Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शुक्रवार, २० फेब्रुवारी, २०२६

आपल्याच कुटुंबातील शेतकरी सुद्धा एक सदस्य आहे अशी भावना ठेवून शेतकऱ्यांच्या विजेच्या संदर्भातील अडचणी अधिकाऱ्यांनी त्वरित सोडवावेत,,,,,,,,,,,,,, आमदार नारायण आबा पाटील Head

 *करमाळा, तालुका --प्रतिनिधी*

*टाइम्स 45 न्यूज मराठी* 

 *मो:-9850686360*


आपल्या प्रत्येकाच्या कुटुंबातील शेतकरी सुध्दा एक सदस्यच आहे अशी भावना मनात ठेऊन शेतकऱ्यांच्या वीजेसंदर्भातील प्रश्न  अधिकाऱ्यांनी सोडवावेत. करमाळा मतदार संघातील शेतकऱ्यांना पिक हंगाम काळात  पुर्ण दाबाने व अखंडीत वीजपुरवठा मिळावा यासाठी महावितरण कडून‌ दक्षता घेतली पाहिजे अशी सूचना विद्यमान आमदार नारायण आबा पाटील यांनी दिली. जेऊर ता.करमाळा येथील आढावा बैठकीत ते बोलत होते. आमदार नारायण आबा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जेऊर येथे महावितरणची आढावा बैठक पार पडली. या बैठकीस उपविभागीय कार्यकारी अभियंता श्री विरेंद्र‌ कलावते (उप अभियंता करमाळा विभाग), प्रभास भोयर (उप अभियंता जेऊर विभाग), पोपट चव्हाण (उप अभियंता कुर्डुवाडी विभाग) यांचेसह सर्व‌ शाखा अभियंता उपस्थित होते. यावेळी अनेक शेतकऱ्यांनी आपल्या समस्या मांडल्या. या पुर्वी दिनांक २८ नोव्हेंबर २०२५ रोजी आमदार नारायण आबा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली महावितरणच्या करमाळा मतदारसंघातील सर्व विभागांची एक बैठक पार पडली होती. या बैठकीत झालेल्या विषयांचा आढावा घेण्यात आला. यानंतर शेतकरी व ग्रामपंचायत पदाधिकारी तसेच  नागरिकांनी मांडलेल्या प्रश्नांवर चर्चा झाली. पयानंतर बोलताना आमदार नारायण आबा पाटील म्हणाले की शेतकऱ्यांचे वर्षाचे आर्थिक गणित रानात उभे असलेल्या पिकांवर असते. या एका पिकावर शेतकऱ्यांना प्रपंचात येणारे सर्व प्रश्न सोडवावे लागतात. यामुळे अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या सणस्या जाणुन प्रश्न सोडवावेत. आपल्याही कुटुंबातील कोणीतरी शेतकरी असेलच यामुळे अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेऊन काम करावे. ऊन्हाळा तोंडावर असताना वीजेची मागणी वाढणार असे लक्षात घेऊन योग्य ती काळजी करुन वीज पुरवठा नियोजन करण्यात यावे. यापुढे आपण जिल्हा परिषद गटानुसार महावितरण आढावा बैठक घेणार असुन शाखा अभियंता वा कर्मचारी यांनी कामात हलगर्जीपणा करु नये असे आदेश आमदार नारायण आबा पाटील यांनी दिले. या बैठकीस आदिनाथचे उपाध्यक्ष महेंद्र पाटील, माजी जेष्ठ संचालक धुळाभाऊ कोकरे, संचालक विजय नवले, जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर गोडसे, पंचायत समिती सदस्य धनंजय शिरस्कर, 


पंचायत समिती माजी सभापती व नुतन सदस्य अतुल पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य बिभीषण आवटे,संचालक डॉ हरिदास केवरे,प्रा. संजय चौधरी सर,संचालक रविकिरण फुके, संचालक रामेश्वर तळेकर, संचालक दत्ता गव्हाणे,संचालक नवले, संचालक श्रीमंत चौधरी, माजी संचालक रविभाऊ कोकरे,किसन शिंदे,विठ्ठल शिंदे,दादा भांडवलकर,राजू भोसले, बंडू शिंदे,अनिल कोकाटे,सागर पोरे,शाहजी पाटील,निवास उगले,राजेंद्र ठोंबरे,दादा भांडवलकर,मावली भागडे,संजय तनपुरे,तात्या साहेब गोडगे,राजाभाऊ झोळ,शरद भोसले,गणेश जगताप, शमरावं झिणजाडे,दत्तू पाटील,अमर जगताप,अजित वगरे,अभिजित जगताप, भारत मोगल, सिद्धार्थ जिंगळे,पंडित रणदिवे, रामभाऊ नलावडे,किरण पाटील,रावसाहेब नेमाने, दत्तू शिंदे,संजय तोरमल, गणेश सव्वासे, संतोष कोपनर, संतोष पाटील, बाबासो कोपनर, विनोद शिंदे, हबीब मुलानी,मौलाना शेख,नाना पवार, चंदू पालवे, अण्णा आडेकर, धनु ननवरे,दत्तात्रय आर्किले, मनोहर गोडगे, भैय्या शिंदे, शिवाजी नरुटे, गणेश फुके, बिभीषण हुलगे, कैलास कोकरे, नाथा रणदिवे,शेजाळ उपसरपंच,जायद्रत शिंदे,शेळके सर, अंकुश शिंदे साडे, सुखदेव ढाळे,धनंजय जाधव,किसन घोडके,तात्या काळे,आदि उपस्थित होते. प्रास्तविक आमदार पाटील गटाचे प्रवक्ते सुनील तळेकर यांनी केले तर आभार माजी जिल्हा परिषद सदस्य चंद्रप्रकाश दराडे यांनी मानले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा