Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शुक्रवार, २० फेब्रुवारी, २०२६

*चार वर्षाच्या मोहम्मद शेख या चिमुकल्याने केला रमजान चा दुसरा रोजा पूर्ण*

 *करमाळा, तालुका --प्रतिनिधी*

*टाइम्स 45 न्यूज मराठी* 

 *मो:-9850686360*



मुस्लिम धर्मियांमध्ये पाच तत्वा पैकी रोजाला विशेष महत्त्व आहे सध्या मुस्लिम धर्मियांचा रमजानचा महिना चालू झाला आहे अशा या कडक रमजानच्या महिन्यामध्ये दुसरा रोजा करमाळा शहरातील खाटीक गल्ली येथील मोहम्मद इमरान शेख या चार वर्षीय चिमुकल्याने रमजानचा रोजा पूर्ण केला अवघ्या अल्पवयात त्यांनी असा हा कडक रोजा पूर्ण केल्याने त्याचे सर्व स्तरातून विशेष कौतुक व अभिनंदन केले जात आहे 

करमाळा शहरातील खाटीक गल्ली येथे राहणारे रहिवासी इमरान हाजी अब्दुल मजीद शेख यांचे ते चिरंजीव आहेत  मोहम्मद इमरान शेख  चार वर्षीय चिमुकल्याने रमजानचा पहिला रोजा पूर्ण केला आहे त्याने सदरचा उपवास जामिया मशीद मध्ये सोडला यावेळी मौलाना अन्वर शेख, मोहम्मद चे आजोबा हाजी अब्दुल मजीद शेख सहित मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते  अगदी लहान वयात रोजा पूर्ण केल्याबद्दल त्याचे मुस्लिम समाजा मधून विशेष कौतुक व अभिनंदन होत आहे त्याला या कामी आई, वडील तसेच आजोबा हाजी अब्दुल मजीद शेख यांचे विशेष मार्गदर्शन लाभले

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा