Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शुक्रवार, १३ मार्च, २०२६

*रमजान मुबारक 2023* *रोजा:- नंबर 24* *विषय:-।। पीडित-अनाथ - विधवा* *यांना हीं ईदच्या आनंदात* *सहभागी करून घ्यावे." प्रेषित मुहम्मद स्व.!!*

 *डॉ. सलीम शाईदा सिकंदर शेख*

*श्रीरामपूर* 

*मोबाईल :-९२७१६४००१४*


दिव्य कुरआन  सांगते, "जर तुम्ही!  आपले दान , जाहीररीत्या दिले तर,  हे देखील चांगले आहेत   ,   परंतु,  जर गुप्तरितीने तुम्हीं गरजूंना द्याल तर ते तुमच्यासाठी अधिक उत्तम व चांगले आहे   ,  आणि असें करणे तुमच्या काही वाईट दोष या वर्तनाने नाहीसे होतात,   आणि जे काही काम तुम्ही करता अल्लाहाला सर्व परिस्थितीत ज्ञान आहे.(  सूरहा अल-बकरा आ.नं.२७१ ),




                           अशा गरजु लोकांना मदत करा दान दया की  ज्यांनी अल्लाहाच्या कार्यात मार्गात स्वतःला गुंतवून वाहून टाकले आहेत, की  त्यामुळे ते  स्वतःच्या उपजीविकेसाठी जमिनीवर  काही धावपळ करू शकत नाहीत , ते याचना करण्यापासून ( मागणी )स्वतःला दूर ठेवतात, त्यांच्या स्वाभिमानाकडे पाहून आज्ञानी   मनुष्य समजतो की ;  हे सुस्थितीत आहेत , परंतु  , तुम्ही  त्यांच्या चेहऱ्यावरून त्यांची अंतरिक परिस्थिती ओळखू शकत नाही, मात्र ते लोक असे नाही की, ते लोकांच्या पाठीशी लागून काही मागतील, त्यांच्या अर्थसह्यासाठी जी काही संपत्ती तुम्ही खर्च कराल ती अल्लाहा  पासून लपवून ( दडवून)  राहणार नाही, अल्लाह सर्व काही जाणतोच आहे  "  ( सुराह  अल-बकराह अ.नं.२७३ ),

 पवित्र रमजान महिन्यातील सर्वात मोठे सबाब (पुण्यं) , "(१) सदकाहा, '(२)  -  फितत्राह,' व  (३)' " जकात "  देणे.

ज्या लोकांवर जकात देणे अनिवार्य ( फर्ज )केलेलं आहे त्या सर्व लोकांवर, "   सदकाहा  " व "  फितत्राह '  हें अनिवार्य आहेत.

जकात बद्दल कालच्याच 23 व्या लेखात माहिती घेतली.. सदकाहा :- याला काहीच बेरीज वजावाकी करावी लागत नाही, घरात कोणी आजारी पडलं, नवीन काही खरेदी करावयाची, कोणतेही शुभ कार्य करायचं किंवा तुम्हीं प्रवासाला निघायचं आहेत तर एक अशा चांगल्या कामाची सुरुवात हीं दान देऊन केली जाते.. " फित्राह " हें फक्त्त रमजान महिन्या पुरतं मर्यादित आहेत.. संपूर्ण रमजान महिना विविध पुण्य कर्म करून त्याचा शेवट हा सुद्धा पुण्य कर्माने व्हावं कोणताही  वंचित, गरजु, गरीब अनाथ, विधवा, मजुर, उपाशी राहणार नाहीत, ईद च्या आनंदा पासून वंचित राहणार नाहीत फक्त्त याच उद्देशा प्रति फित्राह दान करणं हें पैगंबर मुहम्मद स्व नीं कळकळीनं सांगितलं.

                     प्रेषित मुहम्मद स्व.म्हणतात की , "सदकाह -  फितत्राह    तुम्ही  ईदच्या नमाज अदा करण्याच्या  अगोदर लवकरात लवकर  द्यावेत. " 

गरीब - दारिद्र्यरेषेखालील लोक ईदचा उत्सव आनंद मुलाबाळांसह  साजरा करुन ईदच्या आनंदात सामील होऊन ईदच्या आनंदापासून परावृत्त राहणार नाही.

घरातील जेवढे  मंडळी  असतील व जर  घरात एखादी मुलगी सून पत्नी कोणीही गर्भवती  असेल तर  त्या गर्भातील बाळाचे हीं,  प्रत्येकी  २.५ किलो ग्राम (अडीच किलो) प्रमाणे गहू  किंवा त्यांची  किंमत  किंवा तुमच्या ऐपतीप्रमाणे  जवस, तांदूळ, किसमिस,.मनुका ई.  जीवणोपयोगी दैनंदिन जीवनातील गरजेच्या दोन वेळचे अन्नधान्य .

           प्रेषित मुहम्मद स्व.यांनी सांगतात, " गरिबांची मुले आजूबाजूच्या घरांमध्ये जावुन  ईद साजरी होतांना  बघून दुखी होतील,  त्यांचं मन  दुखेल ते दुःखी होतील म्हणूनच "ईदुल फित्र " ची नमाज आदा  करण्याच्या  जितक्या लवकरात लवकर   फितरा- सदकाह- दान देता येईल तेवढे  द्यावे  ".

             पैगंबर मुहम्मद स्व. वारंवार सांगतात की ,  सदकाह  फितत्राह  हे  दान ईदुल फित्रच्या  ईदगाहा जाण्याच्या अगोदर देणे हें फार पुण्यांच (सबाब) काम आहे   " 

                ते तुम्ही  ४/५ दिवस अगोदरच सदकाह - ,फितत्राह आणि तुम्ही जे काही दान  द्याल त्याचं ते बाजारात   जाऊन त्याचे पैसे करून  कुटुंबासाठी काहीतरी   गरजेनुसार खरेदी करून आणू शकतील,  मुलाबाळांबरोबर ईद साजरी करू शकतील.

काहींनी पैगंबर मुहम्मद स्व यांना प्रश्न विचारलं की , " दान दिले तर आमच्या प्रॉपर्टीतुन कमी होईल,"  

वरील प्रश्नाचे उत्तर प्रेषित मुहम्मद स्व.नीं दिलें की," सदकाहा - फितत्रह - जकात दिल्याने तुमचा माल ,पैसा,कधीच कमी होत नसतो.   ऐका - !! जेव्हा दान देणारा देत असतो, तर घेणाऱ्याच्या हातात  दान देण्याअगोदर तो  सदकाह- जकात अल्लाहच्या हातात अगोदर  पोहोचलेला असतो  !!! त्याचं सबाब  (पुण्यं) कैकपटीने  तुम्हाला आगोदर  मिळते"  ( हादिस तबराणी नं .११९८२ अन.अब्बास रजि. ).

                     प्रेषीत मुहम्मद स्व.  प्रिय पत्नीला सांगतात," ये आयेशा (रजि.)  तुम्ही नम्र व्हा, संयम बाळगुण सदकाह व फितराह देत राहा. कोणतेही  दान -  एका हाताने दिले  तर त्याची खबर दुसऱ्या हातास  लागता कामा नयेत !   जेवढ्या गुप्तपणे - गुपचूप द्याल  तर  त्याचं सबाब (पुण्य) तुम्हाला  किती तरी पटीने जास्तच  मिळेल.  " 

                        दिव्य कुरआन  म्हणतो  की" जर तुम्ही आपले दान जाहीररीत्या द्याल तर हे देखील चांगले आहेत, परंतु जर गुप्त रित्या गरजूंना द्याल तर हे तुमच्यासाठी अधिक उत्तम आहे. त्यामुळे तुमचे बरेसचे दोष या वर्तनाने नाहीसे होतात "(सुराह  अल-बकरा नंबर अ.नं.२७१ ).,

             काही गरीब हे मांगून घेणारे असतात, काही गरीब  स्वाभिमानी  असतात, त्यांची ती मजबुरी असते,त्यामुळे ते काही  काम  वगैरे करू शकत नाही व भिकही शरमेमुळे मागु शकत  नाही.    असे स्वाभिमानीं लोक स्वतः त्रास सहन करतात,  त्यांना त्यांची प्रतिष्ठा महत्त्वाची असते.म्हणून हजरत प्रेषित मुहम्मद स्व. म्हणतात ,  त्यांचीही प्रतिष्ठा टिकली पाहिजे,  म्हणून अशा स्वाभिमानी असलेल्या मात्र परिस्थिती नुसार लाचार - गरीबांना त्यांच्या स्वाभिमाना खातर अंधारात गुपचुप मदत द्या व भरपूर सबाब‌ (पुण्यं) प्राप्त करा.

जवळचे काही नातेवाईक ही गरीब असतात,  प्रेषित मुहम्मद स्व. म्हणतात, गरिबाला देण्याचं प्राधान्य तर आहेतच, परंतु  सर्वात महत्वाचं  जवळचे  नातेवाईक गरीब असतील तर पहिल्या प्रथम तुमच्यावर जास्त हक्क त्यांचा असतो,  आपल्या गरीब नातेवाईकांना द्या, नातेवाईक आपल्या नातेवाइकांना सदकाह- फितराह- जकात मागत नसतात, त्यांनाही स्वाभिमान, अस्मिता असतात . त्यामुळे तुम्हाला दुहेरी सबाब (पुण्यं) भेटते,  तुम्हाला तुमचा सदकाह दिला म्हणून पाहिलं सबाब तर दुसरं  तुमच्या नातेवाईकाबरोबर सद- व्यवहार केला म्हणून, तिसरं विशेष म्हणजे त्यांना तुम्ही जवळ करून घेतले म्हणून ".( हादिस :- मुस्तदरक १४७६ ). 

 नातेवाईकांना सदकाह मागणी करणे म्हणजे कमीपणाचे वाटतात, उपाशी राहतील मात्र मागणार नाहीत,  स्वतःहून पुढाकार घेऊन त्यांचे सर्व प्रश्न सोडवून त्यांना जवळ घेऊन मदत केली तर त्यांच्याबरोबरच आपले संबंध सुरळीत होतील. म्हणूनच  प्रेषितांनी सांगितले की आपल्या जवळच्या नातेवाईकांबरोबर चांगला व्यवहार करण्याचे वेळोवेळी सांगितले आहेत .

   # सदका वंचित,पीडित,अनाथ, गरीब गरजु -गोरगरिबांचे वर्षभराची अर्थव्यवस्था आहे, त्यावरच त्यांचा प्रपंच चालतो, म्हणून  वारंवार सदकाह देत चला . सदकाह वर्षे भर देण्याची गरज आहे.

  दान दिल्याने ते वाढतच असतं. 

(मित्रांनो लेख आवडला तर मित्र नातेवाईकांना अवश्य पाठवा .. कृपया प्रतिक्रिया अवश्य नोंदवा .)

लेखण :- डॉ. सलीम शाईदा सिकंदर शेख

बैतुशशिफा मल्टिस्पेशालिटी दवाखाना 

श्रीरामपूर 

-मोबाईल :-  ९२७१६४००१४

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा