Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

रविवार, ८ मार्च, २०२६

*रमजान मुबारक 2026* *रोजा नंबर 019 वा* *सोमवार दिनांक 09-03-2026* *विषय:- " बुरखा - पडदा - हिजाब*- *महिलांची सुरक्षा*. *"

 *डॉ सलीम सिकंदर शेख*,

   *बैतुशशिफा मल्टिस्पेशालिटी दवाखाना*

      *श्रीरामपूर*

     *मो.नं 9271640014*



काल(  08) आठ  मार्च हा जागतिक महिला दिवस म्हणून जगभर साजरा करण्यात आला. लाडक्या बहिणीच्या सुरक्षित राहावे म्हणून. 

         #  दिव्य कुरआन सांगितले  , " पैगंबर ! आपल्या पत्नींनां , व  मुलींना आणि  श्रध्दावंत  स्त्रियांनाही सांगां , ( सार्वजनिक ठिकाणी वावरताना) की, त्यांनी बाह्य वस्राचा ( Outer Garments,चादर ) भाग आपल्या अंगाभोवती ( अगांवर ) स्वतः वर ( म्हणजे डोक्यावर , अंगावर) टाकून घ्यावा . आशा पेहरावामुळे त्या ( शालीन स्त्रियां म्हणून )ओळखल्या  जातील ,  आणि ( सार्वजनिक ठिकाणी वावरताना) त्यांना काही त्रास होणार नाही.. आणि अल्लाह फार क्षमाशील व दयाळू आहे . ( पारा नंबर २२ वा सुरह  नं . ३३ अल-अहजाब आ.नं. ५९ वी ).



 # महिलांबाबत, निकाह ( विवाह) , तलाक ( घटस्फोट), विधवा, खुला , बुरखा- पडदा - हिजाब  व लग्नानंतर वारसा हक्क  असें बरेच   विषय सार्वजनिक ठिकाणी   कायमस्वरूपी चर्चेत असतात ,  परंतु  मुस्लिम समाजातील काही विषय हे शोशल मेडीयावर  जास्तच चर्चेचे असतात.व मीडिया वाले जाणूनबुजून हें विषय चघळत असतात.   अशा सर्व विषयांवरील समाज मनात पेरलेले खूप काही गैरसमज वर विस्तृत लिखाण करण्याची गरज आहेत, परंतु  एका लेखात पुर्ण होवू शकत नाहीत. असो.

                जगात कोणत्या महीलेने काय वस्र परिधान करायचं हे प्रत्येक बघिनींना स्वातंत्र्य दिले आहे व तो ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे व तो प्रत्येक भगिनींचा अधिकार आहेत आणि अधिकार त्यांना संविधानाने दिलेला आहेत. 

        पवित्र कुर आन मध्ये, " पडद्या "( हिजाब - किंवा बुरखा ) विषयी ज्या सद्यनेचा वापर केला जातो तो " हिजाब " आहे. हा शब्द पवित्र कुर आन मध्ये आठ (8)वेळा वापरला गेला आहेत. उदा. (1) सुरह अल - आराफ -, 46,(2) सुरह बनी - इस्राईल आ. 45(3) अल - मरियम आ. 17.(4)अल - आजहाब आ. 53,(5)सुरह स्वाद आ. 32,(6) सुरह अश - शुरा आ. 51, (7) अल - मुत्तपफीफीन आ. 15, )(8)सुरहा अल - नूर आ. 30.. असं आठ वेळा उल्लेख आलेला आहे., 

" हिजाब " चा शाब्दिक अर्थ"  पडदा "विभाजक " किंवा "स्क्रीन " असा आहे." हिजाब " चा ज्या अर्थाने पारंपरिक स्वरूपात वापर केला जातो आणि जो मुस्लिम समाजात वापरला जातो तो कपड्याचा एक तुकडा डोक्यापासून पाया पर्यंत  सैल पोषाक जो संपूर्ण शरीर झाकतो. त्याला"  बुरखा "म्हटलं जातं, मध्यपूर्वेत याला  " नकाब  " म्हटलं जातं, इराण देशात संपूर्ण शरीराला झाकणारी काळी चादर असते आणि अरब देशात जो पडदा मुस्लिम भगिनी वापरतात त्याला "  आबाया " असं म्हणतात. जगाच्या इतर देशामध्ये त्याला " स्कार्फ " म्हटले जाते ज्या द्वारे मुस्लिम भगिनी आपलं डोके झाकून घेतात.

          प्रेषित मुहम्मद स्व सल्लमांच्या काळापासून महीलांनी आपल्या कपड्यांच्या वर एक वस्त्र परिधान करावयास सांगितले आहे त्याला बुरखा - हिजाब - चादर- पडदा -  म्हटले जातं, चादर ओढण्याची सांगितले आहे..त्यात डोक्यावर दुपट्टा ओढनी व संपूर्ण अंगाला चादर ओढणी किंवा शिवन घेतलेल्या बुरखा-  हिजाब पांघरूण घेणे ..(  दिव्य कुर आन मधील पारा नं. २२  अल - अजहाब आ नं 59)  मधे स्पष्ट शब्दांत आलेलं आहे.

महिलांनी सार्वजनिक ठिकाणी जाताना वावरताना घालण्याचं सांगितले आहे..

     १५०० वर्षापुर्वी चा काळ अज्ञानाचा काळ होता त्यावेळी स्त्रिया फक्त भोग विलासी साठी व  अश्लिल कृत्यं, नाच- गाणं आणि फक्त्त मनोरंजनाचं साधनं येवढ्या पुरत्याच  मर्यादित जीवन स्त्रियांचं होते.  स्त्रियांकडे वाईट नजरेतुनच बघितले जायचं,  त्याच प्रमाणे आजची परिस्थिती ही शोशल मेडीया च्या जमाण्यातील आहे .. परिस्थिती दिवसेंदिवस खूप गंभीर होत चालली आहे..शोशल मेडीयामुळे लहान लहान मुलांना ही अश्लिल चाळे करताना दिसत आहेत.. बाकीचे सांगणं कठीणच. 

हे  सर्व टाळण्यासाठी  त्या काळातच प्रेषित मुहम्मद स्व.च्या मार्फत अल्लाहा( ईश्वर) नेच बघिंनी महीलांसाठी संरक्षण कवच म्हणून चादर -ओढनी- बुरखा- हिजाब चं संकल्पना सक्तीची सांगितली ..

           प्रेषित मुहम्मद स्व सल्लमांच्या विविध पत्नी हीं होत्या,  हजरत जैनब रजि., हजरत रूकयया रजि., हजरत उम्मे कुलसूम रजि., हजरत फातिमा रजि.,  चार मुली  होत्यां. त्याच बरोबर त्यांनी आपल्या परीवारांसह सर्व सहकारी मित्रांना ही सक्तीचं केले .

             #   विशेष बाब म्हणजे, पुरुषांसाठी सुद्धा आचारसंहिता लागू  केली होती  व ती सक्तीची मनाई केली  ,  प्रेषित मुहम्मद स्व.च्या द्वारे  दिव्य कुरआन मध्ये सांगतात की, "      

       दिव्य कुरआन सक्ती नें सांगतो की, " हे  पैगंबर (स्व.)!  श्रद्धावान ( बंधुंना) पुरुषांना सांगा , की त्यांनी आपली दृष्टीं ( नजरां) ची जपनूक करावी   ( नजरा खाली ठेवाव्यात ), आणि आपल्या लज्जा स्थांनांचे रक्षण करावेत . असे करणे त्यांच्या साठी शुध्द चारीत्र्याचे  द्योतक ठरेल  , ते ( पुरुष)जे  काही करतात अल्लाहाला त्यांचीं  पुर्ण जाणीव(खबर)आहे.  " ( सुरहा आत - नूर आ. नं. 30 ). खरं तर या आदेशाचा अर्थ सदैव खाली पाहणं न होता पुरुषांनी स्त्रियां कडे चुकीच्या दृष्टीकोनातून न पाहणे . स्त्रियांच्या गुप्त अंगावर जाणूनबुजून दृष्टी न टाकणं.

       म्हणूनच प्रेषित मुहम्मद स्व सल्लम. सांगतात की # चालता फिरताना आपली दृष्टी खाली ठेवून व आपल्या शरिराचे अंग प्रदर्शन  स्त्रियांना ही होणार नाही याची काळजी पुरुषांना ही घेण्याची सक्ती करण्यात आली आहे.  फक्त स्त्रियांसाठी सक्ती केली नव्हती तर तोच कायदा   पुरुषांना ही सक्ती चा केला होता.

                  #  प्रेषित मुहम्मद स्व सल्लम. " महिलांनी आपल्या घरात मोकळेपणाने व थाटात वावरावे , नटून थटून सजून आपल्या सौंदर्याचे सर्वत्र प्रदर्शन करून फिरू नयेत , घराबाहेर जाताना डोक्याव चादर घेउन , जो दागिने घातलेली आहे त्या दागिन्यांचां मधुर नाद( खुळ खुळ) आवाज होत असेल तर तो काढुन ठेवावेत .".

         # "घरातील पती, वडील ,भाउ, मुलगा, भाचा , पुतण्या ( यांच्या शी विवाह होत नाही)सोडून ;   ईतर सदस्यांसमोर वावरताना विशेष खबरदारी बाळगावी . साज शृंगार नटने- सजने फक्त पतींसाठीच ..घरातील इतर अपत्यजनांसमोर समोर जाताना वावरताना सुध्दा आपल्या वक्षस्थांवर ओढनी-  दुपट्टा पांघरूण अपले संपूर्ण शरीर आच्छादित होईल असे वस्र धारण करावेत ".

              # पुरुषांना खास आदेश देण्यात आले आहेत की , " त्यांनी आपल्या आया बहीणींच्यां खोलींत जाताना परवानगी घ्यावी जेणेकरून अचानक तुमच्या घरात प्रवेशाने बेसावध बसलेल्या महीला,बहीणींवर खजिल होण्याची पाळी येणार नाहीत."

                   # या सर्वाला परदा बुरखा पध्दत म्हणतात यावर अधिक खुलासा करताना प्रेषित मुहम्मद स्व सल्लमांनीं सांगितले की, " स्त्रियांनों ,( महिलांनों ) आपल्या सख्ख्या भावा व वडीलांसमोर जाताना सुध्दा चेहरा हाताचा पंजा ,व घोट्याच्या पर्यंत पाया व्यतिरिक्त संपूर्ण शरीर वस्राने अच्छादित करूनच जावे , पारदर्शक, शरिर प्रदर्शन घडेल  असे कपडे टाळावेत .., तसेच आपल्या घरातील आप्त जनां ( मेहरम) सोडून इतर कोणत्याही नात्याच्या पुरुषासमोर एकांतात बसू नये ' .#

                    # पैगंबरांनी स्त्रियांना सुगंध अत्तर वगैरे लावून घराबाहेर जाण्याबाबत मनाई केली आहेत , मस्जिद मध्ये हीं महिला जाऊ शकतात  त्यावर परवानगी देतांना महीलांना नमाज अदा करण्यासाठी वेगळ्या जागेची व्यवस्था करण्याचे आदेश दिले होते. एकाच रांगेत स्त्रियांना व पुरुषांना नमाज अदा करण्यास नाकारण्यात आले होते  . त्याकाळात  पैगंबर मुहम्मद स्व. हें स्वतः महिलांची संपुर्ण नमाज अदा झाल्यानंतर सर्व महीला मस्जिदी मधून निघून जाई पर्यंत पैगंबर स्व . त्यांचे पुरुष मित्र आपल्या बसल्या जागेवरून हालत नव्हते.

                  इस्लाम ने महीलांना संपूर्ण सवलत व सुट  होती व त्या खास देण्यात आल्या होत्या . प्रत्येक गोस्ट महीलांसाठी सोयीची व कामाचीच करून ठेवली. महीलांना प्रत्येक क्षेत्रात वाव देण्यासाठी प्रयत्न केले.  परंतु   त्या सर्व सवलती सूट ह्या त्यांच्या चौकटीत राहूनच पाळायाच्या,  घरात बंदिस्त नव्हत्या. त्या काळात, महिलांना युद्धात भाग घेण्यासाठी हीं परवानगी होती, महिलांना युद्धात  जखमी सैनिकांची सेवा, निगा नर्सिंग करण्याचे कामं दिली जात होती. पैगंबर मुहम्मद स्व. यांच्या मस्जिद ए नबीवी मध्ये आपले प्रश्न गाऱ्हाणं स्वतः मांडीत असें.. एवढी मोकळीक होती.

                      सध्या शोशल मेडीयाच्या जमाण्यात यू ट्यूब ,वेब सिनेमा व  सिरीयलस चालू आहेत,  प्रत्यक्षात त्यामध्ये जाणते - अजनाते नक्कीच काय ते सांगू शकत नाहीत परंतु एखादे दृश्य  अश्लिल टाकतातच,  फार थोड्या सिरीयल असें असू शकतात की त्यामधे अश्लील दृश्य नसतात,  परंतु बहुतेक सिनेमा , सिरीयलस  जाहीरातीत  महिलांचां वापर करून कमी कपड्यात  - अंग प्रदर्शन  केले जात  आहे.. कमी फिट्ट व पारदर्शक कपड्यात स्त्रियांना  जाणूनबुजून दाखवले जातात ,  त्यामुळे लहान लहान मुलां वर विपीरीत परीणाम होउन  अश्लील दृश्यांची बळी पडून नको ते ते कृत्य मुलं करतांना बघावं  लागतं  किंवा वारंवार  दैनिक न्यूज हेडलाईन आज काल बघायला मिळतात.. त्यांच्या बालमनांवर अदृश्य पणे मानसिक परिणाम होउन चुकीचे कृत्य  नकळत पणे होऊन त्यातूनच काही नराधमांच्या संख्या दिवसेंदिवस वाढत आहेत. अनेक गुन्हेगारांना आपसूक आमंत्रण भेटत आहेत. हजारो गुन्हे हें यामुळेच होतं आहेत, 

महिला हा विषय संवेदनशील असल्यामुळे  अगदीच यासाठी ओढणी पडदा- बुरखा -हिजाब ही काळाची गरज बनत चालली आहेत,  प्रश्न फक्त एका  समाजापुरताच मर्यादित  राहिला नाही, तर हा प्रश्न सर्वसामान्य समाजातील लोकांना भेडसावत आहेत.   सर्वांच्या मुली  लाडक्याच असतात . आपल्या मुलीं या सुरक्षित राहावेत असं प्रत्येक पालकांची मनोमन इच्छा असते ,   यासाठी सुरक्षित पध्दत  हिजाब -बुरखा - पडदा  किंवा दुसऱ्या भाषेत त्याला काही ही नावे द्यावीत हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे.

  बुरखा - पडदा हिजाब हें आजच्या काळाच्या लाडक्या बहिनीं च्या सुरक्षासाठी काळाची गरज बनली आहेत.

          वाद नको..... बघा समजलं तर..

( मित्रांनो  लेख आवडला तर नक्कीच आपल्या मित्रांना नातेवाईकांना जरूर पाठवा, आपल्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा)



लेखन:- डॉ सलीम सिकंदर शेख ,

   बैतुशशिफा मल्टिस्पेशालिटी दवाखाना 

      श्रीरामपूर 

     मो.नं 9271640014

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा