Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

रविवार, ८ फेब्रुवारी, २०२६

*मालेगाव महापालिकेच्या महापौर पदी विराजमान झाल्या शेख नसरीन बानू!!...*

 मालेगाव.  प्रतिनिधी 

टाइम्स 45 न्यूज मराठी 


नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथील बहुसंख्य मुस्लिम संख्या असणाऱ्या महानगरपालिकेच्या महापौरपदी राजकीय इतिहासात प्रथमतःच मुस्लिम महापौर झाल्या आहे एम आय एम च्या शेख नसरीन बानू या मालेगावच्या महापौर बनल्या आहे नुकत्याच झालेल्या महानगरपालिकेच्या अटीतटीच्या निवडणुकीमध्ये मालेगाव येथे एम आय एम ने सर्वाधिक जागा जिंकल्या होत्या राज्यात प्रथमताच एक मुस्लिम महिला एमआयएमच्या माध्यमातून महापौर झाल्या आहेत

नाशिक जिल्ह्यातील राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली आहे. मालेगाव महानगरपालिकेच्या महापौरपदाच्या निवडणुकीत सत्तासमीकरणे नाट्यमयरित्या बदलली असून, इस्लाम पार्टीने  बाजी मारली आहे. या अटीतटीच्या लढतीत शिवसेना शिंदे गटाला जोरदार धक्का बसला असून, त्यांच्या उमेदवाराला मोठ्या फरकाने पराभवाचा सामना करावा लागला आहे.

सेक्युलर फ्रंटची सरशी  

महापालिकेच्या सभागृहात एकूण ८४ नगरसेवकांचे संख्याबळ असताना, महापौरपदासाठी झालेली ही निवडणूक अत्यंत चुरशीची ठरली. इस्लाम पार्टीच्या उमेदवार शेख नसरीन बानो आणि शिंदे गटाच्या उमेदवार लता घोडके यांच्यात थेट आणि सरळ सामना रंगला होता. या लढतीत नसरीन बानो यांनी विजयाचा गुलाल उधळला. त्यांना इस्लाम पार्टीचे ३५, समाजवादी पार्टीचे  ५ आणि काँग्रेसचे ३ अशा प्रकारे एकूण ४३ नगरसेवकांचे भक्कम पाठबळ मिळाले.

दुसरीकडे, सत्तेत असूनही शिंदे गटाला या निवडणुकीत आपला प्रभाव पाडता आला नाही. लता घोडके यांना केवळ आपल्या पक्षाच्या हक्काच्या १८ नगरसेवकांचीच मते मिळवता आली, ज्यामुळे त्यांचा तब्बल २५ मतांच्या फरकाने मोठा पराभव झाला. या पदासाठी एकूण तीन उमेदवारांनी पाच नामनिर्देशन पत्रे दाखल केली होती, परंतु अंतिम लढत ही नसरीन बानो आणि घोडके यांच्यातच मर्यादित राहिली. विजयाची घोषणा होताच सेक्युलर फ्रंटच्या समर्थकांनी जल्लोष केला. 

या संपूर्ण निवडणुकीत एमआयएम आणि भारतीय जनता पक्ष यांची भूमिका विजयाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची ठरली. सभागृहात एमआयएमचे २१ तर भाजपचे २ नगरसेवक आहेत. जर एमआयएमने कोण्या एका बाजूने कौल दिला असता, तर निवडणुकीचे चित्र पूर्णपणे बदलू शकले असते. मात्र, या दोन्ही पक्षांनी मतदानापासून दूर राहत तटस्थ राहण्याचा निर्णय घेतल्याने इस्लाम पार्टीचा विजय अधिक सुकर झाला.

शिंदे गटाला या अलिप्ततेचा मोठा फटका बसला आहे, कारण त्यांना १८ मतांच्या पुढे मजल मारता आली नाही. निकाल जाहीर झाल्यानंतर महापालिका भवनात इस्लाम पार्टी आणि मित्रपक्षांच्या कार्यकर्त्यांनी विजयाच्या घोषणा देत परिसर दणाणून सोडला. गुलालाची मुक्त उधळण करत हा विजय साजरा करण्यात आला, ज्यामुळे मालेगावचे वातावरण राजकीयदृष्ट्या तापले आहे.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा