*करमाळा, तालुका --प्रतिनिधी*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-9850686360*
करमाळा तालुक्यातील संगोबा येथील श्री संगमेश्वर विद्यालयाचे आदर्श मुख्याध्यापक श्री सुनील शिंदे यांनी त्यांच्या कालखंडामध्ये केलेल्या उत्कृष्ट सेवेबद्दल त्यांचा नुकताच पुणे येथे काव्य मित्र संस्था पुणे यांच्या वतीने राष्ट्रीय शिक्षण सेवा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले यावेळी शिक्षक वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होते
काव्य मित्र संस्था पुणे यांच्यामार्फत शिवजयंतीचे औचित्य साधून राष्ट्रीय शिक्षण सेवा पुरस्कार दिनांक 12 फेब्रुवारी रोजी रोजी पिंपरी चिंचवड येथील सायन्स पार्क येथे श्री संगमेश्वर विद्यालय संगोबा चे मुख्याध्यापक सुनील शिंदे सर यांना प्रधान करण्यात आला
यावेळी सिंदखेडराजा येथील जिजाऊ जिजामाता यांच्या घराण्यातील सोळावे वंशज संभाजी राजे जाधवराव साहेब यांच्या शुभहस्ते व संत साहित्याचे गाढे अभ्यासक बोत्रे साहेब यांच्या शुभहस्ते सदरचा पुरस्कार प्रधान करण्यात आला यावेळी प्रशालेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर वृंद व कुभारगावचे मुख्याध्यापक नानासाहेब आढाव हे सपत्नीक हजर होते
करमाळा तालुक्यातील संगोबा येथील श्री संगमेश्वर विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री सुनील शिंदे यांना त्यांच्या उत्कृष्ट कार्य प्रणाली बद्दल त्यांचा पुणे येथे सन्मान करण्यात आला त्यांच्या या यशाबद्दल त्यांचे करमाळा तालुक्यातील शिक्षक वर्गाने अभिनंदन केले आहे





कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा