असून आमदार नारायण आबा पाटील यांच्या नेतृत्वाखाली विजयाची हॅट्ट्रिक होणार असल्याचा दावा पाटील गटाकडून करण्यात आला. जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या जागांसाठी काल मतदानाची प्रक्रिया पार पडली. यानंतर सर्वत्र मतांची आकडेवारी व अंदाज वर्तवण्यात येऊ लागले असून आज पाटील गटाचे प्रवक्ते सुनिल तळेकर यांनी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सर्व अठरा जागांवर करमाळा तालूका विकास आघाडीचे उमेदवार निवडून येणार असल्याचा दावा केला. याबाबत अधिक सविस्तर बोलताना सुनील तळेकर यांनी सांगितले की विद्यमान आमदार नारायण आबा पाटील यांच्या विरोधात करमाळा तालुक्यातील सर्व राजकीय गट एकत्र आले होते परंतु या अभद्र युतीचा सकारात्मक परिणाम एकाही गावात दिसून आला नाही. प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी अनेक गावांना भेटी दिल्या असता सर्वसामान्य मतदारांनी आपला कौल आमदार नारायण आबा पाटील यांच्या बाजूने असल्याचे जवळपास सिद्ध केले आहे. विरोधक हे विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवत नव्हते तर केवळ आमदार नारायण आबा पाटील यांचा पराभव करण्याच्या असुरी इच्छेने एकत्र आले होते. जनतेने त्यांचा हा हेतू वेळीच ओळखुन मतदान करत असताना नाकारल्याचे दिसून येत होते. कदाचित उद्या निवडणुक निकालातुन हे स्पष्ट होणारच आहे. बागल-जगताप व शिंदे ही रेंज नसलेली राजकीय सीमकार्ड असल्याने तालूक्यातील तटस्थ मतदारांनी सुद्धा आता परिवर्तनाच्या दिशेने वाटचाल करत करमाळा तालूका विकास आघाडीला मतदान केले आहे. केम, वांगी, चिखलठाण व वीट या गटातील करमाळा तालूका विकास आघाडीचे उमेदवार मोठ्या फरकाने विजयी होणार आहेत तर कोर्टी, पांडे येथील उमेदवार सुध्दा विजयाचा अटकेपार झेंडा फडकवतील तसेच कोर्टी गणात करमाळा तालूका विकास आघाडीस मिळालेले मताधिक्य हेच आमच्या या गटातील जि प उमेदवार योगिनी राजेभोसले यांचे मताधिक्य असणार आहे.

आगामी काळात अवघ्या चार महिन्यांत होणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकावर या युतीचा परिणाम होईल या भीतीपोटी बागल, शिंदे व जगताप गटातील अनेक कार्यकर्ते मतदानासाठी बाहेर पडलेच नाहीत. या उलट आमदार नारायण आबा पाटील गटासाठी ही निवडणूक गावातील व‌ पर्यायी तालूक्यातील वर्चस्व सिद्ध करण्यासाठी एक संधी असल्याने सर्वच कार्यकर्ते जोमाने काम करत असताना दिसुन आले. यामुळे विजयाची खात्री आणखी ठळक होत असल्याचे पाटील गटाचे प्रवक्ते सुनिल तळेकर यांनी सांगितले. तसेच माजी आमदार संजयमामा शिंदे यांच्या गटातील एकही उमेदवार निवडून येणार नसुन‌ संजय शिंदे हे आपल्या कार्यकर्त्यांना निवडून आणु शकत नाहीत यावर शिक्कामोर्तब होणार असल्याचे तळेकर यांनी ठोसपणे सांगितले.

1 टिप्पणी:

  1. असेच झाले पाहिजे ,म्हणजे राजकीय पक्ष व गट पण अनैसर्गिक युती करणार नाहीत.

    उत्तर द्याहटवा